रविवार, २८ नोव्हेंबर, २०२१
गुरुवार, २५ नोव्हेंबर, २०२१
ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" प्रेम हवेला शुद्ध बनवून पृथ्वीला मंगल बनवते. "
४
विशेष कृपा
स्वामी त्यांच्या संदेशात म्हणाले की सर्वांनी त्यांच्याकडे परमेश्वराच्या आत्मतत्वात परतून विलीन व्हावे. मीही हेच सांगते आहे. माझ्याप्रमाणे सर्वांनी परमेश्वरात एकरूप व्हावे. मी स्वामींमध्ये जशी एकरूप झाले, तसेच सगळे त्यांच्यात विलीन होतील. माझ्या सर्व पुस्तकांमध्ये मी हेच सांगत आहे. मी हे लिहीत असताना तेच शब्द स्वामींच्या संदेशरूपात आमच्याकडे आले. आम्ही दोघ एक आहोत याचा हा पुरावा.
श्रीकृष्ण कोण आहे हे कुब्जेला माहित होते, म्हणूनच तिच्यावर विशेष कृपेचा वर्षाव झाला. त्या दृष्टीहीन मुलाला, स्वामी कोण आहेत हे ठाऊक नव्हते, तरीही त्याला स्वामींची विशेष कृपा लाभली. विशेष कृपेला भेदभाव ठाऊक नाही. ती निःपक्षपाती असते. याच कारणासाठी स्तूपाचे नाडीशास्त्र सांगते की अगदी दुष्ट दारुड्यालाही मुक्ती मिळेल.
परमेश्वर मानवावर तीन प्रकारे दयेचा वर्षाव करीत असतो.
* करुणा
* कृपा
* विशेष कृपा
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
उर्वरित प्रकरण पुढील भागात.....
जय साईराम
मंगळवार, २३ नोव्हेंबर, २०२१
ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
पुष्प -४७
परमेश्वरामधून प्रेमाचा उद्भव होतो. जेव्हा त्याच्यामध्ये प्रेम उद्भवते तेव्हा सृष्टीची उत्पत्ती होते. समस्त सृष्टी त्याची लेकरे आहेत. एक आत्मा अनेक होतो. हे ' एकोहम बहुस्यामि ' आहे. परमेश्वराची मुले त्याच्यासारखीच असायला हवीत. मुले त्यांच्या पालकांसारखी असणे म्हणजेच निर्मिती, सृष्टी सर्वसाधारणपणे असे घडते. तथापि जर आपण त्यावर चिंतन केले तर आपल्या असे लक्षात येते की परमेश्वर आपला मूलस्रोत आहे. आपण त्याच्यासारखे असायला हवे. स्वामींनी भूतलावर येऊन ८४ वर्षे ही शिकवण दिली ." उठा !जागे व्हा ! मायेचा पडदा दूर सारा. मी एकमेव तुमचा पिता आहे. अन्य कोणी नाही. मी समस्त सृष्टीचा पिता आहे. सर्व माझी लेकरे आहेत. तुमचे आपापसातील भेद विसरून माझ्यासारखे बनण्याचा प्रयत्न करा. परमेश्वर हेच तुमचे खरे स्वरूप आहे ! तुम्ही परमेश्वराची लेकरे आहात, हे जाणून घ्या. एका परमात्म्यामधून सर्व जीवात्मे आले आहेत. प्रेम हा तुमचा स्थायीभाव आहे. बाकी सर्व वृतींचा तुम्ही त्याग करून जीवनात सत्य, धर्म आणि अहिंसा ह्यांचे आचरण केले तरच तुम्हाला शांती प्राप्त होईल. "
स्वामींनी हा संदेश दिला.
आजच्या परिस्थितीत परमेश्वराला धरून ठेवणे हे आपले तप आहे. प्रेमाचा उद्भव केवळ परमेश्वरमधूनच होतो. हे प्रेम वृध्दींगत करणे आपल्या प्रेमाची व्याप्ती वाढवणे. आपले नाते केवळ परमेश्वराशीच असायला हवे. आता, इथे, याक्षणी आपण आपल्या प्रयत्नांद्वारे त्याची अनुभूती घेतली पाहिजे. माझे संपूर्ण जीवन म्हणजे ह्यासाठीचे प्रयत्न. मी प्रदीर्घ साधना करून स्वामींचे प्रेम प्राप्त केले. ५८ वर्षाच्या दीर्घ साधनेनंतर स्वामी माझ्याशी ध्यानात बोलू लागले. माझ्या मार्गात काहीही आले तरी मी कधीही स्वामींना दृष्टीआड होऊ न देता त्यांना घट्ट पकडून ठेवले.
सर्वांनी प्रयत्न करून ' मी आत्मा आहे' ह्याची अनुभूती घेतली पाहिजे. हे जीवनाचे ध्येय आहे. आपले आत्म्याशी असलेले नाते हेच केवळ खरे आणि शाश्वत नाते आहे. जर तुम्ही भौतिक नात्यात भ्रमित झालात तर तुम्ही जन्म मृत्युच्या चक्रात अडकाल.
संदर्भ - श्री वसंतासाई ' New Bliss ' ह्या पुस्तकातून .
जय साईराम
स्वामींचा वाढदिवस
रविवार, २१ नोव्हेंबर, २०२१
ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" शुद्ध भाव मानवाला माधव बनवतात. अशुद्ध भाव मानवाला पशु बनवतात. "
४
विशेष कृपा
सकाळी मी लिखाण करीत असताना, इंटरनेटवर आम्हाला एक संदेश आला. तो स्वामींचा संदेश होता,' माझ्याबरोबर ये, यापुढे जराही ताटातूट नाही, ही आज केलेली आज्ञा आहे. माझ्यावर अधिक प्रेम करण्यासाठी मी मला माझ्यापासून अलग केल. अनुभव संपला. आता मला माझे सर्व माझ्यामध्ये, एका आत्मतत्वामध्ये परत यायला हवेत.
हेच आहे सत्ययुग. स्वामी म्हणत आहेत की आता सर्व अनुभव संपले आहेत. याचा अर्थ काय ? याचा अर्थ कर्माचे अनुभव संपलेत. कर्मांमुळे अनुभव घेण्यास सर्व जन्माला येतात. आता जर कर्मच उरली नाहीत, तर त्याचा अनुभवही उरला नाही. याच कारणासाठी स्वामींनी मला १७ नोव्हेंबरला यज्ञात काळाची रूपकात्मक पूर्णाहुती देण्यास सांगितले. आम्ही तीन पुठ्ठ्यांवर भूतकाळ, भविष्यकाळ व वर्तमानकाळ असं लिहून एक घड्याळही काळाचं चिन्ह म्हणून पूर्णाहुतीमध्ये घातल. त्यावेळी आम्ही पाहिले की घड्याळ, भूतकाळ आणि वर्तमानकाळ पूर्णपणे जळला होता आणि भविष्यकाळाला अग्नी जराही शिवला नव्हता . याचाच अर्थ असा की सत्ययुग कोणाचेही जन्म कर्मांमुळे नसतील. आपण परमेश्वरापासून वियुक्त नसून संयुक्त आहोत ह्या जाणीवेतून सर्वजण दैवी आयुष्य जगातील. हे सत्ययुग आहे, नवीन निर्मिती !
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
शुक्रवार, १९ नोव्हेंबर, २०२१
ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" संपूर्ण विश्वामध्ये एकच चैतन्य भरून राहिले आहे. आपले भाव आपल्याला त्या वैश्विक चैतन्याशी जोडतात. "
४
विशेष कृपा
प्रथम काही जणांनी मला त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगितले. तेव्हाच माझ लक्ष वैश्विक कर्माकडे वेधलं गेलं. माझ्या लक्षात आलं की हे जग रोग, समस्या आणि कर्मांमध्ये पूर्णपणे बुडलय. मी स्वामींजवळ रडले, " तुम्ही माझ्या तपस्येची शक्ती घ्या आणि सर्वांना मुक्ती द्या. " ह्या प्रार्थनेचे फळ म्हणजेच विश्वमुक्ती. मी काहीही करत नाहीये. स्वामींनी त्यांच्या स्पंदशक्तीला वसंता हे नाव-रूप देऊन आणल आणि तिच्याद्वारे स्वामीच कार्य करीत आहेत, म्हणून वसंता हे त्यांच केवळ एक साधन आहे. वसंता ह्या नावरुपाद्वारे स्वामींची विशेष कृपा कार्य करीत आहे.
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
रविवार, १४ नोव्हेंबर, २०२१
ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" ईश्वराभिमुख केलेले तुमचे भाव तुम्हाला परमेश्वर बनवतात."
४
विशेष कृपा
माणसाची कर्म कशी धुतली जातात हे १९९९ साली घडलेली ही घटना दर्शवते. सावित्री ह्या दक्षिण आफ्रिकेतील भक्त आहेत. त्या साई समितीच्या उत्साही कार्यकर्त्या असून नऊ साई केंद्रांच्या अध्यक्षा होत्या. १३ ऑक्टोबर १९९७ रोजी त्यांना कॅन्सर असल्याचे निदान झाले. ८ ऑक्टोबर १९९९ ला टांझानियाच्या सुमित्राने मला फोन करून त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगितले. ध्यानात मला स्वामी म्हणाले,' कॅन्सर कॅन्सल झाला. ' माझ्याकडे त्यांना फोन करून स्वामींचा निरोप देण्याची सुविधा नव्हती. म्हणून मी स्वामींनाच सांगितले की त्यांना संदेश पोहोचवा ! नंतर आफ्रिकेच्या दुसऱ्या एका भक्ताचा फोन आला असता ते म्हणाले की ते स्वामींचा संदेश त्यांना सांगतील. नोव्हेंबरमध्ये सावित्री स्वामींच्या वाढदिवसासाठी पुट्टपर्तीला गेल्या. त्यावेळी त्यांनी सुपरस्पेशॅलिटी हॉस्पिटलमध्ये तपासण्या करून घेतल्या. तेव्हा त्यांना एकदम तंदुरुस्त असल्याचे सांगण्यात आले. ३ डिसेंबरला स्वामींनी त्यांना मुलाखतीला बोलावले आणि काही औषधे चालू ठेवण्याचा सल्ला दिला. त्यांनी स्वामींकडे मला भेटण्याची परवानगी मागितली. स्वामींनी अनुमती देऊन म्हटले. " वडक्कमपट्टी आंटीना जाऊन भेट. " माझ्या तपस्येमध्ये एखाद्याचा कर्मसंहार करण्याची ताकद आहे, हे या घटनेवरून स्पष्ट होते.
* * *
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम