ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" जर ज्ञान आचरणात आणले नाही तर ते अपूर्ण ठरते. "
२
परमेश्वर आणि कर्मकायदा
शिवाने भस्मासुराला वर दिला. त्याने जे काही मागितले, ते सर्व, चांगले आणि वाईट असा फरक न करता शिवाने दिले. हा परमेश्वराचा दैवी गुण आहे. त्याचप्रमाणे शिवाने हिरण्यकश्यपुलाही वर दिला. हिरण्यकश्यपुने वर मिळवला होता की त्याला सकाळी किंवा रात्री, घरात अथवा घराबाहेर, मानवापासून अथवा पशुपासून, जमिनीवर किंवा पाण्यामध्ये किंवा कुठल्याही शस्त्रापासून मृत्यु येऊ नये. प्रभूनी हा वरही दिला. नेहमी कोणी काही मागितले की शिव ताबडतोब देतात. म्हणूनच त्यांना ' भोलेनाथ ' म्हणतात. पण विष्णुदेव नेहमी चतुराईने वागतात.
भस्मासूरापासून शिवाने सुटका करून घेतल्यानंतर विष्णुदेवांनी अवतरीत होऊन चतुराईने त्या राक्षसाला मारले. शिव भोळेपणाने संकटात सापडणं आणि विष्णुनी चलाखीने त्यांची सुटका करणं हे नेहमीचंच आहे. भोळेपणा हासुद्धा परमेश्वराचा दैवी गुण आहे, अवताराचा स्वभाव आहे. स्वामी माझ्या स्वभावामधून हे दर्शित करत आहेत.
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा