गुरुवार, २८ जानेवारी, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

        " मन आणि इंद्रिये ईश्वराभिमुख करण्यासाठी कठोर साधना करणे अनिवार्य आहे."

भाग - नववा 

आत्मगीते 

          ती बोलत नाही तरीही तिची एक नजर, एक हालचाल, एक पाऊल, एक स्मित, एक हास्य यांमधून पूर्णत्व ओसंडून वाहत आहे. या पुर्णम् मुळेच आपण तिच्याकडे खेचले जातो. पूर्णमच्या आकर्षणाची शक्ती गुरुत्वाकर्षण शक्तीहून अधिक सामर्थ्यशील आहे. मी विनाकारणच तिच्या अवतभवती फिरत असतो. हे सुद्धा त्या चुंबकाचे आकर्षण आहे. तुम्ही तुमच्या बहिणीचा हात माझ्या हातात देण्यासाठी अत्यंत व्याकुळतेने तप केलेत. तुम्ही या नवयुवतीचे पूर्णम् जाणता का ?

            मी खिडकीत बसून हे पत्र लिहितो आहे. ती बागेत फुलं तोडते आहे. त्या फुलांनी स्त्रीरूप घेतले आहे का स्त्रीने फुलाचे रूप घेते आहे ? तिचे पूर्णम् मलाही संभ्रमित करते आहे. पाहा ! पाहा ! एक फुलपाखरू तिच्याजवळ आले आहे. ती कुतूहलाने त्याच्याकडे पाहते आहे. तिच्या पापण्या फडफडत आहेत. ती फुलपाखराच्या पंखांची फडफड आहे की तिच्या पापण्यांची ?   

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा