मंगळवार, २३ ऑक्टोबर, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः


मोती दहावा


              आपण सकाळपासून रात्रीपर्यंत कामात व्यस्त असतो. धावपळीच्या जीवनात आपण अगदी थोडी विश्रांती घेतो. या सर्व धकाधकीतून आपण काय मिळवतो ? बायको, मुले, अधिकारपद आणि थोडीशी मालमत्ता. यासाठी आपण किती धडपड करतो. कित्येक वेळा दैवाला दोष देतो आणि मनःशांती हरवून बसतो. जीवनात जराही शांती नाही. यातून सुटका मिळवण्यासाठी माणूस सिनेमाला जातो, मित्रांना भेटतो कादंबऱ्या, मासिके वाचतो. हे सर्व तात्पुरते उपाय आहेत. काही काळ कदाचित तो त्याची दुःख विसरेल, पण घरी परतल्यावर ती पुन्हा त्याच्या मानगुटीवर बसतील. माणसांनी कायमस्वरूपी उपाय शोधला पाहिजे. सखोल चिंतन केल्यावर तुम्हाला याच उत्तर सापडेल. जेव्हा तुम्ही सर्व कर्म परमेश्वराची पूजा म्हणून कराल तेव्हाच तुम्हाला खरी मनः शांती मिळेल.
               आपण स्वतःला सर्व बंधनातून मुक्त करण्यासाठीच जन्मास आलो आहोत. सगळी कर्म योगात परिवर्तित करून आपण मुक्ती प्राप्त करू शकतो. कोण कोणाचा नातेवाईक ? कौटुंबिक जीवन हे आगगाडीच्या प्रवासाप्रमाणे आहे. ट्रेनच्या प्रवाशांप्रमाणेच कुटुंबात सर्वजण एकत्र येतात; ते कर्मांनुसार एकमेकांना जोडलेले असतात. एकमेकांचे ऋण फेडले की ते वेगवेगळ्या मार्गांनी जातात. त्या कुटुंबात असेपर्यंत प्रत्येकाने बंधनात न अडकता आपली कर्तव्ये परमेश्वराला अर्पण करण्याच्या भावनेनी पार पाडावी.
               सर्व नाती फसवी आहेत. फक्त परमेश्वर शाश्वत आहे. तोच आपला खराखुरा नातलग आहे. त्यालाच आपला समजून कर्म करीत राहणं हाच कर्मयोग आहे. ' मी कर्ता आहे ' या भावनेने केलेल्या कर्माचे पाश होतात, परमेश्वराला अर्पण करण्याच्या भावनेने केलेल्या कर्माचा योग्य होतो.
              माझ्या ' योगसूत्र ' या पुस्तकात मी आपल्या रोजच्या साध्या कृती आणि गोष्टी योगामध्ये परिवर्तन करण्याचे सोपे मार्ग सांगितले आहेत. सर्वांमध्ये फक्त परमेश्वरच वास करीत आहे हे सत्य एकदा जाणलंत की तुम्ही सगळ्या गोष्टी परमेश्वराशी जोडण्यातील आनंद अनुभवाल. दरवाजा, एक सामान्य दरवाजाच मानलात तर त्यातून काहीच आनंद मिळणार नाही. पण तीच वस्तू परमेश्वराशी जोडण्यासाठी असून असा विचार कराल की ' हा मोक्षाचा दरवाजा आहे ', तर मग तुम्हाला आनंद मिळेल. तुम्ही प्रत्येक व्यक्ती, वस्तू किंवा घटना परमेश्वराशी जोडू शकता. मी लहानपणी आमच्या खोलीतील प्रत्येक वस्तू परमेश्वराशी जोडत असे. दिवाणखान्यातील खांब हा प्रल्हादाला वाचवण्यासाठी प्रकट होणाऱ्या नृसिंहावताराचा खांब होत असे. खोलीच्या मध्यभागी असणारा झोपाळा हा राधाकृष्णासाठी असे. अशाप्रकारे मी सर्वकाही परमेश्वराशी जोडण्याची स्वतःला सवय लावून घेतली.
               तुम्ही अगदी रोजची घरगुती कामं दिव्यत्वाशी जोडलीत, तर तुम्हाला अवजड कमाचेसुद्धा ओझे वाटणार नाही.
              अशाप्रकारे मी भौतिक अर्थ तोडून सर्व गोष्टी परमेश्वराशी जोडण्याची सवय लावून घेतली. माणसाने ' तोडणे आणि जोडणे ' च्या सरावाची प्रयत्नपूर्वक सवय करून घ्यायला हवी. त्यामुळे तुम्ही जे काही बघता, ऐकता किंवा करता, ते आपोआपच परमेश्वराशी जोडता.
              माझी कर्म मला स्पर्श करीत नाहीत अथवा मला त्यांचा त्रास होत नाही. मला त्यांचं ओझं वाटत नाही त्यामुळे मी माझी कामं विनासायास करू शकते. माझं मन शांत, समतोल असतं. मी जीवनात, नदीत तरंगणाऱ्या ओंडक्याप्रमाणे स्वछंद फिरते. मी कशालाही स्पर्श करत नाही. कारण माझ्यात ' मी ' नाही, अहंकार नाही. मला काही स्पर्श करीत नाही आणि मी कशालाही स्पर्श करीत नाही, त्यामुळे माझ्या मनावर कुठलेही संस्कार नाहीत. हा माझा स्वभाव जन्ममूत्युच्या चक्रात न अडकलेल्या स्वछंद पक्ष्यासारखा आहे. 

संदर्भ - श्री वसंत साईंच्या ' कर्म कायद्यावर उपाय ' ह्या पुस्तकातून.

जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा