ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
पुष्प -४७
परमेश्वरामधून प्रेमाचा उद्भव होतो. जेव्हा त्याच्यामध्ये प्रेम उद्भवते तेव्हा सृष्टीची उत्पत्ती होते. समस्त सृष्टी त्याची लेकरे आहेत. एक आत्मा अनेक होतो. हे ' एकोहम बहुस्यामि ' आहे. परमेश्वराची मुले त्याच्यासारखीच असायला हवीत. मुले त्यांच्या पालकांसारखी असणे म्हणजेच निर्मिती, सृष्टी सर्वसाधारणपणे असे घडते. तथापि जर आपण त्यावर चिंतन केले तर आपल्या असे लक्षात येते की परमेश्वर आपला मूलस्रोत आहे. आपण त्याच्यासारखे असायला हवे. स्वामींनी भूतलावर येऊन ८४ वर्षे ही शिकवण दिली ." उठा !जागे व्हा ! मायेचा पडदा दूर सारा. मी एकमेव तुमचा पिता आहे. अन्य कोणी नाही. मी समस्त सृष्टीचा पिता आहे. सर्व माझी लेकरे आहेत. तुमचे आपापसातील भेद विसरून माझ्यासारखे बनण्याचा प्रयत्न करा. परमेश्वर हेच तुमचे खरे स्वरूप आहे ! तुम्ही परमेश्वराची लेकरे आहात, हे जाणून घ्या. एका परमात्म्यामधून सर्व जीवात्मे आले आहेत. प्रेम हा तुमचा स्थायीभाव आहे. बाकी सर्व वृतींचा तुम्ही त्याग करून जीवनात सत्य, धर्म आणि अहिंसा ह्यांचे आचरण केले तरच तुम्हाला शांती प्राप्त होईल. "
स्वामींनी हा संदेश दिला.
आजच्या परिस्थितीत परमेश्वराला धरून ठेवणे हे आपले तप आहे. प्रेमाचा उद्भव केवळ परमेश्वरमधूनच होतो. हे प्रेम वृध्दींगत करणे आपल्या प्रेमाची व्याप्ती वाढवणे. आपले नाते केवळ परमेश्वराशीच असायला हवे. आता, इथे, याक्षणी आपण आपल्या प्रयत्नांद्वारे त्याची अनुभूती घेतली पाहिजे. माझे संपूर्ण जीवन म्हणजे ह्यासाठीचे प्रयत्न. मी प्रदीर्घ साधना करून स्वामींचे प्रेम प्राप्त केले. ५८ वर्षाच्या दीर्घ साधनेनंतर स्वामी माझ्याशी ध्यानात बोलू लागले. माझ्या मार्गात काहीही आले तरी मी कधीही स्वामींना दृष्टीआड होऊ न देता त्यांना घट्ट पकडून ठेवले.
सर्वांनी प्रयत्न करून ' मी आत्मा आहे' ह्याची अनुभूती घेतली पाहिजे. हे जीवनाचे ध्येय आहे. आपले आत्म्याशी असलेले नाते हेच केवळ खरे आणि शाश्वत नाते आहे. जर तुम्ही भौतिक नात्यात भ्रमित झालात तर तुम्ही जन्म मृत्युच्या चक्रात अडकाल.
संदर्भ - श्री वसंतासाई ' New Bliss ' ह्या पुस्तकातून .
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा