ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" जेव्हा आपण अखंड ईश चिंतनात असतो तेव्हा तेथे देह भावाला थारा नसतो. प्रेम आपला देह बनून जातो. "
भाग - नववा
आत्मगीते
हे पूर्णम् गोंधळून टाकणारे आहे. ही ना फुलपाखराच्या पंखांची फडफड आहे ना पापण्यांची ! ही धडधड आहे प्रभू परमेश्वराच्या हृदयाची ! हे पूर्णम् मला सुद्धा तिच्या प्रेमात पाडते. हे पूर्णम् सर्वांशी एक होते.
" प्रेमा ! " आईने हाक मारली.
लगबगीने येत ती म्हणाली , " आले, आले ....."
तिच्या आवाजातले माधुर्य जणूकाही मोतीच घरंगळत आहेत. ते घरंगळणे घोषित करत, " ती पूर्णम् आहे. " थोड्या वेळाने मला तिचा पदरव ऐकू येतो. तिच्या पदन्यासामधील उपजत तालबद्धता तिचे पूर्णम् दर्शवते.
तिच्या येण्याची जाणीव नसल्यासारखे दाखवत मी खिडकीतून बाहेर पाहत राहिलो. रेशमी हातांनी माझे डोळे झाकले. बावनकशी सुवर्णस्पर्श माझ्या देहात प्रवाहित झाला. त्या स्पर्शातून शब्द उसळी मारून वर आले, " माझी प्रेमा !"
" तुम्ही खिडकीतून काय पाहताय ?"
मी खिडकीतून एक चमकती वीज पाहिली, त्यामध्ये मला पूर्णम् दिसले. सर्वत्र पूर्णम अनुभवण्याचा स्वभावच पूर्णम आहे. स्पर्शभाव जन्मास कारण असतो. तिचा स्पर्शभाव पूर्णम आहे. म्हणून प्रत्येक कृतीतून पूर्णम् प्रकट होत राहतो. ती सर्वांना पूर्णम् दर्शवित आहे आणि सर्वांना तिच्यासह पूर्णम् कडे घेऊन जात आहे.
तुमचा
राजा
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा