ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
पुष्प - ३७
दिव्य किरणे
स्वामींनी सत्यसाई स्पीकस् ( भाग -२ पान क्र - २६० ) मध्ये मध्ये म्हटले आहे. " माझ्यामधून उद्भवणाऱ्या किरणांची तीन प्रकारात वर्गवारी होते. स्थूल किरणे, जी प्रशांती निलयमल व्यापून टाकतात. स्थूल किरणे पृथ्वीला व्यापून टाकतात आणि कारण किरणे अखिल विश्वाला व्यापून टाकतात. प्रशांती निलयम मध्ये राहणारे लोकं भाग्यवान आहेत कारण ते कारण किरणांच्या खूप निकट आहेत. स्थूल किरणे मनुष्याला साधक बनवतात; किरणे त्याला महात्मा बनवतात आणि किरणे त्याला परमहंस बनवतात.
ध्यान
वसंता : स्वामी , तुमची किरणे तीन प्रकारे कार्य करतात. येथे मला ते कसे लागू होते ?
स्वामी : तू माझी शक्ती आहेस. माझे पुर्णम् तुझ्याद्वारे कार्य करते. येथे माझे तेजस्वरूप कोटिसूर्यांसम आहे. हे माझ्या शक्तीचे स्थान आहे. अवतारकार्याच्या परिपूर्तीचे हे स्थान आहे. मी येथे आहे. हे माझे मूळ निवासस्थान आहे. येथे तुझ्याद्वारे माझी किरणे सर्वत्र भरून राहिली आहेत. ही ती ऊर्जा आहे जी स्तूपीद्वारे संपूर्ण जगतात बदल घडवते.
जेव्हा परमेश्वर भूतलावर अवतरतो, तेव्हा त्याची स्थूल किरणे अवकाशास व्यापून टाकतात. जे त्यांच्या स्थूलरूपाची भक्ती करतात त्यांना लाभ होऊन ते साधक बनतात. साधनेत प्रगती करणाऱ्यांना त्यांच्या सूक्ष्म किरणांचा लाभ होतो. उच्च पातळीवरील ह्या साधकांना त्यांच्या स्थूलरूपाच्या दर्शनाची गरज वाटत नाही.
त्याच्या पुढच्या पातळीवरील लोकं स्वामींची कारण किरणे परिग्रहण करतात. स्वामी त्यांच्या स्थूलरूपापुरते मर्यादित नसतात ते सर्वसाक्षी आहेत. अखिल विश्वाला व्यापून राहिले आहेत. ज्याला ह्या सत्याचा साक्षात्कार झाला आहे त्यांच्याकडे ही किरणे आकर्षून घेण्याची शक्ती असते. त्यानंतर ते महात्मा अवस्थेतून परमहंस पदाला पोहोचतात. माझी अवस्था कोणती आहे ? मी शक्ती अवस्थेत आहे. हे शक्तीचे स्थान आहे. मुक्ती निलयममध्ये महाकारण किरणे आहेत, दिव्य किरणे आहे. येथे स्थूल सूक्ष्म व कारण किरणे नाहीत. हे स्वामींचे परमधाम आहे, हे वैकुंठ आहे. येथे ते त्यांच्या पूर्ण तेजामध्ये आहेत. हे त्यांच्या अवतारकार्यामध्ये स्थान आहे. पुट्टपर्ती हे त्यांचे जन्मस्थान आहे.
परमेश्वराच्या स्थूल रूपाची तुलना उगवत्या सूर्याशी केली जाऊ शकते. सर्वजण त्याकडे पाहू शकतात परमेश्वराचे सूक्ष्म रूप हे सकाळी १० वाजता तेजाने तळपणाऱ्या सूर्यासारखे असते खूप थोडे लोकं दीर्घकाळ त्याच्याकडे पाहू शकतात. ते महात्मे असतात. मध्यान्हीच्या सूर्याकडे एखाद दुसरी व्यक्तीच पाहू शकते. ते आत्मसाक्षात्कारी असतात. ह्या तीन वेगवेगळ्या अवस्थांना स्वामींनी उल्लेख केला.
येथे मुक्ती निलयममध्ये, मुक्ती स्तूपी द्वारा दिव्या किरणे परिग्रहण केली जातात आणि संपूर्ण विश्वामध्ये प्रसूत केली जातात. कलियुगाचे सत्ययुगात कसे परिवर्तन होऊ शकते ह्यावर चिंतन करून मनुष्याला ह्या महाशक्तीच्या परिसीमेचे आकलन होते.
संदर्भ - " श्री वसंतसाईंच्या Taste & Vasana ह्या पुस्तकामधून. "
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा