रविवार, २३ जानेवारी, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
पुष्प - ४९
आनंद 

             आपल्याला वाटते की आनंद बाह्य गोष्टींमधून मिळतो. पती, पत्नी , मुले , कुटुंब, धन, घर, गाडी, प्रतिष्ठा इ. गोष्टींतून आनंद मिळेल म्हणून आपण ह्या गोष्टींच्या मागे धावतो. तथापि हा आनंद क्षणभंगुर असतो. तो चिरंतन काल टिकत नाही. आनंद केवळ मनुष्याच्या अंतरातून प्राप्त करता येतो. परमेश्वर प्रत्येकाच्या अंतरंगात असतो हा आनंद बाहेर प्रतिबिंबित होतो. बाह्यवस्तुतून आनंद मिळतो ह्या विचाराने आपण जन्म मृत्युच्या चक्रात अडकतो. आत्मा हाच परमेश्वर, आत्मनिवासी. परमेश्वर अविनाशी आणि शाश्वत आहे. भौतिक वस्तु नाशवंत असतात. म्हणून तुम्ही परमेश्वराला आतमध्ये शोधले पाहिजे. तरच तुम्हाला खरा आनंद, जो आतमध्ये आहे तो प्राप्त होईल. 
           मनुष्य बाह्य जगतात आनंदाचा शोध घेतो. जेव्हा बाहेर अनुभवलेला आनंद खरा नाही हे त्याला समजल्यानंतर तो थकलेला जीव आतमध्ये आनंद शोधू लागतो. कठोर प्रयत्न आणि साधना करून त्याला ज्ञानप्राप्ती होते. तो सत्याचा कसोशीने शोध घेतो आणि अखेरीस ज्ञानाचा उदय होतो. हे ज्ञान म्हणजेच परमआनंद युगानुयुगे आपल्याला हेच शिकवले जाते की आपण त्या अदृश्य स्वरूपातील परमेश्वरापासून आनंद मिळवू शकतो. निर्मिती अनित्य आहे. आपल्या डोळ्यांना जी निर्मिती सृष्टी दिसते ती परमेश्वरमधूनच आली आहे. परमेश्वर आणि सृष्टी आपण वेगवेगळे का मानतो ? जो आनंद आपल्याला परमेश्वरापासून मिळतो तोच आनंद आपल्याला निर्मितीतून का मिळत नाही ? जीवनभर ह्याचे संशोधन करत आहे. माझे जीवनानुभव ह्याचा पुरावा देतात की निर्मितीच्या कणकणामध्ये परमेश्वर भरून राहिला आहे. अदृश्य परमेश्वर आणि दृश्य सृष्टी दोन्ही एकच आहे, दोन्ही परमेश्वर आहे. निर्मितीमधूनही आपल्याला तोच आनंद मिळाला पाहिजे. बाह्य वस्तू , कुटुंब , नातीगोती इ. ना आपण माया  म्हणून दूर का सारतो. तेही सर्व परमेश्वर आहे. ह्या जगात माया नाहीय. सर्व काही भगवंतमयम् आहे, विष्णुमयम् आहे. प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक जाणत भगवंत भरून राहिला आहे. जे जे आपल्या दृष्टीस पडते ते सर्व परमेश्वर आहे. ह्या सर्वांमधून आपण आनंद मिळवला पाहिजे. हा सत्ययुगाचा पाय आहे. 

संदर्भ - श्री वसंतसाईंच्या ' आनंद सूत्र ' ह्या पुस्तकातून. 

जय साईराम    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा