ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" आपले अस्तित्व म्हणजे जीवनभराचे एक स्वप्न आहे हे आपण जाणले पाहिजे. "
४
विशेष कृपा
एकदा स्वामींनी त्यांचे भक्त वॉल्टर यांना जीवनदान दिले. हे विशेष कृपेचे उदाहरण आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत. ही प्रेरक चैत्यन्यशक्ती परमेश्वराला कार्य करण्यास उद्युक्त करून विशेष कृपेचा वर्षाव करते. दुसरे उदाहरण कृष्णावतारात कुब्जेने कंसाच चंदन कृष्णाला दिले. कृष्णाने तिच्यावर कृपावर्षाव करून तिचे शरीर आमूलाग्र बदलले. क्षणार्धात कुब्जा एक सुंदर स्त्री झाली. तिने श्रीकृष्णाचे दिव्यत्व जाणले होते. तिने कुठलीही भिती न बाळगता कृष्णाला कंसाच चंदन दिले, म्हणूनच कृष्णानी कुब्जेच तीन ठिकाणी वक्र असलेलं शरीर सरळ करून तिच सौंदर्य तिला बहाल केल. क्षणार्धात तिची सर्व कर्म धुतली गेली. स्पंदशक्तीने कृष्णाला हे करण्यास आतून उद्युक्त केले.
प्रत्येक अवतार मानवतेवर करुणा आणि कृपेचा वर्षाव करीत असतो. या करुणेमुळे तर अवतार पृथ्वीवर अवतरतात. सहसा हे अवतार साक्षीअवस्थेत असतात आणि कधीकधी दिव्य कृपावस्थेतून ते मानवांची कर्म धुवून टाकतात.
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा