शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

      " प्रेमाला कोणी मर्यादा घालू शकते का ? संकुचित कृती अनिर्बंध प्रेमाची अनुभूती घेऊ देत नाही तर ती केवळ दोष शोधून काढते."

भाग - नववा 

आत्मगीते 


भेटी दिली आम्ही दुसऱ्या स्थानास 

ही तर प्रयोगशाळा स्थळकाळाची 

आसनस्थ होते तेथे अनेक सोत्सुक 

ते म्हणाले,

" कलियुगात ठसे नाहीत 

केवळ कलिचा महिमा 

तुमच्या प्रयोगाच्या निष्पत्तीतून 

आम्ही सत्य जाणले."


चला आता करू विश्लेषण 

माझ्या पुस्तकातील नोंदींचे 

" जोवरी द्वापारातील प्रेमाचे 

ठसे ना उमटती खोलवर जनमानसी 

तोवर नाही कलिस उध्दरण."

स्वामी पुढे म्हणती ... 

संहारविना करण्या कलिचे रक्षण 

संकल्प आपला, करू पुन्हा अवतरण 


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम      

रविवार, २५ ऑक्टोबर, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

"अनासक्त जीवन जगणे म्हणजेच मुक्ती होय."

भाग नववा 

आत्मगीते 

अंतरिक्ष यात्रा 


स्वामी अन् मी अंतरिक्ष यात्रा करत होतो 

गोल गोल गिरक्या घेत होतो 

स्थळ आणि काळाची पडली गाठ 

काळाच्या दिवाणखान्यातून जाता जाता 

दृष्ट्टीस पडले एक भव्य चिन्ह 

स्वामींना विचारता म्हणाले,

' त्रेतायुगाचे चिन्ह ' 

वळून पाहता दृष्टीस पडला 

राजपथ, रजन्याय 

धर्मस्थापना, धर्ममार्ग 


अजून एक बालशाही चिन्ह 

' द्वापार धर्मचिन्ह '. 

स्वामी म्हणाले,

" या चिन्हात आहे छोटेसे वळण 

अस्पष्ट आहेत अनेक चिन्ह "

मी विचारले," स्वामी हे काय आहे ?

मला समजले नाही. "

हे प्रियतमे, 

" छोटेसे वळण हे चिन्ह आहे प्रेमाचे 

नोंद कर याची तुझ्या पुस्तिकेत 

नांतर ते पाहूया आपण."

तद्नुसार नोंद केली मी त्याची 


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम   

शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

पूर्ण अवतार 

पुष्प - ३४

            दशावतारांचा एक अवतार म्हणजे पूर्ण अवतार होय. श्री सत्यसाई बाबा पूर्ण अवतार आहेत. ह्या एका अवतारकार्यामध्ये प्रत्येक अवतारातील कार्यांचा समावेश आहे. हे कलियुग अत्यंत वाईट आहे. ह्यामध्ये प्रेमाचा अभाव आहे. हा अवतार प्रेमावर अधिष्ठित नूतन विश्वाची निर्मिती करण्यासाठी भूतलावर आला आहे. 

१ ऑगस्ट २००९ ध्यान 

वसंता - स्वामी, मला आता हे सहन करणे अशक्य झाले आहे. तुमच्याशिवाय माझे मन कशालाही स्पर्श करत नाही. तुम्ही मला कधी बोलावणार ? 

स्वामी - रडू नकोस, लवकरच आपण एकमेकांना भेटू. मी नक्की तुला बोलावेन. 

स्वामी आणि मी स्वर्गात गेलो. अनेक देवदेवता, ऋषी मुनी तेथे आले अगस्त्य ऋषी म्हणाले," हे सर्व अवतारकार्यासाठी घडत आहे. सर्वांनी आपापल्या तपोबलाचा एक भाग ह्यासाठी दिला आहे. काळजी करू नका सर्व ठीक होईल. 

आता आपण स्वामी काय म्हणाले हे तपशीलवारपणे पाहु  या. स्वामी म्हणाले सर्व देवदेवता, ऋषी, चिरंजीवी आणि अन्य जगतातून आलेले सर्व ह्यांनी वैश्विक कर्मांसाठी  त्यांच्या तपोबलाचा एक भाग दिला आहे. वैश्विक कर्मांचा संहार हे प्रचंड महान कार्य आहे. इतर अवतारातील कार्यांसारखे नाही. कोणीही कर्मकायद्याचे उल्लंघन करू शकत नाही. तथापि सर्वांच्या कर्माचा संहार व्हायलाच हवा. मग हे कार्य पूर्ण कसे होणार ? केवळ प्रत्येकाच्या कर्मांचा समतोल राहवूनच हे कार्य करणे शक्य होईल. ह्या कार्याच्या पूर्णत्वासाठी चौदा भुवनांमध्ये वास करणाऱ्या प्रत्येकाने आपापल्या तपोबलाचा एक भाग देऊ केला आहे. हा सर्वांचा एक संयुक्त प्रयास आहे. 

             ७० वर्षांच्या वियोगामुळे परमेश्वर आणि त्याच्या शक्तीला शारिरीक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. देव, ऋषी व अन्य लोकांमधील रहिवास्यांनी कर्मांच्या तराजूच्या समतोल राखण्यासाठी त्यांच्या तपोबलाची शक्ती दिली. विरहाच्या वेदनांनी मी विलाप करत असल्यामुळे ऋषींनी येऊन माझे सांत्वन केले. हजारो वर्षांपूर्वी हा संकल्प करण्यात आला होता. त्यामुळे ऋषिंनी माझ्या आणि स्वामींच्या नाडीमध्ये हे लिहून ठेवले आहे. मी स्वामींना ह्याविषयी विचारल्यावर ते म्हणाले " अनेक वर्षांपूर्वी हा संकल्प केला होता. म्हणून तो नाडीग्रंथांमध्ये लिहला आहे. हे महत्कार्य असल्यामुळे, हे ह्याच पद्धतीने घडले पाहिजे. "

            अनेक चतुर्युग लोटली. तथापि आताचे कलियुग ह्यासाठी योग्य काल आहे. गत युगामध्ये वृत्रासूराचा वध करण्यासाठी दधिची ऋषिंनी प्राणार्पण केले.त्यानंतर इंद्राने त्यांच्या मेरुदंडापासून असूरांचा वध करण्यासाठी वज्रास्त्र बनवले. ही वेगळी कथा आहे. जगातील कोट्यवधी लोकांच्या कर्मांचा संहार करणे ही काही सोपी गोष्ट नव्हे. हे अवतारिक कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी १४ भुवनातील लोकांनी त्यांचे एक भाग तपोबल दिले. १० वर्षांपूर्वी  ऋषिंनी स्वामींच्या आणि माझ्या नात्याचे अशंतः वर्णन केले होते. त्यांनी मुक्ती निलयमविषयीही लिहले होते. आता १० वर्षांनंतर अधिक उघड करत आहेत. स्वामींच्या नाडीमध्ये हे स्पष्ट लिहिले आहे की स्वामी आणि मी आम्ही जगत् पिता व जगत् माता आहोत. ह्या पालकांच्या वियोगामुळे जगातील सर्वजण दुःख भोगत आहेत. त्यांचा योग झाल्यावर जगामधील दुःखांचा अंत होईल. तथापि आम्हा दोघांची भेट होण्यामध्ये वैश्विक कर्मांचा अडथळा येत आहे. परिणामतः देवांना व ऋषिंना आपले तपोबल द्यावे लागले. स्वामींचे अवतार कार्य यशस्वी होण्यासाठी आपण एकजूट व्हायला हवे हे त्यांना माहित आहे. अज्ञानामुळे जगातील लोकांनी आम्हाला विलग केले. आता देव, ऋषी व १४ भुवनांमध्ये  वास करणाऱ्यांनी, स्वामी आणि मी, आम्हा दोघांची भेट होऊन वैश्विक कर्मांचा संहार करण्यासाठी एक मार्ग शोधून काढला आहे. 

*****

संदर्भ - श्री वसंतसाईंच्या ' SatyaSai Baba - 10 Avatars in 1 ' ह्या पुस्तकातून. 

जय साईराम 

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

जन्मदिन संदेश 

वसंतामृतवाणी 

आपण आपल्या जीवनामध्ये कोणत्या तत्वांचे अनुसरण करावे ह्या विषयी भगवान श्री सत्यसाई बाबांनी त्यांच्या संदेह निवारिणी ह्या पुस्तकामध्ये थोडक्यात दिले आहे. 

मनुष्याने जीवनामध्ये अनुसरण करावीत अशी काही महत्त्वाची तत्त्व मी खाली देत आहे. 

१. प्रेम हा जीवनाचा श्वास आहे असा विश्वास बाळगा. 

२. प्रेम हाच परमात्मा आहे जो सर्व गोष्टींकडे समत्वाने पाहतो. 

३. प्रत्येकामध्ये तो एकच परमात्मा प्रेमरूपामध्ये विद्यमान आहे. 

४. ज्यांना परमानंद प्राप्त करण्याची इच्छा आहे त्यांनी इंद्रियसुखांचा पाठपुरावा करू नये. 

५. जीवनदायी श्वासासारखे सत्याचे अनुसरण करावे. जसे मृत शरीर काही तासातच कुजते व शरीराला दुर्गंध सुटते तसे सत्याविना जीवन हे जीवनासाठी अयोग्य असेल व दुर्गंधीने भरलेले असेल. 

६. सत्याहून अधिक श्रेष्ठ असे काहीही नाही . सत्याहून अधिक मूल्यवान असे काहीही नाही. सत्याहून अधिक मधुर असे काहीही नाही. सत्य शाश्वत आहे. 

७. सत्य हाच परमेश्वर, जो तुमचे सर्वांपासून संरक्षण करतो. सत्याहून अधिक श्रेष्ठ असा कोणीही रक्षणकर्ता नाही. सत्यस्वरूप परमेश्वर सत्यवाक आणि प्रेमाने ओथंबलेले हृदय असणाऱ्यांना त्याचा धर्म प्रदान करतो. 

८. सर्व जीवांना प्रेम आणि करुणा द्या. निःस्वार्थ जीवन जगा. 

९. प्रत्येकाने इंद्रिय नियंत्रण करणे सद्गुणांची जोपासना करणे आणि अनासक्त वृत्ती अंगी बाणवणे आवश्यक आहे. 

१०. करू नयेत अशा ४ गोष्टी - परनिंदा करणे इतरांमधील चुका अथवा दोष दर्शवणे, एखाद्याच्या अनुपस्थितीत त्याची निंदा करणे. वायफट बडबड करणे. 

११. देहाद्वारे केलेली ५ पातके - हत्या, चोरी, लबाडी, अमली पदार्थांचे व्यसन मांसाहार ज्यांना उदात्त जीवन जगायचे आहे त्यांनी ह्या सर्व गोष्टी टाळल्या पाहिजेत. 

१२. ८ प्रकारची मानसिक पातके - काम (इच्छा), क्रोध, लोभ , मोह, मद , मत्सर , सुरवासीनता आणि द्वेष . इतरांचा उत्कर्ष पाहून त्यांचा मत्सर करू नका व इतरांना त्रास देऊ नका. 

१३. इतरांच्या आनंदात आपण आनंद मानला पाहिजे. 

१४. रंजल्या गांजल्यांविषयी मनामध्ये करुणा बाळगा व त्यांच्यासाठी प्रार्थना करा. त्यांना मदत करा. असे केल्याने भगवानांप्रती प्रेम वृद्धींगत होते. 

१५. केवळ सबूरी मनुष्याला आवश्यक तेवढी शक्ती प्रदान करते. 

१६. ज्यांना आनंदी राहण्याची इच्छा आहे त्यांनी नेहमी सत्कर्म केली पाहिजेत. 

१७. मनुष्याने प्रेमाने क्रोधावर, विवेकाने आसक्तीवर, सत्याने असत्यावर, मंगलाने अमंगलावर आणि दानाने लोभावर विजय मिळवला पाहिजे. 

१८. दुर्जनांच्या अपशब्दांना प्रतिउत्तर देऊ नका. त्यांच्यापासून दूर राहा. त्यांच्याशी संपर्क ठेवू नका. हे तुमच्यासाठी हितकारक आहे. 

१९. तुमच्या अहंकाराचा त्याग करा. नेहमी सत् संगतीत राहा. 

२०. जो मनुष्य काही राष्ट्रांना आपल्या अधिपत्यांखाली ठेवतो त्याची राजा म्हणून प्रशंसा केली जाते तथापि जो आपल्या इंद्रियांना नियंत्रणाखाली ठेवतो त्याची विश्वेश्वर म्हणून प्रशंसा केली जाते. 

२१. मनुष्याने केलेल्या चांगल्या वाईट कर्मांचे परिणाम त्याच्यापर्यंत निश्चित पणे पोहोचतात. त्यामध्ये काहीही बदल होऊ शकत नाही. 

२२. मनामध्ये कुविचार येता क्षणीच त्याचा समूळ नाश करा अन्यथा तुमचे जीवन नरक बनून जाईल. 



 

जय साईराम 

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

अम्मांची अष्टोत्तरशत नामावली 


१. ॐ श्री साई ॐ साई प्रियै नमः 

अर्थ - साई प्रिया वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


२. ॐ श्री साई ॐ साई हृदयकमल वासिन्यै नमः 

अर्थ - साईंच्या हृदय कमलामध्ये वास करणाऱ्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


३. ॐ श्री साई ॐ साई लोकक्षेम संरक्षकायै नमः 

अर्थ - लोक कल्याणाचे रक्षण करणाऱ्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


४. ॐ श्री साई ॐ कर्म संहारिण्यै नमः 

अर्थ - कर्मसंहार करणाऱ्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


५. ॐ श्री साई ॐ पापविमोचनीयै नमः 

अर्थ - पापविमोचन करणाऱ्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


६. ॐ श्री साई ॐ साईप्रिय वदनीयै नमः 

अर्थ - ज्यांचे दिव्य वदन साईंना प्रिय आहे त्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


७. ॐ श्री साई ॐ मोक्ष प्रदायिन्यै नमः 

अर्थ - मोक्ष प्रदान करणाऱ्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


८. ॐ श्री साई ॐ निर्मल हृदयायै नमः 

अर्थ - निर्मल हृदयी वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


९. ॐ श्री साई ॐ ज्ञान दायिन्यै नमः 

अर्थ - ज्ञान प्रदान करणाऱ्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


१०. ॐ श्री साई ॐ सत्यधर्म चारिण्यै नमः 

अर्थ - सत्य आणि धर्माच्या मार्गावरून वाटचाल करणाऱ्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


११. ॐ श्री साई ॐ  भवभय हारिण्यै नमः 

अर्थ - भौतिक जीवनातील भवभयाचा नाश करणाऱ्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


१२. ॐ श्री साई ॐ प्रेमामृत वारिण्यै नमः 

अर्थ - प्रेमामृताचा वर्षाव करणाऱ्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


१३. ॐ श्री साई ॐ ज्ञानाग्निदायिन्यै नमः 

अर्थ -  ज्ञानाग्नि चेतवून ज्ञानाची तृषा पूर्ण करणाऱ्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


१४. ॐ श्री साई ॐ आश्रित रक्षकायै नमः 

अर्थ - शरणागताचे रक्षण करणाऱ्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


१५. ॐ श्री साई ॐ नवदुर्गायै नमः 

अर्थ - नवदुर्गा रूपिणी वसंतसाईंना माझा नमस्कार असो!


१६. ॐ श्री साई ॐ आनंदरुपिण्यै नमः 

अर्थ - सत् चित् आनंद स्वरूप वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


१७. ॐ श्री साई ॐ नवरत्नखचित सिंहासनाय नमः 

अर्थ - नवरत्नखचित सिंहासनावर विराजित वसंतसाईंना माझा नमस्कार असो ! 


१८. ॐ श्री साई ॐ सर्वाभीष्ट प्रदायिन्यै नमः 

अर्थ - सर्व इष्ट मनोकामनांची पूर्ती करणाऱ्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


१९. ॐ श्री साई ॐ मधुरवाक् देवतायै नमः 

अर्थ - मधुर वाग्देवता वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


२०. ॐ श्री साई ॐ आदी-अंत रहितायै नमः 

अर्थ - आदी अंत रहित वसंतसाईंना माझा नमस्कार असो!


२१. ॐ श्री साई ॐ सुंदर मुखारविंदायै नमः 

अर्थ - सुंदर कमलवदनी वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


२२. ॐ श्री साई ॐ त्रिनेत्र ललाटायै नमः 

अर्थ - ललाटी तिसरा नेत्र (ज्ञानचक्षु) धारण करणाऱ्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


२३. ॐ श्री साई ॐ कमलाक्षियै नमः 

अर्थ - कमल नयनी वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


२४. ॐ श्री साई ॐ सिंदुरवर्ण अधर शोभितायै नमः 

अर्थ - कुंकवासम लाल अधरांनी सुशोभित असणाऱ्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


२५. ॐ श्री साई ॐ प्रणवाधारायै नमः 

अर्थ - ॐकाराचा स्रोत असणाऱ्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


२६. ॐ श्री साई ॐ निष्कलंक हृदयायै नमः 

अर्थ - निरागस आणि निष्कलंक हृदयी वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


२७. ॐ श्री साई ॐ अपरूप देहिन्यै नमः 

अर्थ - अपूर्व देह धारिणी वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


२८. ॐ श्री साई ॐ पवित्रात्म देहिन्यै नमः 

अर्थ - पवित्र देह व पुण्य आत्मा धारिणी वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


२९. ॐ श्री साई ॐ सृष्टी-स्थिती-लय नमः

अर्थ - सृष्टीची निर्मिती, पालन व लय करणाऱ्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


३०. ॐ श्री साई ॐ षड्गुण संपन्नायै नमः 

अर्थ - षड्गुणांचे भांडार, वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


३१. ॐ श्री साई ॐ अपमृत्यु नाशकायै नमः 

अर्थ - अकाल मृत्युस प्रतिबंध करणाऱ्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


३२. ॐ श्री साई ॐ मातृदयारुपिण्यै नमः 

अर्थ - वात्सल्यस्वरूप वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


३३. ॐ श्री साई ॐ त्रिलोक मातायै नमः 

अर्थ - त्रिलोक माता वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


३४. ॐ श्री साई ॐ साधनाप्रियै नमः 

अर्थ - आध्यात्मिक साधना अत्यंत प्रिय असलेल्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


३५. ॐ श्री साई ॐ साधकप्रियै नमः 

अर्थ - आध्यात्मिक साधकावर अतीव प्रेम करणाऱ्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


३६. ॐ श्री साई ॐ मुक्तिस्थल वासिन्यै नमः 

अर्थ - मुक्तीस्थली वास करणाऱ्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


३७. ॐ श्री साई ॐ नववेद मार्ग स्थापनायै नमः 

अर्थ - नूतन वेद मार्ग स्थापित करणाऱ्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


३८. ॐ श्री साई ॐ चतुर्वेद स्तुत्यै नमः 

अर्थ - चारही वेदांनी वंदित आणि पूजीत वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


३९. ॐ श्री साई ॐ अतिअद्भुत चर्यायै नमः 

अर्थ - अति अद्भूत दिनचर्या असणाऱ्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


४०. ॐ श्री साई ॐ सर्व देवता स्वरूपायै नमः 

अर्थ - सर्व देवता स्वरूप वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


४१. ॐ श्री साई ॐ दुरित निवारिण्यै  नमः 

अर्थ - त्वरित दुःख निवारण करणाऱ्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


४२. ॐ श्री साई ॐ नित्यानंदलयायै नमः 

अर्थ - शाश्वत आनंदात तादात्म्य पावलेल्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


४३. ॐ श्री साई ॐ क्षर-अक्षर रूपिण्यै नमः 

अर्थ - आपल्या अलौकिक ज्ञानाने अज्ञान नष्ट करणाऱ्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


४४. ॐ श्री साई ॐ मोहक्षयायै नमः 

अर्थ - मोहक्षय करणाऱ्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


४५. ॐ श्री साई ॐ प्रेममार्ग बोधकायै नमः 

अर्थ - प्रेममार्गाचा बोध करून देणाऱ्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


४६. ॐ श्री साई ॐ चंचलनाशकायै नमः 

अर्थ - मनाच्या चंचलतेचा नाश करणाऱ्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


४७. ॐ श्री साई ॐ शूलपाणिन्यै नमः 

अर्थ - त्रिशूळ धारीणी वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


४८. ॐ श्री साई ॐ स्वयंज्योती प्रकाशिन्यै नमः 

अर्थ - स्वयं  ज्ञानज्योतीने प्रकाशित वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


४९. ॐ श्री साई ॐ स्वयंभूलिंग आवाहनायै नमः 

अर्थ - प्राणशक्तीने स्वयंभू लिंगास आवाहन करणाऱ्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


५०. ॐ श्री साई ॐ क्षीरसमुद्र आविर्भावायै नमः 

अर्थ - क्षीरसागरामधून उद्भवलेल्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


५१. ॐ श्री साई ॐ जितेंद्रियायै नमः 

अर्थ - इंद्रियांवर विजय मिळवलेल्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


५२. ॐ श्री साई ॐ मधुर मधुकर वचनीयै नमः

अर्थ - मधुर भाषिणी वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


५३. ॐ श्री साई ॐ लोकशोक निर्मुलायै नमः

अर्थ - समस्त लोकांमधील सर्व दुःखांचा नाश करणाऱ्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


५४. ॐ श्री साई ॐ नवलोक कन्यै नमः 

अर्थ - नवलोकांची कन्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


५५. ॐ श्री साई ॐ सर्व जीव दया रुपिण्यै  नमः 

अर्थ - सर्व जीवांवर करुणा करणाऱ्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


५६. ॐ श्री साई ॐ कामदहनायै नमः 

अर्थ - इच्छांचे दहन करणाऱ्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


५७. ॐ श्री साई ॐ गीताचारिण्यै नमः 

अर्थ - भगवद् गीतेची शिकवण आचरणात आणणाऱ्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


५८. ॐ श्री साई ॐ शुद्धसत्त्व स्थितायै नमः 

अर्थ - शुद्धसत्त्व स्थित वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


५९. ॐ श्री साई ॐ साई आवीर्भाग देहिन्यै नमः 

अर्थ - साईंच्या देहामधून प्रकटलेल्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


६०. ॐ श्री साई ॐ ज्ञानवैराग्य रुपिण्यै  नमः 

अर्थ - ज्ञानवैराग्य स्वरूप वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


६१. ॐ श्री साई ॐ देव गंधर्व वंदितायै नमः 

अर्थ - देव, गंधर्वांना वंदनीय असणाऱ्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


६२. ॐ श्री साई ॐ मुनिजन सेवितायै नमः 

अर्थ - ऋषी मुनी ज्यांची सेवा करतात त्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


६३. ॐ श्री साई ॐ सर्व व्यापिकायै नमः 

अर्थ - सर्वत्र व्याप्त (वसंतमयम्) वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


६४. ॐ श्री साई ॐ चिन्मय देहिन्यै नमः 

अर्थ - चिन्मय देही वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


६५. ॐ श्री साई ॐ साई चित् शक्ती स्वरूपिण्यै नमः 

अर्थ -  साईंची चित् शक्ती स्वरूपा वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


६६. ॐ श्री साई ॐ अष्टाक्षर प्रियै नमः 

अर्थ - ॐ नमो नारायणाय हा अष्टाक्षरी मंत्र प्रिय असणाऱ्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


६७. ॐ श्री साई ॐ जगनमोहन रूपायै नमः 

अर्थ -  जगतास मोहित करणाऱ्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


६८. ॐ श्री साई ॐ वेदागम अनुष्ठान प्रियै नमः 

अर्थ - वेदांमध्ये सांगितलेली धार्मिक कृत्ये प्रिय असणाऱ्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


६९. ॐ श्री साई ॐ शरणागत रक्षणायै नमः 

अर्थ - शरणागताचे रक्षण करणाऱ्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


७०. ॐ श्री साई ॐ त्रिकालज्ञान संपन्नायै नमः 

अर्थ - त्रिकालज्ञानी वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


७१. ॐ श्री साई ॐ सर्वयोग सिद्धी प्रदायिन्यै नमः 

अर्थ - सर्व योग सिद्धी प्रदान करणाऱ्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


७२. ॐ श्री साई ॐ साई स्तोत्र संतुष्टायै नमः 

अर्थ - साईनामाच्या उच्चारणाने सदा संतुष्ट असणाऱ्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


७३. ॐ श्री साई ॐ अखंडाकार रुपिण्यै नमः 

अर्थ - अखंड ब्रम्हांड रूपिणी वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


७४. ॐ श्री साई ॐ वाक् अतीत प्रभावायै नमः 

अर्थ - ज्यांची थोरवी शब्दातीत आहे त्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


७५. ॐ श्री साई ॐ समस्त लोक अभय प्रदायिन्यै नमः 

अर्थ -  समस्त लोकांना अभय देणाऱ्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


७६. ॐ श्री साई ॐ समस्त लोक मुक्ती प्रदायिन्यै नमः 

अर्थ - समस्त लोकांना मुक्ती प्रदान करणाऱ्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


७७. ॐ श्री साई ॐ गीतामृत उपासिन्यै नमः 

अर्थ - गीतामृताची उपासना करणाऱ्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


७८. ॐ श्री साई ॐ साई प्रिय देवीयै नमः 

अर्थ - साईंना प्रिय असणाऱ्या देवी वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


७९. ॐ श्री साई ॐ सत्यभूषणायै नमः 

अर्थ - सत्याचे (सत्यसाईंचे) भूषण असणाऱ्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


८०. ॐ श्री साई ॐ चिदाकाश वासिन्यै नमः 

अर्थ - चिदाकाश निवासिनी वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


८१. ॐ श्री साई ॐ सर्वयाग देवतायै नमः 

अर्थ - सर्व यज्ञांची देवतास्वरूपा वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


८२. ॐ श्री साई ॐ विद्यावाहिन्यै नमः 

अर्थ - विद्या वाहिनी वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


८३. ॐ श्री साई ॐ शत्रूक्षमायै नमः 

अर्थ - आपल्या शत्रूला क्षमा करणाऱ्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


८४. ॐ श्री साई ॐ सर्वलोक पंडित पादपंकजायै नमः 

अर्थ - सर्व लोकांमधील पंडितांना, ज्यांचे चरणकमल वंदनीय आहेत त्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


८५. ॐ श्री साई ॐ सर्वभूत हितप्रियै नमः 

अर्थ - सर्व भूतांचे हित (जीवनमुक्त अवस्था ) ज्यांना प्रिय आहे त्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


८६. ॐ श्री साई ॐ साई हृदयानंद दायिन्यै नमः 

अर्थ - साईंना हृदयानंद देणाऱ्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


८७. ॐ श्री साई ॐ साई सहायिनी नमः 

अर्थ - साईंना सहाय्य करणाऱ्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


८८. ॐ श्री साई ॐ पंचदशाक्षरी नमः 

अर्थ - पंचदशाक्षरी मंत्रस्वरूपा वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


८९. ॐ श्री साई ॐ तापत्रय विमोचनायै नमः 

अर्थ -  त्रिविध तापांचे विमोचन करणाऱ्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


९०. ॐ श्री साई ॐ साई जीवनायै नमः 

अर्थ - स्वामींची प्राणस्वरूपिणी वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


९१. ॐ श्री साई ॐ त्रिलोक कुटुंबिन्यै नमः 

अर्थ - त्रिलोकास आपले कुटुंब मानणाऱ्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


९२. ॐ श्री साई ॐ स्वर्णनिलय वासिन्यै नमः 

अर्थ - सुवर्ण निलयवासिनी वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


९३. ॐ श्री साई ॐ तेजोमयायै नमः 

अर्थ - परमतेजोमयी वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


९४. ॐ श्री साई ॐ रमणीय रुपिण्यै नमः 

अर्थ - रमणीय रूपिणी वसंतसाईंना माझा नमस्कार असो!


९५. ॐ श्री साई ॐ नवभक्ती उपासिन्यै नमः 

अर्थ - भक्तिच्या नित्य नूतन मार्गांनी उपासना करणाऱ्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


९६. ॐ श्री साई ॐ लोक परिपालिन्यै नमः 

अर्थ - समस्त लोकांचे परिपालन करणाऱ्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


९७. ॐ श्री साई ॐ राधारुपिण्यै नमः 

अर्थ - राधा रूपिणी वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


९८. ॐ श्री साई ॐ अपराजितायै नमः 

अर्थ - अपराजिता वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


९९. ॐ श्री साई ॐ साई बंधनायै नमः 

अर्थ - साईंना आपल्या प्रेमपाशात बद्ध करणाऱ्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


१००. ॐ श्री साई ॐ सत् चित् आनंद स्वरूपिण्यै नमः 

अर्थ - अखंड सत् चित् आनंद स्वरूपिणी वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


१०१. ॐ श्री साई ॐ साई शिरसालंकृत स्यमंतकमणी नमः 

अर्थ - साईंच्या मुकुटातील शोभायमान स्यमंतकमणी असणाऱ्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


१०२. ॐ श्री साई ॐ साई नयन दीक्षन्यै नमः 

अर्थ - साईंचे पूर्ण सत्य ग्रहण करणारे नेत्र असणाऱ्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


१०३. ॐ श्री साई ॐ साई नासिवासिन्यै नमः 

अर्थ - साईंच्या श्वासात वास करणाऱ्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


१०४. ॐ श्री साई ॐ साई सत्यवाक् रुपिण्यै नमः 

अर्थ - साईंची सत्य वाणी स्वरूपा वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


१०५. ॐ श्री साई ॐ साई कर्णामृतध्वनीयै नमः 

अर्थ - ज्यांचा ध्वनी साईंना कर्णामृतासारखा आहे त्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


१०६. ॐ श्री साई ॐ साई उदरव्यापिकायै नमः 

अर्थ - साईंद्वारे पूर्ण प्रपंच उदरात धारण करणाऱ्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


१०७. ॐ श्री साई ॐ साई हस्तभूषणायै नमः 

अर्थ - साईंचे हस्तभूषण असणाऱ्या वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


१०८. ॐ श्री साई ॐ साई पादधुलिका नमः 

अर्थ - साईं चरणाकमलांची धुलिका वसंतसाईंना माझा नमस्कार असो !


जय साईराम 



गुरुवार, २२ ऑक्टोबर, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

         " आपल्या मार्गात अनेक अडथळे आले तरी आपण आपला धर्म (स्वधर्म), सदाचरण याच्याशी निष्ठवंत राहिले पाहिजे."

भाग - नववा 

आत्मगीते 

थकले मी आता, निसटला पुन्हा तो माझ्या हातून 

संघर्ष माझा पाहून, सागराने बांधिल्या त्याच्या हस्त लहरी 

झाले सारे शांत, स्तब्ध 

त्या नितळ पाण्यात शोध घेता घेता 

अवचित पाहिले मी माझेच प्रतिबिंब 

कोण आहे ती ? ती मी आहे ?

नाही ! नाही !


कोठे गेले माझे काळेभोर कुरळे केस ?

रंग कोणी फसला त्यावर सफेद ?

दृष्टी वळविता मी आकाशात 

दर्शवित होते कालचक्र, सन दोन हजार आठ 

स्मरण झाले मज 

किनाऱ्यावर आले मी त्यावेळी होते सन एकोणीसशे एकसष्ट 

पाहता पाहता सरली वर्षे सत्तेचाळीस 


पुन्हा दृष्टीस पडला माझ्या तो नीलकृष्ण मासा 

समीप आला तो, माझ्या समोर 

ओंजळीत घेतले मी त्यास 

परि पुन्हा निसटला तो माझ्या पकडीतून 

प्रतीक्षा ! अजून किती प्रतीक्षा ?

*   

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

रविवार, १८ ऑक्टोबर, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

       " सर्वकाही परमेश्वर आहे. प्रत्येक गोष्ट परमेश्वराचेच रूप आहे. तेथे केवळ परमेश्वरच आहे अन्य काही नाही. "

भाग नववा 

आत्मगीते 

ओंजळीत घेतले मी त्यास 

पंखावर चमचमती सुवर्ण अक्षरे 

' ब्रम्हस्थिती '

नको, नको मला. मी दूर सारिले !

पुसता त्यासी ' मेनका तर नव्हेस तू माझा तपोभंग करणारी ?

अदृश्य झाला तो .... 


दूरवर दिसत होता एक मासा 

हे काय ? एक मासा आहे का दोन ?

नाही ! जुळा मासा ! ' शिव - शक्ती ' मासा 

अतिसुंदर, मनोहर, दुर्मिळ मासा 

त्यासही मी सारिले दूर. जा ! जा ! नको मला 


अखेर आला एक नीलकृष्णवर्णी मासा 

पाऊलासम आकार त्याचा 

सागरातून उचलून पकडले मी त्यास 

डोळ्यात साठविली मी, त्याची शुचिता 

निसटला तो हातून माझा 

धावून त्याच्या पाठी, पकडले पुन्हा मी त्यास 

' हे मधुरिमा, सोडून जाऊ नकोस मज ' 

पकडले पुन्हा मी त्यास 

पकडला. अरे ! निसटला, पकडला अरे ! निसटला. 


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 


गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" अनासक्त जीवन जगणे म्हणजेच मुक्ती होय."

भाग नववा 

आत्मगीते 

दुसरा एक सुंदर मासा दिसला मज 

मनमोह, रंगाची सरमिसळ 

त्या नूतन माशास ना पकडू शके कोणी 


ओंजळीत घेतले मी त्यास अन् 

पाहुनी थक्क झाले 

'वेदांच्या पलीकडे '

नाही ! नाही ! तो मी फेकिला दूर 

जनास भासले, वेडीच मी 


डोळ्यात तेल घालुनी 

उभी सागर किनारी मी 

प्रतीक्षेत महामाशाच्या 

तितुक्यात आला तेथे एक द्विपंखी महामासा 

आकर्षक चुंबकासम सोनसळी मासा 

गिरक्या घेई तो माझ्याभोवती 


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 


रविवार, ११ ऑक्टोबर, २०२०

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

         " मृत्युनंतर प्राप्त झालेल्या मोक्षाचा काय उपयोग ? मृत्युनंतर कोणी मोक्षप्राप्ती अनुभवू शकतो का ? साई आनंदापुढे कोणताही स्वर्गीय आनंद फिकाच आहे. साईमधुर अमृताची इथेच या क्षणी अनुभूती घ्या." 

भाग - नववा 

आत्मगीते 

सागर किनारा 

अनेक मासे इकडून तिकडे जात आहेत 

किनाऱ्यावर उभी मी 

एका महामाशाच्या प्रतीक्षेत 


नाम त्याचे कान्हा 

वर्ण त्याचा श्यामल 

दृष्टीस पडे माझ्या एक सुंदर मासा 

सौंदर्य असे ना देखिले डोळा 


ओंजळीत घेतले मी त्यास 

' उपनिषदांच्या पलीकडे ' 

नाही ! नाही ! तो मी फेकिला दूर 


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

गुरुवार, ८ ऑक्टोबर, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

     " तेलाच्या संततधारेसारखे आपणही अखंड परमेश्वराचे चिंतन केले पाहिजे."

भाग - नववा 

आत्मगीते 

सापळा 

स्वामींचे ओझरते दर्शन 

नाही पुरेसे मानवजातीस 

चतुर मानवी मन 

मार्ग शोधी नवनूतन 

परमेश्वरास पकडण्या 

रचिला त्याने एक सापळा 


कोणता सापळा ?

' युवा परिषद ' 

तीन तास उपस्थिती परमेश्वराची !

अशी ही चतुराई मानवाची 

परमेश्वराच्या चतुराईचे काय ?


त्यानेही रचिला एक सापळा 

तरुणाईला पकडण्यास 

प्रेम,प्रेम ,प्रेम हाचि सापळा 

युवा कार्यक्रम , युवकांचा सापळा 

परमेश्वराची उपस्थिती ' त्यांचा ' सापळा !


परमेश्वराने त्यांना पकडले 

परमेश्वरास त्यांनी पकडले 

किती मनोहर दृश्य हे !

*

उर्वरित प्रकरण पुढील भागात..... 

जय साईराम   

रविवार, ४ ऑक्टोबर, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" परमेश्वर केवळ शुद्ध, निष्कपट हृदयामध्ये वास करतो. "

भाग - नववा 

आत्मगीते 

हे प्रभू, जर मी क्रिकेट खेळाडू असते 

तर माझे मूळ तुमच्या मांडीवर असते 

हे प्रभू, जर मी व्ही.आय. पी. च्या घरातील नोकराणी असते 

तर मला तुमचे सहज दर्शन झाले असते

हे प्रभू, जर मी महान भक्ताच्या घरचे श्वान असते 

तर मला दररोज तुमचे दर्शन, स्पर्शन मिळाले असते 

हे प्रभू, जर मी तुमच्या घरची रखवालदार असते 

तर मला दरवेळी तुमचे दर्शन झाले असते 

हे प्रभू, जर मी तुमच्या दरबारातील कवी असते 

तर मी तुमच्या बाजूला आसनावर बसले असते 

हे प्रभू, जर मी सिनेस्टार असते 

तर मी तुमची गाडी थांबवली असती 

हे प्रभू, जर मी कोणी महाराणी असते 

तर मला तुमच्यासमोर बसायला मिळाले असते 

हे प्रभू, जर मी एक सिनेगायिका असते 

तर ' तुम्ही सेवादलाकरवी बोलवाल ' या प्रतीक्षेत असते 

हे प्रभू, जर मी तुमच्या गाडीची सीट असते 

तर मला तुमच्या चरणांचे दर्शन, स्पर्शन मिळाले असते 

हे प्रभू, या विश्वात का मी जन्मले खेडूत स्त्री होऊन ?

जर मी पुरुष असते,

तर आज माझी सर्व पुस्तके तुमच्या प्रशांती निलयममध्ये असती 

*    

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

गुरुवार, १ ऑक्टोबर, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" अनासक्त जीवन जगणे म्हणजेच मुक्ती होय."

भाग - नववा 

आत्मगीते 

अलीकडच्या कविता आणि गीते 

         आधीच्या कविता ३० वर्षांपूर्वी लिहिल्या होत्या. खालील काही कविता अलीकडे लिहिलेल्या आहेत. यातील ' जर मी ..... ' आणि ' सापळा ' या कविता मी पुट्टपर्तीमध्ये स्वामींच्या दर्शनासाठी प्रतीक्षा करताना इंग्रजीमध्ये लिहिल्या आहेत. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम