गुरुवार, २५ नोव्हेंबर, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" प्रेम हवेला शुद्ध बनवून पृथ्वीला मंगल बनवते. "

विशेष कृपा 

           स्वामी त्यांच्या संदेशात म्हणाले की सर्वांनी त्यांच्याकडे परमेश्वराच्या आत्मतत्वात परतून विलीन व्हावे. मीही हेच सांगते आहे. माझ्याप्रमाणे सर्वांनी परमेश्वरात एकरूप व्हावे. मी स्वामींमध्ये जशी एकरूप झाले, तसेच सगळे त्यांच्यात विलीन होतील. माझ्या सर्व पुस्तकांमध्ये मी हेच सांगत आहे. मी हे लिहीत असताना तेच शब्द स्वामींच्या संदेशरूपात आमच्याकडे आले. आम्ही दोघ एक आहोत याचा हा पुरावा. 

           श्रीकृष्ण कोण आहे हे कुब्जेला माहित होते, म्हणूनच तिच्यावर विशेष कृपेचा वर्षाव झाला. त्या दृष्टीहीन मुलाला, स्वामी कोण आहेत हे ठाऊक नव्हते, तरीही त्याला स्वामींची विशेष कृपा लाभली. विशेष कृपेला भेदभाव ठाऊक नाही. ती निःपक्षपाती असते. याच कारणासाठी स्तूपाचे नाडीशास्त्र सांगते की अगदी दुष्ट दारुड्यालाही मुक्ती मिळेल. 

           परमेश्वर मानवावर तीन प्रकारे दयेचा वर्षाव करीत असतो. 

* करुणा 

*  कृपा 

*  विशेष कृपा 


संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात..... 

जय साईराम 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा