गुरुवार, २८ ऑक्टोबर, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
     " देह सोडताना आत्मा त्याच्या कर्माचे ओझे वाहतो आणि पुन्हा पृथ्वीवर जन्म घेतो. "
विशेष कृपा 

          एक उदाहरण, अनेक वर्षांपूर्वी, स्वामी त्रिचीला मोठ्या जनसमुदायासमोर प्रवचन देत होते. त्यावेळेस त्यांनी त्या गर्दीतून एका आंधळ्या मुलाला बोलावले आणि त्याला दृष्टी दिली. सर्व अचंबित झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामी रहात होते त्या घरासमोर आंधळ्यांची बरीच गर्दी जमली. आदल्या दिवशी स्वामींनी एका मुलाला दृष्टी दिली  म्हणून सर्वजण दृष्टी मिळवण्यासाठी जमा झाले ! परंतु स्वामी मागील दरवाजाने बिल्डिंगमधून बाहेर पडून निघून गेले. ही घटना स्वामींची त्या मुलावर विशेष कृपा झाल्याचे दर्शवते. 
          स्वामी कर्मकायद्यात हस्तक्षेप करीत नाहीत. सर्वांनी आपापली कर्म भोगली पाहिजेत. स्पंदशक्ती साक्षी अवस्थेत असलेल्या परमेश्वरास कृपावर्षाव करण्यास उद्युक्त करते. अवताररूप परमेश्वर करुणा वर्षवतो. त्याच कारुण्यामुळे स्पंदशक्ती काही जणांना विशेष कृपेचा प्रसाद देते. प्रत्येक अवताराच्या काळात फार थोड्या भाग्यवंतांना हा विशेष कृपेचा लाभ मिळतो. हे आहे परमेश्वराचे सर्वज्ञत्व. दयेपोटी परमेश्वर अवतरित होतो परंतु विशेष कृपा हे त्याच्या चित् शक्तीचे कार्य आहे, हा फरक आहे.  
 
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 
उर्वरित प्रकरण पुढील भागात..... 
जय साईराम 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा