मंगळवार, २३ नोव्हेंबर, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

स्वामींचा वाढदिवस 


१७-११-२००९
आज आहे स्वामींचा वाढदिवस !
ओ स्वामी, केव्हा, कुठं आणि कसे जन्मलात ?
अरे ! काळ ह्या कालातीताला गवसने घालून त्यांचा वाढदिवस साजरा करीत आहे !
हे काळा ! इकडे ये. तुला मी एक गोष्ट दाखवते. 
इथे पहा, एक सुंदर कळी उमलत आहे..... फुल जन्मास येत आहे. 
एक पावसाचा थेंब ! कुठून आला बरं हा थेंब, नव्या नव्हाळीचा ?
आकाशातून मातीत पडला ... तो मातीत पडत असताना माती उसळली 
तिचा जन्म आपण पाहतो आहोत. ..... 
काळोखे आकाश !पहा पहा, साई सूर्याचा जन्म. 
अरे हे काय ? सूर्याला कोण झाकून टाकत आहे? हं, ते आहेत धावते ढग ..... 
अरे बापरे, हा कसला आवाज ? असं विचारतो आहेस का ?
अरे, गडगडाट करत ते म्हणतायत, " आम्ही जन्मलो, आम्ही जन्मलो. "
डोळे दिपतायत, हा कसला प्रकाश म्हणून विचारतो आहेस होय ?
अरे ही तर लखलखती वीज, ती म्हणतेय, ' मी जन्मले, मी जन्मले.'
संवाद : 
काळ : हे सगळं काय आहे? 
वसंता : ये, तुला दाखवते. तुझ्या वाढदिवसाचा झेंडा इथे रोव. नवीन पाणी येतंय बघ, समुद्राला मिळण्यासाठी. हे काय ? झेंड्याला ढकलून देत पाणी वाहतंय असं म्हणतोस होय ! अरे हे पाणी क्षणा क्षणाला नव्यानं जन्मास येत आहे. 
काळ : तिथे नवजात बालकाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. मी तिकडे जातो, वाढदिवसाचा झेंडा रोवायला. 
वसंता : हे बघ, नवीन फुलपाखरू, तुझ्या झेंड्यावर आत्ताच जन्मलं. 
काळ : ओय ओय, माझ्या पायाला काहीतरी चावलं, 
वसंता : अरे ही तर नवी मुंगी, ती म्हणतेय, " मी आताच जन्मलेय, माझा वाढदिवस साजरा करा."आता तू सांग , तुझ्या वाढदिवसाचा झेंडा तू कसा आणि कुठं कुठं रोवशील ? स्वामी क्षणा क्षणाला सर्वत्र नव्या नव्हाळीने जन्मास येत आहेत. 
काळ : काय सांगतेस काय तू ? माझं डोकं भिरभिरतंय; हे नारी , तू कोण ? तुला हे सगळं कसं काय कळलं , सांग न मला. 
वसंता : मी कोण विचारत आहेस का ? मला सगळं कसं माहीत, असं वाटतंय नं तुला ? 
अरे, माझ्या गळ्यात स्वामींचं मंगळसूत्र आहे. त्यांनी मला सांगितलं, मी अर्धांगिनी आहे त्यांची, 
आम्ही शिव शक्ती आहोत. तू इथे येऊ नकोस, जा तू. 
तिथे पुट्टपर्तीमध्ये अर्धाच देह आहे. तिथे अर्ध्या देहाचाच वाढदिवस साजरा करतात. 
इथे मुक्ती निलायममध्ये मी कोण आहे हे ह्यांनी ओळखलं आहे. 
हे पूर्ण देहाचा पुर्णत्वानं पूर्ण वाढदिवस साजरा करतात. 
अरे काळा, तू निघून जा. 
इथे भगवंताला काळवेळेत बांधायला येऊ नकोस हे सत्ययुग आहे, इथे परमेश्वर प्रत्येकामध्ये प्रत्येकक्षणी जन्म घेतो. इथे आम्ही क्षणा क्षणाला स्वामींचा वाढदिवस साजरा करत असतो. 
मी स्वामींकरता ही कविता लिहिली. हे ज्ञानाचं उच्चतम शिखर आहे. इथे पूर्ण सत्याचं नूतन प्रकटीकरण झालं आहे. हे लिहून झाल्याबरोबर माझं मन पुन्हा प्रेमाकडे वळलं. स्वामींच्या दर्शन, स्पर्शन, आणि संभाषणासाठी आसुसलं. स्वामी, अवघे जग तुमच्याकडे येते, मला तुमचे दर्शन का नाही मिळणार ? हा प्रवास अंतहीन आहे, एकीकडे उंच उंच जाणारं ज्ञान, तर दुसरीकडे प्रेम; खोल खोल गहिरं होत जाणारं. माझा हा खडतर प्रवास अव्याहत चालूच आहे. तथापि हे स्वामींचं अवतार कार्य आहे. भगवान आणि काळाशी माझा असा संघर्ष सुरु आहे. अखेरीस मी यशस्वी होईन, मी विजयी व्हायलाच हवं. मी ह्या कलियुगाला सत्ययुगात परिवर्तित केल्याशिवाय सोडणार नाही. सत्यसाई अवतार कधीच पराभूत होणार नाही. म्हणून मी पराकोटीच्या सबुरीने वाट पाहत आहे. 

संदर्भ - श्री वसंतासाई लिखित साहित्यातील. 


जय साईराम  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा