ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
पुष्प - ४३
गर्भवासम
भगवान श्री सत्यसाई बाबांनी मुक्ती निलयम विषयी ध्यानामध्ये सांगितले.
" हे एक अत्यंत शक्तिशाली आणि दिव्य स्थान आहे. येथे या , ..... ध्यान करा ह्या तुमच्या चरणांनी ह्या भूमीला स्पर्श करा व तिच्या शक्तीची अनुभूती घ्या. प्रत्येक क्षणी तुम्हाला शुद्ध दिव्यत्वाची जाणीव होईल. "
मुक्ती निलयम मधून केल्या जाणाऱ्या सामाजिक सेवेबरोबर, जगातील सर्व लोकांना परमेश्वराचे प्रेम खाऊ घातले जाते. आगामी येणाऱ्या सत्ययुगासाठी व वैश्विक मुक्तीसाठीही येथे सेवाकार्य केले जाते. मनुष्याच्या मन, देह आणि आत्मा ह्या त्रिकरण रोगासाठी येथे सेवा उपक्रम केले जातात. भूक हा देहाचा रोग आहे. त्यासाठी आम्ही अन्नदान करतो. मनाच्या विकारांसाठी कोणती सेवा केली पाहिजे ? अज्ञान हा मनाचा विकार आहे. ह्या विकाराचे निर्मूलन करण्यासाठी आम्ही खेड्यांमधील शाळांमध्ये मोफत वह्या पुरवतो, त्याचबरोबर मोफत गणवेश देतो व मोफत शिकवणी केंद्र चालवतो.
आपण आता आत्म्याच्या रोगाविषयी काय ते पाहू. जन्ममृत्युच्या चक्रात फसणे हा आत्म्याचा रोग आहे. केवळ हाच महत्त्वाचा आहे. जर ह्याचे निर्मूलन केले तर कोणतीही गोष्ट आपल्यावर परिणाम करू शकणार नाही. संपूर्ण जगाला परमेश्वराचे प्रेम खाऊ घालण्यासाठी व जन्ममृत्युचे चक्र खंडीत करण्यासाठी मी जन्म घेतला आहे. जन्मापासूनच स्वामींप्रती असणाऱ्या माझ्या प्रेमाने मला वेडेपिसे बनवले. ह्या असहनीय प्रेमामुळे स्वामी माझ्याशी संभाषण करू लागले. स्वामींनी आम्हा उभयतांच्या नावांना एकत्र जोडणारा ' ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः ' हा प्रेममंत्र दिला. मला १०८ नामे प्रदान केली. मुक्ती निलयममध्ये दररोज प्रेमयज्ञ करताना आम्ही ह्या प्रेममंत्राचे उच्चारण करतो. ह्यामुळे मोक्षाच्या मार्गावरील सर्व अडथळे दूर होतात. यज्ञामधून समस्त विश्वामध्ये प्रेमभाव पसरतो. ह्या यज्ञामधील पवित्र अग्नी समस्त विश्वामध्ये हे भाव घेऊन जातो.
स्वामींनी दिलेला वसंत साई मंत्र माझ्या प्रेमाद्वारे, आपल्या सर्वांना एकत्र करतो. यज्ञाच्या दरम्यान केलेल्या उच्चारणामुळे वैश्विक मुक्तीच्या मार्गातील अडथळे दूर होतात. हा मुक्ती मंत्र आहे. ह्या मंत्राद्वारे सर्वजण परमेश्वराशी जोडले जातात आणि केवळ मानवजातच नव्हे तर सृष्टीतील प्रत्येक गोष्ट परमेश्वराशी जोडली जाते.
बाबा बायबलमधील सुवचने सांगतात,
शुद्ध अंतःकरण असणारे आणि कृपाशिर्वाद लाभलेले लोकं समस्त सृष्टीमध्ये परमेश्वरास पाहतात. ज्यांचा आत्मा शुद्ध आहे, पवित्र आहे केवळ त्यांनाच हे ज्ञात होऊ शकते. इतर पाहू शकत नाहीत, त्यांना ते जाणवू शकत नाही. स्वामी येथे आहेत परंतु स्थूल रूपात नाहीत. ते येथील वाळूच्या कणाकणात आहेत येथील प्रत्येक पानात आहेत. ते सर्वत्र आणि प्रत्येक गोष्टीतून व्यक्त होतात. ते पंचतत्वांमध्ये विद्यमान आहेत. ते आकाश, चंद्र, अग्नी आणि पृथ्वीद्वारे माझ्या लेखनाचा पुरावा देतात. साड्या, पुस्तके, संगणक, कागदाचे तुकडे ह्यामधून सत्य प्रकट होते, उघड होते.
संदर्भ - श्री वसंतसाईंच्या ' Avatar Secret ' ह्या पुस्तकातून.
जय साईराम