रविवार, ७ ऑक्टोबर, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

" जर ज्ञान आचरणात आणले नाही तर ते अपूर्ण ठरते. "

भाग पाचवा

प्रेम साई अवतार

              स्वामींनी या प्रश्नांची उत्तरे दिली, ते म्हणाले," तुझ्यामध्ये आंडाळ, सीता आणि राधा यांचे खोलवर रुजलेले ठसे आहेत. तिघींच्या विरहवेदना तू सोसते आहेस. त्यांचे माझ्यावर असलेले ऋण मी तुझ्याद्वारे फेडणार आहे. जेव्हा प्रेम साई अवतारात आपण राजा आणि प्रेमा बनून येऊ, तेव्हा तू पूर्ण ऐक्याचा आनंद अनुभवशील, तसेच आदर्श कौटुंबिक जीवनाचाही अनुभव घेशील. "
               बालपणापासूनच मला आंडाळसारखे बनून कृष्णाशी लग्न करायचे होते. अनेक वर्षांच्या कालावधीनंतर स्वामींनी सांगितले. की मी राधा आहे. राधा कृष्णाच्या विरहवेदना मी भोगते आहे. स्वामींनी मला माझे भाव कृतीत उतरवण्यास सांगितले. तसेच जयदेवांच्या गीत गोविंदम् विषयी लिहिण्यास सांगितले. त्यानुसार मी लिहिले. पुस्तकाचे नाव ठेवले ' पुन्हा गीत गोविंदम् ' जयदेवांची कृष्णाप्रती असणारी भक्ती म्हणजे राधा -भाव, मधुर भाव - भक्ती. मधुर भाव परमेश्वराला प्रेमाने जखडून ठेवतो. याला ' चिन्मय रस ' असे म्हणतात. म्हणजेच दिव्य जागृतीचा अमृतरस. आपल्या हृदयात वास करणाऱ्याची राधा - भावाने केलेली भक्ती. या भक्तीमध्ये जीवात्मा वधू आणि परमात्मा वर असतो. याचा देहाशी काहीही संबंध नसतो. ही जीवात्म्याची परमेश्वरासाठी असणारी तृष्णा आहे. ही आत्म्याची तृष्णा आहे तसेच परमेश्वराचे प्रेम प्राप्त करण्याची तृष्णा आहे. हे काम नाही, कामदहन आहे. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात

जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा