ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" ईश्वराभिमुख केलेले तुमचे भाव तुम्हाला परमेश्वर बनवतात."
४
विशेष कृपा
माणसाची कर्म कशी धुतली जातात हे १९९९ साली घडलेली ही घटना दर्शवते. सावित्री ह्या दक्षिण आफ्रिकेतील भक्त आहेत. त्या साई समितीच्या उत्साही कार्यकर्त्या असून नऊ साई केंद्रांच्या अध्यक्षा होत्या. १३ ऑक्टोबर १९९७ रोजी त्यांना कॅन्सर असल्याचे निदान झाले. ८ ऑक्टोबर १९९९ ला टांझानियाच्या सुमित्राने मला फोन करून त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगितले. ध्यानात मला स्वामी म्हणाले,' कॅन्सर कॅन्सल झाला. ' माझ्याकडे त्यांना फोन करून स्वामींचा निरोप देण्याची सुविधा नव्हती. म्हणून मी स्वामींनाच सांगितले की त्यांना संदेश पोहोचवा ! नंतर आफ्रिकेच्या दुसऱ्या एका भक्ताचा फोन आला असता ते म्हणाले की ते स्वामींचा संदेश त्यांना सांगतील. नोव्हेंबरमध्ये सावित्री स्वामींच्या वाढदिवसासाठी पुट्टपर्तीला गेल्या. त्यावेळी त्यांनी सुपरस्पेशॅलिटी हॉस्पिटलमध्ये तपासण्या करून घेतल्या. तेव्हा त्यांना एकदम तंदुरुस्त असल्याचे सांगण्यात आले. ३ डिसेंबरला स्वामींनी त्यांना मुलाखतीला बोलावले आणि काही औषधे चालू ठेवण्याचा सल्ला दिला. त्यांनी स्वामींकडे मला भेटण्याची परवानगी मागितली. स्वामींनी अनुमती देऊन म्हटले. " वडक्कमपट्टी आंटीना जाऊन भेट. " माझ्या तपस्येमध्ये एखाद्याचा कर्मसंहार करण्याची ताकद आहे, हे या घटनेवरून स्पष्ट होते.
* * *
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा