शनिवार, २९ जानेवारी, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सप्रेम साईराम ,
           नवीन वर्षाच्या सुरुवातीस आपण श्री वसंतसाई ह्यांच्या ' Year of Sadhana ' ह्या पुस्तकातील सुविचार लेखनाची मालिका सुरु करीत आहोत. श्री वसंतसाईंच्या ' Thought for the Day ' ह्या पुस्तकातील प्रत्येक दिवसाच्या सुविचारावर ' Year of Sadhana ' ह्या पुस्तकात विस्ताराने विवरण केले आहे. 
           काही अपरिहार्य कारणामुळे २३ जानेवारीस ह्या मालिकेची सुरुवात करू शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व ! आज दिनांक २९/०१/२०२२ रोजी सुविचारमालेचे पहिले पुष्प वाचकांसमोर प्रस्तुत करत आहे. 

*     *     *

साधनेचं वर्ष 

            आज मी आता पुढे काय लिहू? असा विचार करत एड्डीलाच विचारलं. ते म्हणाले, " तुम्ही तुमच्या सुविचारांवर का बरं लिहीत नाही ? " त्यांनी सुविचारांचं पुस्तक आणलं आणि म्हणाले की , तुम्ही प्रत्येक सुविचारावर लिहा. मी पुस्तक डोळ्यांखालून घातलं. पूर्वी निकोला आणि फ्रेडनी माझ्या भाषणांमधून आणि लिखाणातून काही सुविचार एकत्र करून एक पुस्तक बनवलं होतं. सुविचार १ जानेवारीला सुरु होऊन ३१ डिसेंबरला संपतात. बरोबर एका वर्षाचा कालावधी आहे. तर चला, आपण पहिला सुविचार पाहुयात. 

१ जानेवारी 

" आपण जिवंत असलेला प्रत्येक क्षण ही भगवंताबरोबर जगण्याची संधी आहे. "

           केवळ आणि केवळ भगवत्प्राप्तीकरताच हा जन्म आपल्याला मिळाला आहे. तरीही सर्वजण नाव, प्रसिद्धी, पदवी, कुटुंब आणि पैसे अशा भौतिक गोष्टींसाठी ह्या जन्माचा गैर वापर करतात. ह्या गोष्टी अगदी निरुपयोगी आहेत. आपण जर भगवत्प्राप्तीचा प्रयत्न केला तरच मानवी जन्माला अर्थ आहे, ह्या जन्मताच जन्म मृत्यूच्या फेऱ्यांना आपण खीळ घालू शकतो. 
            आपल्या हाताशी असलेला प्रयेक क्षण म्हणजे भगवंताविषयी विचार करण्याची संधीच आहे. तथापि बहुतेक सर्वजण सकाळपासून रात्रीपर्यंत पूर्ण दिवस अनावश्यक विषयांवर विचार करण्यात फुकट घालवतात. आपण अगदी एक क्षण सुद्धा भगवंताविषयी मनःपूर्वक विचार करत नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत आपल्या मनात  किती विचार येत असतात बरं. किती वैविध्यपूर्ण विषयांवर आपण विचार करतो ! भगवंतासाठी जेमतेम १० मिनिटं राखून ठेवली जातात, आणि इतर दैनंदिन कामांमध्ये त्याला बसवलं जातं. लोकं देवघरात यंत्रवत जातात आणि मग त्यांच्या दिवसाची सुरुवात करतात. भूक लागली की आपण खातो. तहान लागली की काहीतरी पितो. थकवा वाटला की झोपतो. परंतु देवाचा विचार करण्यासाठी आपल्याला खास भाव मिळालेला नाहीये. परमेश्वरानं आपलं शरीर असं बनवलं आहे की, सगळे भाव आपल्यात नैसर्गिकपणे निर्माण होतील: जस की भूक, तहान, झोप वगैरे. तथापि भगवंताकरता तृष्ण ह्यात समवीत नाहीये. माणूस कार्यालयात जातो आणि दिवसाच्या अखेरीस घरी परततो. तो काहीतरी खातो, कुटुंबियांशी आनंदात गप्पा गोष्टी करतो आणि झोपून जातो. तो रात्रभर झोपतो, सकाळी उठतो आणि कॉफी पीत समाचार पात्र वाचतो. ही कॉफी पलंगावरच पडून पितात म्हणे आणि तिला " बेड कॉफी " असं म्हणतात. पलंगावरून बाहेर यायच्या आधीच ही प्यायला जाते आणि पेपरही वाचला जातो. तो त्याचे कुटुंब, नातेवाईक आणि त्याचा व्यवसाय ह्यासंबंधी विचार करत दिवस घालवतो. रात्री अगदी झोपायची वेळ झाली तरीही तो देवाचा अथवा अध्यात्माचा विचार करत नाही. तो कायम क्षणभंगुर वस्तूंचा आणि विषयांचा विचार करत असतो. तुमच्या जन्मामुळं तुम्हाला माता पित्याशी नातं मिळत. लग्न झाल्यानंतर पत्नी आणि मुलांशी नातं जुळतं. ही सर्व नाती अशाश्वत आहेत. म्हणून प्रत्येकानं आपापलं कर्तव्य आसक्तीविना करावं. हे माझ्या जीवनाचं तत्व आहे. मी वयाची ६३ वर्षे आसक्तीशिवाय जगले. मी माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण फक्त भगवंताचा विचार करत व्यतीत केला. हे ७२ वर्षांचे अविरत, अखंड विचार जगाचा अक्ष बदलतात. स्वामींनी हे सांगितलंय आणि मी आधीच्या अध्यायात ह्याविषयी लिहिलंय. कलियुग सत्ययुगात परिवर्तित होतं व पृथ्वीवर स्वर्ग अवतरतो. सर्व मानवी जीव जीवनमुक्त अवस्था प्राप्त करतात. 

जय साईराम 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा