ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
जन्मदिन संदेश
सर्वसंग परित्याग केल्यानंतरच मोक्ष प्राप्ती होऊ शकते.
त्यागाशिवाय कोणालाही मुक्ती मिळणे शक्य नाही. मुक्ती मिळवणे ही काही साधी सोपी गोष्ट नव्हे. जर तुमचा एक पाय भौतिक जीवनात आणि एक पाय आध्यात्मिक जीवनात असेल तर तुम्हाला कधीही मोक्षप्राप्ती होणार नाही. असे करत असाल तर ती केवळ स्वतःची फसवणूक ठरेल. तुम्ही तुमच्या बायको, मुले तसेच अर्थार्जन करण्यासाठी त्याग करायला तयार असता मग तुम्ही तुमच्या आध्यात्मिक जीवनासाठी त्याग का करू शकत नाही ? भौतिक जीवन म्हणजे ' जनन मरण ' व्याधी आहे. भवरोग आहे. हा कधीही बरा न होणार रोग आहे. जर तुम्हाला काही आजार झाला तर तुम्ही डॉक्टरांकडे जाता व त्यांनी लिहून दिलेली औषधे घेता. त्यांनी सांगितलेली सर्व खाण्यापिण्याची पथ्ये पाळता, सूचना पाळता. तुमचा भवरोग बरा करण्यासाठी महामहिम डॉक्टर भगवान श्री सत्य साईबाबा येथे आले. मग त्यांनी लिहून दिलेली औषधे तुम्ही का घेत नाही ? त्यांनी सुचवलेले उपचार जर तुम्ही घेतलेत तर तुमची जन्ममृत्युच्या फेऱ्यातून मुक्तता होईल. त्यागरूपी औषध घेतल्याशिवाय तुम्हाला कधीही, काहीही प्राप्त होणार नाही. त्याग हे आध्यात्मिक जीवनाच्या वाटचालीचे पहिले पाऊल आहे. तसेच आध्यात्मिक जीवनाचा आधारस्तंभ आहे. अनासक्त भावनेने तुम्ही तुमची कर्तव्ये बजावली पाहिजेत. परमेश्वर तुम्हाला संन्यास घेण्यास सांगत नाही. तुम्ही जीवनाच्या ज्या कोणत्या अवस्थेत आहात, त्यातील सर्व गोष्टींविषयी असणाऱ्या आसक्तीचा त्याग केलात तर तुम्हाला निश्चित परमेश्वर प्राप्ती होईल.
⃦⃦ न कर्मणा न प्रजया धनेन त्यागेनौके अमृतत्व मानशुः ⃦
कर्म, संतती वा धन ह्या कोणत्याही गोष्टीने अमरत्व प्राप्त होत नाही.भगवान सत्यसाईंनीही हेच सांगितले. मायेमधून जागे व्हा. सर्व अशाश्वत आहे. परमेश्वरासाठी मी माझ्या जीवनात सर्व गोष्टींचा त्याग केला. त्यानंतर वैश्विक मुक्तीसाठी मी मला प्राप्त झालेल्या परमेश्वराचाही त्याग केला.
श्री वसंतसाई
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा