रविवार, ३० जानेवारी, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 
       " हे विश्व म्हणजे माया आहे त्यामध्ये न अडकता केवळ परमेश्वराच्या विचारात राहा व त्याच्यासाठी जीवन व्यतीत करा."
कर्माची अदृश्य मुळे 

            हा कर्माचा हिशोब सत्ययुगात वाढणारही नाही अथवा कमीही होणार नाही. संपूर्ण युग हे निरामय आनंदाची स्थिती असेल. सत्ययुगात घेतलेल्या अनेक जन्मात रामची निरनिराळी नावे व रूपे असतील. परंतु त्याच्या कर्माचा काटा सत्ययुगाच्या शेवटी त्याची वाट पहात असेल. हजार वर्षांनी येणारे कलियुग त्याच्या कर्मानुसार येणाऱ्या जन्ममृत्युचे कारण असेल; आणि ते कलियुग सध्याच्या कलियुगाहून कितीतरी पटीने भयावह असेल; सर्वात वाईट कली. 
            मग आपण २८ वर्षे काय करावे ? आपण आपली स्तिथी समजून घेऊन स्वतःचे संपूर्णपणे परिवर्तन करावे. फक्त हाच एक उपाय आहे. 

*     *     *

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

शनिवार, २९ जानेवारी, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सप्रेम साईराम ,
           नवीन वर्षाच्या सुरुवातीस आपण श्री वसंतसाई ह्यांच्या ' Year of Sadhana ' ह्या पुस्तकातील सुविचार लेखनाची मालिका सुरु करीत आहोत. श्री वसंतसाईंच्या ' Thought for the Day ' ह्या पुस्तकातील प्रत्येक दिवसाच्या सुविचारावर ' Year of Sadhana ' ह्या पुस्तकात विस्ताराने विवरण केले आहे. 
           काही अपरिहार्य कारणामुळे २३ जानेवारीस ह्या मालिकेची सुरुवात करू शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व ! आज दिनांक २९/०१/२०२२ रोजी सुविचारमालेचे पहिले पुष्प वाचकांसमोर प्रस्तुत करत आहे. 

*     *     *

साधनेचं वर्ष 

            आज मी आता पुढे काय लिहू? असा विचार करत एड्डीलाच विचारलं. ते म्हणाले, " तुम्ही तुमच्या सुविचारांवर का बरं लिहीत नाही ? " त्यांनी सुविचारांचं पुस्तक आणलं आणि म्हणाले की , तुम्ही प्रत्येक सुविचारावर लिहा. मी पुस्तक डोळ्यांखालून घातलं. पूर्वी निकोला आणि फ्रेडनी माझ्या भाषणांमधून आणि लिखाणातून काही सुविचार एकत्र करून एक पुस्तक बनवलं होतं. सुविचार १ जानेवारीला सुरु होऊन ३१ डिसेंबरला संपतात. बरोबर एका वर्षाचा कालावधी आहे. तर चला, आपण पहिला सुविचार पाहुयात. 

१ जानेवारी 

" आपण जिवंत असलेला प्रत्येक क्षण ही भगवंताबरोबर जगण्याची संधी आहे. "

           केवळ आणि केवळ भगवत्प्राप्तीकरताच हा जन्म आपल्याला मिळाला आहे. तरीही सर्वजण नाव, प्रसिद्धी, पदवी, कुटुंब आणि पैसे अशा भौतिक गोष्टींसाठी ह्या जन्माचा गैर वापर करतात. ह्या गोष्टी अगदी निरुपयोगी आहेत. आपण जर भगवत्प्राप्तीचा प्रयत्न केला तरच मानवी जन्माला अर्थ आहे, ह्या जन्मताच जन्म मृत्यूच्या फेऱ्यांना आपण खीळ घालू शकतो. 
            आपल्या हाताशी असलेला प्रयेक क्षण म्हणजे भगवंताविषयी विचार करण्याची संधीच आहे. तथापि बहुतेक सर्वजण सकाळपासून रात्रीपर्यंत पूर्ण दिवस अनावश्यक विषयांवर विचार करण्यात फुकट घालवतात. आपण अगदी एक क्षण सुद्धा भगवंताविषयी मनःपूर्वक विचार करत नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत आपल्या मनात  किती विचार येत असतात बरं. किती वैविध्यपूर्ण विषयांवर आपण विचार करतो ! भगवंतासाठी जेमतेम १० मिनिटं राखून ठेवली जातात, आणि इतर दैनंदिन कामांमध्ये त्याला बसवलं जातं. लोकं देवघरात यंत्रवत जातात आणि मग त्यांच्या दिवसाची सुरुवात करतात. भूक लागली की आपण खातो. तहान लागली की काहीतरी पितो. थकवा वाटला की झोपतो. परंतु देवाचा विचार करण्यासाठी आपल्याला खास भाव मिळालेला नाहीये. परमेश्वरानं आपलं शरीर असं बनवलं आहे की, सगळे भाव आपल्यात नैसर्गिकपणे निर्माण होतील: जस की भूक, तहान, झोप वगैरे. तथापि भगवंताकरता तृष्ण ह्यात समवीत नाहीये. माणूस कार्यालयात जातो आणि दिवसाच्या अखेरीस घरी परततो. तो काहीतरी खातो, कुटुंबियांशी आनंदात गप्पा गोष्टी करतो आणि झोपून जातो. तो रात्रभर झोपतो, सकाळी उठतो आणि कॉफी पीत समाचार पात्र वाचतो. ही कॉफी पलंगावरच पडून पितात म्हणे आणि तिला " बेड कॉफी " असं म्हणतात. पलंगावरून बाहेर यायच्या आधीच ही प्यायला जाते आणि पेपरही वाचला जातो. तो त्याचे कुटुंब, नातेवाईक आणि त्याचा व्यवसाय ह्यासंबंधी विचार करत दिवस घालवतो. रात्री अगदी झोपायची वेळ झाली तरीही तो देवाचा अथवा अध्यात्माचा विचार करत नाही. तो कायम क्षणभंगुर वस्तूंचा आणि विषयांचा विचार करत असतो. तुमच्या जन्मामुळं तुम्हाला माता पित्याशी नातं मिळत. लग्न झाल्यानंतर पत्नी आणि मुलांशी नातं जुळतं. ही सर्व नाती अशाश्वत आहेत. म्हणून प्रत्येकानं आपापलं कर्तव्य आसक्तीविना करावं. हे माझ्या जीवनाचं तत्व आहे. मी वयाची ६३ वर्षे आसक्तीशिवाय जगले. मी माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण फक्त भगवंताचा विचार करत व्यतीत केला. हे ७२ वर्षांचे अविरत, अखंड विचार जगाचा अक्ष बदलतात. स्वामींनी हे सांगितलंय आणि मी आधीच्या अध्यायात ह्याविषयी लिहिलंय. कलियुग सत्ययुगात परिवर्तित होतं व पृथ्वीवर स्वर्ग अवतरतो. सर्व मानवी जीव जीवनमुक्त अवस्था प्राप्त करतात. 

जय साईराम 

गुरुवार, २७ जानेवारी, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
" चेहरा मनाचा आरसा आहे म्हणून सदैव आनंदी राहा."
कर्माची अदृश्य मुळे 

            एक उदाहरण देते. एक राम नावाचा माणूस आहे. त्याच्या पूर्वजन्मांच्या कर्मानुसार तो त्याचे आयुष्य जगत आहे. यात त्याची चांगली, वाईट दोन्ही कर्म समाविष्ट आहेत. आता पुढील २८ वर्षात त्याने काय करावे ?
             राम जी काही कर्म करतो, चांगली अथवा वाईट, ती त्याच्या कर्माच्या हिशोबात नोंदली जाणार. पण जे संस्कार त्याने गोळा केले ते त्याच्या कर्माच्या गाठोड्यात जाणार. पुढील सत्ययुगात तो आनंदात राहणार . २८ वर्षे फक्त स्वामींचे भाव रामच्या शरीरात कार्यरत राहतील. सत्ययुगाच्या १००० वर्षात तो हेच दिव्य भाव घेऊन अनेकवेळा जन्म घेईल. १००० वर्षाच्या सत्ययुगानंतर, तो पुन्हा जन्म घेईल, तो जन्म त्याच्या सध्याच्या कलियुगाच्या कर्माच्या हिशोबाप्रमाणे असेल.  

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

रविवार, २३ जानेवारी, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
" सर्वांवर प्रेम करा...... हा तुमचा मंत्र बनवा."

कर्माची अदृश्य मुळे 

            स्वामींचे आणि माझे भाव सृष्टीत सर्वांमध्ये प्रवेश करतात आणि अवकाशातील प्रदूषण दूर करतात. आमचे भाव अवकाशात व्यापून पंचमहाभूते शुद्ध  करतात. १००० वर्षे सर्वजण याचा अनुभव घेतील व आनंद उपभोगतील. १००० वर्षांच्या सत्ययुगाच्या शेवटी माणूस पुन्हा जन्म घेईल आणि कलियुगातील त्याची उरलेली कर्म भोगायला लागेल. जर असे असेल तर मग जन्ममृत्युच्या चक्रातून सुटका मिळवण्यासाठी उपाय तरी काय ?
           स्वामींनी त्यांच्या पदवीदान दिनाच्या प्रवचनात सांगितले की २८ वर्षानंतर संपूर्ण जग एक होईल. हेच सत्ययुग असेल. याचा अर्थ असा की सर्वांना त्यांचे पूर्णपणे परिवर्तन होण्यासाठी २८ वर्षांचा कालावधी दिला आहे. प्रत्येक मिनिटाला आपण आपल्या विचारांवर लक्ष ठेवून ते परमेश्वराकडे वळवले पाहिजेत. आपण आपल्या पंचज्ञानेंद्रियांवर ताबा ठेवून स्वतःला शुद्ध करायला हवे. जर आपण हे केले, तर पुढच्या कलियुगात पुन्हा जन्म घेण्यास कारणीभूत असणारी सर्व कर्मे उरणारच नाही. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम    
ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
पुष्प - ४९
आनंद 

             आपल्याला वाटते की आनंद बाह्य गोष्टींमधून मिळतो. पती, पत्नी , मुले , कुटुंब, धन, घर, गाडी, प्रतिष्ठा इ. गोष्टींतून आनंद मिळेल म्हणून आपण ह्या गोष्टींच्या मागे धावतो. तथापि हा आनंद क्षणभंगुर असतो. तो चिरंतन काल टिकत नाही. आनंद केवळ मनुष्याच्या अंतरातून प्राप्त करता येतो. परमेश्वर प्रत्येकाच्या अंतरंगात असतो हा आनंद बाहेर प्रतिबिंबित होतो. बाह्यवस्तुतून आनंद मिळतो ह्या विचाराने आपण जन्म मृत्युच्या चक्रात अडकतो. आत्मा हाच परमेश्वर, आत्मनिवासी. परमेश्वर अविनाशी आणि शाश्वत आहे. भौतिक वस्तु नाशवंत असतात. म्हणून तुम्ही परमेश्वराला आतमध्ये शोधले पाहिजे. तरच तुम्हाला खरा आनंद, जो आतमध्ये आहे तो प्राप्त होईल. 
           मनुष्य बाह्य जगतात आनंदाचा शोध घेतो. जेव्हा बाहेर अनुभवलेला आनंद खरा नाही हे त्याला समजल्यानंतर तो थकलेला जीव आतमध्ये आनंद शोधू लागतो. कठोर प्रयत्न आणि साधना करून त्याला ज्ञानप्राप्ती होते. तो सत्याचा कसोशीने शोध घेतो आणि अखेरीस ज्ञानाचा उदय होतो. हे ज्ञान म्हणजेच परमआनंद युगानुयुगे आपल्याला हेच शिकवले जाते की आपण त्या अदृश्य स्वरूपातील परमेश्वरापासून आनंद मिळवू शकतो. निर्मिती अनित्य आहे. आपल्या डोळ्यांना जी निर्मिती सृष्टी दिसते ती परमेश्वरमधूनच आली आहे. परमेश्वर आणि सृष्टी आपण वेगवेगळे का मानतो ? जो आनंद आपल्याला परमेश्वरापासून मिळतो तोच आनंद आपल्याला निर्मितीतून का मिळत नाही ? जीवनभर ह्याचे संशोधन करत आहे. माझे जीवनानुभव ह्याचा पुरावा देतात की निर्मितीच्या कणकणामध्ये परमेश्वर भरून राहिला आहे. अदृश्य परमेश्वर आणि दृश्य सृष्टी दोन्ही एकच आहे, दोन्ही परमेश्वर आहे. निर्मितीमधूनही आपल्याला तोच आनंद मिळाला पाहिजे. बाह्य वस्तू , कुटुंब , नातीगोती इ. ना आपण माया  म्हणून दूर का सारतो. तेही सर्व परमेश्वर आहे. ह्या जगात माया नाहीय. सर्व काही भगवंतमयम् आहे, विष्णुमयम् आहे. प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक जाणत भगवंत भरून राहिला आहे. जे जे आपल्या दृष्टीस पडते ते सर्व परमेश्वर आहे. ह्या सर्वांमधून आपण आनंद मिळवला पाहिजे. हा सत्ययुगाचा पाय आहे. 

संदर्भ - श्री वसंतसाईंच्या ' आनंद सूत्र ' ह्या पुस्तकातून. 

जय साईराम    

गुरुवार, २० जानेवारी, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
     " कोणालाही दुखावू नका कारण परमेश्वर प्रत्येकामध्ये विद्यमान आहे. "
कर्माची अदृश्य मुळे 

            पूर्वीच्या काळी, गुरुशिष्यांच्या प्रश्नोत्तरांमधून उपनिषदांचे उच्च ज्ञान सांगितले जात असे. आता, पुरुष आणि प्रकृती यांच्या संभाषणातून महान सत्य विशद केली जात आहेत. ध्यानाच्या वेळी स्वामी स्वतःस माझ्यापासून अलग करतात आणि मी विचारलेल्या प्रश्नांद्वारे सत्याची उकल करतात. माझी सर्व पुस्तके ही ध्यानात प्रत्यक्ष परमेश्वराच्या तोंडून ऐकलेले ज्ञानच होय. त्यांनी मला ह्या सर्व प्रकटीकरणासाठी तर बरोबर आणलाय !
             मी कर्माविषयी जन्मोजन्मी ते कास चालू राहत याविषयी बरच लिहिल आहे. मी हेही स्पष्ट केल की जगाची कर्म कमी करण्यासाठी स्वामी आणि मी शारीरिक क्लेश सहन करीत आहोत. हा सर्व सत्ययुगाचा उदय होण्यासाठी आहे. प्रथम युगाचा उदय कसा होतो हे आजपर्यंत जगास अज्ञात असलेल सत्य स्वामी ह्या सर्वांद्वारे दर्शवित आहेत. 


संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

रविवार, १६ जानेवारी, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
       " परमेश्वराची शिकवण आचरणात आणली नाही तर त्याच्या दर्शनाचा काय उपयोग ?"
कर्माची अदृश्य मुळे 

            स्वामींनी ध्यानात कर्माच्या कायद्याच सत्य सांगितल्यावर माझ्याही मनात अगदी हाच विचार आला. आजपर्यंत जगापुढे उघड न केलेली सूक्ष्मातील सूक्ष्म सत्ये उघड करण्यासाठीच हा अवतार धरतीवर अवतरला आहे. 
            परमेश्वराच स्वरूप काय ? त्याचे गुणधर्म कोणते ? अवतार घेतल्यावर त्याचे कार्य कसे चालते ? सृष्टीचा जन्म कसा झाला ? कर्म म्हणजे काय ? सूक्ष्म कर्म, अतिसूक्ष्म कर्म कस असत ? मानव जीवनात ते कार्य कस करत ? स्वामी जगासाठी ही सत्य प्रकट  करत आहेत. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

गुरुवार, १३ जानेवारी, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
" विश्व हा एक आरसा आहे ज्यामध्ये तुम्ही स्वतःला पाहता."
कर्माची अदृश्य मुळे 

           ही स्वामींच्या आणि माझ्यापासून जन्माला आलेली वंशावळ एक हजार वर्ष चालू राहील. या वंशावळीत सर्व पुरुष ' सत्य ' आणि सर्व स्त्रिया ' प्रेम ' असतील. सर्व मुले ' ज्ञान ' असतील. हे कलियुगातील एक सत्ययुग असेल. एक हजार वर्षांच्या शेवटी सर्वांना पुन्हा आपआपली कर्म भोगायला लागतील. ते सत्ययुगात अनेक जन्म घेतील. परंतु त्यांना या काळात त्यांची कर्म भोगावी लागणार नाहीत. १००० वर्षाच्या सत्ययुगानंतर जेव्हा पुन्हा कली येईल, तेव्हा  उर्वरित कर्म त्यांची वाट पहात असतील.
          तुम्ही कदाचित म्हणाल, " अरेच्या ! सत्ययुग हे एवढच असेल ? तुम्ही जर म्हणालात की सर्वांना मुक्ती मिळेल. आता तुम्ही म्हणता, कर्म तशीच राहतील. हे काय गौडबंगाल आहे ?"  

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

रविवार, ९ जानेवारी, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
         " आपण का जन्मलो ? मी कोण आहे ? यावर पुन्हा पुन्हा विचार करा. "
कर्माची अदृश्य मुळे 

            आता, सर्वजण कर्माच्या ओझ्याचा अनुभव घेत आहेत. मी सर्वांसाठी मुक्ती मागितली, " मी परमेश्वरापासून वियुक्त झाले आहे. मला त्याच्याशी संयुक्त व्हायचे आहे " याच एकमेव विचारामुळे नवनिर्मितीचा आराखडा उत्पन्न झाला. माझ्या एका देहानी परमेश्वराचा अनुभव घेण्यात मी समाधानी नाही. मला वाटते की संपूर्ण जगाने माझ्यासारखे व्हावे आणि परमेश्वरावर प्रेमाचा वर्षाव करावा. या आराखड्यात नवीन जग निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे. हा आराखडा माझ्या इच्छेनुसार माझ्यासारखी नवनिर्मिती करेल. ही वसंतमयम निर्मिती असेल. तिथे सर्वजण परमेश्वराशी विवाह करतील आणि परमेश्वरासोबत राहतील. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम

गुरुवार, ६ जानेवारी, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
      " समस्या धावत्या मेघांसारख्या असतात. केवळ भक्ती म्हणजेच मुक्ती होय. " 
कर्माची अदृश्य मुळे 

            एका व्यक्तिला असह्य वेदना होत होत्या. मी त्यांना आराम मिळण्यासाठी स्वामींजवळ रडून प्रार्थना केली. स्वामी म्हणाले, " त्याला त्याची कर्म भोगावीच लागणार." मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतच राहिले. काल त्यांच्या घरच्यांचा फोन आला. सर्वजण रडत होते. ध्यानात मी त्याविषयी स्वामींना विचारले. 
तारीख १७ डिसेंबर २००८ ध्यान 
वसंता - स्वामी, त्यांना अतिशय यातना होत आहेत... तुम्ही काहीतरी करा नं !
स्वामी - ते त्याच कर्म आहे. ते अनुभवल्याशिवाय तो कसा बर शिकेल ?
वसंता - स्वामी, तुम्ही त्यांच्यासाठी काही नाही का करू शकत ?
स्वामी - मी त्याची कर्म अर्ध्यानी कमी करू शकतो. पण पुढच्या जन्मी त्याला ती भोगावी लागतील. महान भक्त रामदासाला १२ वर्षे तुरुंगवास भोगावा लागला. त्याने श्रीरामाने मंदिर बांधण्यासाठी सरकारचे करवसुलीचे पैसे वापरले. त्याने भगवंतासाठी मंदिर बांधले तरीसुद्धा त्याला त्याची कर्म भोगावी लागली. कर्मापासून सुटका होऊ शकत नाही. 
वसंता - स्वामी, मी विश्वमुक्ती मागितली. मला वाटले, तुम्ही सर्वांचे कर्माचे हिशोब संपवून कृपा करणार. पण स्वामी, आता तुम्ही कर्माच्या समतोलाविषयी सांगत आहात. हे कास काय ?
स्वामी - सत्ययुगाच्या उदयासाठी, सर्वांचे परिवर्तन होण्यासाठी, आपण जगाची कर्म घेऊन क्लेश सहन करतो आहोत. 
वसंता - स्वामी, अगदी दृष्ट दारुडाही मुक्ती कसा मिळवणार ?
स्वामी - आता सर्व मुक्त होतील. सत्ययुगाची १००० वर्ष मुक्तिचा आनंद उपभोगतील आणि सत्ययुगाच्या शेवटी ते त्यांची कर्माची गाठोडी घेऊन कलियुगात पुन्हा जन्म घेतील. कर्म पुढे ढकलली जातील, लांबणीवर टाकली जातील. 

ध्यानाची समाप्ती  
  
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम  

रविवार, २ जानेवारी, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

      " आपले विधीलीखित ब्रम्हदेव लिहित नसून आपले आपणच लिहितो. " 
 

इन्क्युबेटर ( निर्जंतुक पेटी )

           नंतर स्वामींनी मी प्रथमच या जगात जन्म घेतला असल्याचे गुपित उघड केले. म्हणूनच मी जगाला आणि इथल्या लोकांना समजू शकले नाही. आजतागायत मी परमेश्वरासोबतच होते. ह्यावेळी प्रथमच या जगात आले असल्याने मला इथे राहणे अशक्य झाले आहे. 
           मग मला वाटले की स्वामींचे भक्त त्यांच्यासारखेच असतील, पण तेही सामान्य माणसांप्रमाणे आहेत. हे सर्व लक्षात आल्यावर मी अधिकच घाबरले आणि रडले. ह्या अयोग्य जगाला बदलण्याची मी प्रतिज्ञा केली. ही भूमी परमेश्वराला राहण्यायोग्य करण्यासाठी मी कठोर साधना केली. अनेक अश्रू ढळल्यावर मी नवनिर्मितीचे वरदान मागितले. 
             या जगतात मी राहू शकत नसल्यामुळे, बालपणापासून मी माझ्या स्वप्नविश्वात परमेश्वरासोबत राहिले. आता ध्यानात मी खरोखरच परमेश्वरासोबत राहते. मुक्ती निलयममध्ये आम्ही कलियुगाच्या वातावरणापासून वेगळे, फक्त परमेश्वरासोबत राहत असतो. माझ्या स्थितीद्वारे स्वामी स्वतःची स्थिती स्पष्ट करतात. माझ्या जीवनातून स्वामी हेच दाखवतात की कलियुगात अवतार अवतरीत होत नाही. 
  

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
 
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....           
जय साईराम