ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
पुष्प - ४६
जन्मदिन संदेश
साई अमृत
साई अमृत सर्वाना अमरत्व बहाल करेल:
अथक साधना करून आपणापैकी प्रत्येक जण कुंडलिनीचा सात चक्रे पार करू शकतो. आपले शेवटचे चक्र सहस्रार उघडले की आपल्यालाही भगवंताच्या मांडीवर बसण्याचं भाग्य लाभते. आपल्याला अमरत्व प्राप्त होते. भगवान नावाचे अमृत आपण मिळवले की आपण जीवन्मुक्त अवस्था प्राप्त करतो. आपण मृत्यूवर विजय मिळवू शकतो. भगवंत रुपी अमृताचं प्राशन करण्यासाठी सर्वांनी साधना करायलाच हवी. हा साई अवतार आपण सर्वांना त्याच्या अमृताद्वारे मुक्ती प्रदान करण्याकरिताच अवतरला आहे. आपण ह्या अवताराचा उपयोग आपल्यासाठी करून घ्यायला नको का? अमृत सागर अशा साईंकडे मी सर्वांना मुक्ती मिळावी म्हणून रोज प्रार्थना करत असते.
स्वामींनी मला ध्यानात सांगितलं, "आत्मा जेव्हा सहस्रारात पोहोचतो तेव्हा अमृताचे थेंब ठिबकू लागतात. ते अमृत प्यायल्यानंतर साधकाची क्षुधा आणि तृष्णा ह्या भावना नष्ट होतात. म्हणून मी तुझ्यावर अमृताचा वर्षाव केला आणि तुझं रूपच अमृत झालं." महान साधू व संन्यासी जेव्हा महिनोंमहिने ध्यानात राहत असत तेव्हा ह्या अमृतामुळेच ते टिकाव धरू शकत असत. त्यांना भूक आणि तहान यांची भावनाच होत नसे. अमृताच्या काही थेंबांचा जर एवढा प्रभाव असेल तर जरा कल्पना करून पहा, अवघे शरीर अमृताने भरलेली अवस्था कशी असेल ?भगवान म्हणालेत," तू ह्या अवस्थेत असल्यामुळे तू अखिल जगत अमृतत्वात परिवर्तित करू शकतेस." माझं अस्तित्वच अमृतमय कसं बरं झालं ? मी क्षण नं क्षण भगवत चिंतनात असते. म्हणून भगवंत चैतन्य अमृत होऊन माझ्या संपूर्ण शरीरात व्याप्त झालं. साई अमृत माझ्या रक्तात आणि आत्म्यामध्ये भिनलंय. प्रत्येक क्षणी त्याच्या प्रेमामृताने भरून वाहणारे माझे विचार हा प्रेमकुंभ (माझं शरीर ) भरतात.
आपली आख्यायिका सांगते की, देव आणि दानवांनी क्षीरसागराचं मंथन केलं तेव्हा अमृत कुंभ प्रगटला. अमृतासाठी देव आणि दानव भांडू लागले. तेव्हा महाविष्णूंनी अत्यंत मोहक असा मोहिनी अवतार धारण केला आणि फक्त देवांना अमृत दिले. ह्याप्रमाणे साईरुपी अमृत कुंभामधील दिव्य प्रेमामृत अखिल जगतास देण्याचे कार्य माझ्यावर सोपविले गेले आहे. परंतु हे अमृत सर्वांना दिले जाईल. ह्या जगातील प्रत्येकाला अमर करणे, हे माझ्या जीवनाचे ध्येय आहे. हे माझे जन्म रहस्य आहे. स्वामी आणि मी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहोत. साई महाविष्णूंनी स्वतः हा वसंतमोहिनी अवतार धारण केलाय आणि तेच जगातील सर्वांना अमरत्व बहाल करणार आहेत.
- श्री वसंतसाई अम्मा
ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
संदर्भ - श्री वसंतसाई लिखित साहित्यातून
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा