ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" जेथे जेथे आपली दृष्टी जाते तेथे आपले मन जाते आणि इच्छांचा उदय होतो. "
३
मन आणि विषय
मी ' डेंटल ' शब्द ऐकल्यावर काय केले ?
प्रथम मी म्हणाले," डेंटिस्टचे वडीलही डेंटिस्ट आहेत. " मी नेहमी विषयाचा उगमाशी संबंध जोडते, असेच यातून दिसते.
ही मूल भावना आहे. मी एखादा शब्द ऐकला की तो उगमाला जाऊन भिडतो. मी म्हणाले , डेंटिस्टचे वडीलही डेंटिस्ट आहेत. मुलाचे मूळ हे वडील आहेत. हा वंश आहे.
माझ मन एखादा शब्द ऐकल्याक्षणी त्या शब्दाचा उगम शोधत. परमेश्वर सर्वांच मूळ उगमस्थान आहे. म्हणूनच जेव्हा मी ' ट्रान्सेंडेंटल ' शब्द ऐकला, मी म्हणाले, "ट्रान्स ...,ओह ,जसे ट्रान्समायग्रेशन. मी सर्वांमध्ये परकायाप्रवेश करेन. " नंतर विचार केला, 'अवघ्या सृष्टीत मी परकाया प्रवेश करेन. सर्वांमध्ये केवळ माझे भाव असतील ... सर्वत्र केवळ परमेश्वर.'
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
उर्वरित प्रकरण पुढील भागात.....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा