गुरुवार, २९ जुलै, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" केवळ सर्वसंगपरित्याग केल्याने मोक्षप्राप्ती होते. " 

२ 

परमेश्वर आणि कर्मकायदा 

दुपारचे ध्यान 

वसंता - स्वामी, मी लिहिल, " शिव भोळे तर विष्णु चाणाक्ष, शिव मागितलेले सर्व देतात. "

स्वामी - होय... शिव तुझ्यासारखे आहेत. तू शिवस्थिती प्राप्त केली आहेस. आता तू तुलाच दोघात विभाजित करून शिवशक्ती म्हणून कार्य करू लागलीयस. तुझ्याविरुद्ध वागणाऱ्यावरही तू कृपावर्षाव करतेस. विष्णुप्रमाणे मला तुझी त्यांच्यापासून सुटका करायला हवी. शिवशक्ती निर्मितीतत्व दाखवते. 

ध्यानाची समाप्ती 

         मी साधना केली, हा जीव शिव झाला. सगळे माझ्यासारखेच व्हावेत ह्या माझ्या इच्छेमुळे नवनिर्मिती होत आहे. स्वामी म्हणतात की, शिवशक्तीतत्व निर्मितीचं प्रतिनिधित्व करतं.  

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा