ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" कोणालाही दुखवू नका कारण परमेश्वर प्रत्येकामध्ये विद्यमान आहे."
भाग - नववा
आत्मगीते
गौप्यसुखांचा स्वर्ग !
अमृताचा माग ठेवी मृत्युस किनाऱ्यावर
संगीत त्याचे ऐकून
दाटे अश्रूंचा महापूर
होई अनिल निश्चल
फुटे पान्हा धेनुस
पक्षी विसरती कूजन
व्याघ्र सेविती गोरस धेनुच्या आचळातून
समस्त विश्व करिते नर्तन
पाहा, पाहा ते नृत्यमग्न हरिण
संगीताने वितळती पाषाण
चराचरात पहा नारायण
मोहितसे गोपीस त्याचे मधुर गान
विसरती घरदार, नुरे देहभान
अरे ! ही तर रासलीला
दिव्य आत्मनर्तन !
हे कृष्णपंखी कोकिळे,
भेटसी जरी तू माझ्या माधवला
सांग त्यासी माझी दुःखमाला
शरणागत होऊनी चरणकमलांशी,
सांग त्यासी करण्या मार्गदर्शन
या व्यथेतून मुक्त होण्यास
हे प्रिये सखे, कोकिळे
भेटसी जरी तू माझ्या अच्युताला
प्रलय होता, सांग त्यासी रक्षण माझे करायला
व्यर्थ माझे जीवन, या तुफानी भवसागरात
*
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा