ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
गुरु पौर्णिमा संदेश
जन्म घेताक्षणीच जीव जगामध्ये सहभागी होण्यास सुरुवात करतो. त्याची दृष्टी त्याला त्याच्या समोर असणाऱ्या सृष्टीमध्ये रममाण होण्यास भाग पाडते. पंचतत्वे, पंचेन्द्रिये आणि त्रिगुण ह्या सर्वांद्वारे सृष्टीची रचना केली जाते. प्रकाश हा सत्वगुणाचे द्योतक आहे. कर्म हे रजोगुणाचे आणि आळस व जडत्व हे तमोगुणाचे द्योतक आहे. निसर्ग पंचतत्वांनी बनलेला आहे. हे सर्व गुण प्रत्येक जीवामध्ये विद्यमान असतात.
सृष्टीमधून जीवाला मिळणारी आनंदाची अनुभूती खरी आणि शाश्वत आहे अशा विश्वासाने तो सृष्टीमध्ये रमून जातो. जन्मामागून असे शेकडो, हजारो जन्म घेतल्यानंतर त्याला ह्या भौतिक जगतामधून आनंद मिळत नाही आणि त्याच्या विवेकबुद्धीने त्याच्या असे लक्षात येते की त्याने आतापर्यंत जे काही अनुभवले त्याहुन जीवनात अधिक काहीतरी असले पाहिजे. जेव्हा ज्ञान प्रकाशित होते, परमेश्वराच्या अस्तित्वाची जाणीव होते तेव्हा तो आध्यत्मिक मार्गावरून वाटचाल सुरु करतो. तो वेगवेगळ्या साधना व तप करून उच्च अवस्था प्राप्त करतो. ह्याच अवस्थेत त्याला सिद्धी प्राप्त होतात. त्या सिद्धिंमध्ये गुंतुन न पडता त्यांनी आध्यात्मिक मार्गावर अग्रेसर होण्यासाठी त्यांचा त्याग केला पाहिजे. जर त्याने तसे केले व त्याची साधना सुरु ठेवली तर प्रकृतीने मायेच्या शक्तिने निर्माण केलेली कसोटी त्याने पार केली असे प्रकृतीला वाटते आणि ती त्याला परमेश्वराच्या चरणाप्रत घेऊन जाते. आणि परमेश्वर त्याला मुक्ती प्रदान करतो. हे प्रकृतीचे कार्य आहे. जेव्हा जीवाला जीवनाच्या महान, उदात्त हेतूची जाणीव होते तेव्हा प्रकृती त्याला भौतिक जीवनाच्या मायेतून जागृत करून आध्यात्मिक मार्गाकडे वळवते. ती त्याला अनेक तपं, साधना करण्यास प्रवृत्त करते आणि जेव्हा तो ह्या सर्वामध्ये यशस्वी होतो तेव्हा तो मोक्षप्राप्तीसाठी परमेश्वराच्या चरणाप्रत जाण्यास पात्र ठरतो. हेच पुरुष प्रकृती तत्व आहे. हेच कार्य करणे ही मुक्ती निलयमची भूमिका आहे.
संदर्भ - श्री वसंतसाईंच्या ' Bliss Bliss Bliss Part - 2 ' ह्या पुस्तकातून .
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा