रविवार, २८ ऑगस्ट, २०२२

ॐ साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
" आपले अनुभव हे आपल्या भावविश्वाचे प्रतिबिंब होय."
११
विंचवाची गोष्ट 

           दोन दिवसांपूर्वी मी स्वामींच्या ' माय डियर स्टुडंट्स ' या पुस्तकात वाचले, 
           ... एकदा काय झाल, एक माणूस एका छोट्याशा गणेशमंदिरात प्रदक्षिणा घालत होता. इतक्यात पाऊस लागला. म्हणून तो आता गाभाऱ्यात शिरला आणि गणपतीच्या मूर्तीला चिकटून उभा राहिला. मग त्याने गणपतीच्या मूर्तीच्या सोंडेला, पायांना वगैरे भक्तिभावाने स्पर्श करण्याची संधी सांधली. जेव्हा त्याचा हात मूर्तीच्या पोटाकडे गेला, तेव्हा त्याने त्याचे बोट नाभीत घातले. आत लपलेला विंचू लगेच त्याला चावला. अरेरे !! पण तो काय करू शकणार ?तो ते इतरांना सांगूही शकला नाही. दरम्यानच्या काळात पाऊस थांबला आणि तो बाहेर आला. पण स्वतःला वाईट अनुभव आला तसा इतरांनाही यावा असा खुन्शी विचार त्याच्या मनात आला. त्याने सर्वांसमोर जाहीर केले, " अहाहा !! मी गणेशाच्या नाभीत बोट घातले आणि अचानक आनंदाने भरून पावलो !" हे ऐकल्यावर प्रत्येकाने बोट घातले आणि त्यांना विंचवाच्या चाव्याचा प्रसाद मिळाला. परंतु त्यांनी शांतपणे वेदना सहन करून चेहऱ्यावर आनंद दाखवला. कोणीही सत्य प्रकट केले नाही. 
           आजच्या वडीलधाऱ्या लोकांची हीच अवस्था आहे. ते स्वतःभौतिक जीवनाच्या दुःखात खोलवर डुबलेत, तरीही इतरांना सल्ला देतात, " वा ! भौतिक जीवन किती सुखकर आहे, ते आनंदाचा स्रोतच आहे. या ! त्यात उड्या घ्या !"    

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम  

गुरुवार, २५ ऑगस्ट, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
     " आपली श्रद्धा आणि भक्ती यांच्याद्वारे आपण लाभान्वित होतो. कोणतीही बाह्य गोष्ट वा व्यक्ती यांच्यामुळे नव्हे. "
१०
कली म्हणजे कर्म 

          आता स्वामी म्हणाले की, जे विष आहेत त्यांच्यावर करुणा दाखवू नये. जर मी हे केले, तर तो सत्ययुगाच्या उदयास अडथळा ठरेल. स्वामी पुढे म्हणाले, " ज्यांनी तुला त्रास दिला त्यांना दिलेला करुणेचा वर मागे घे. तरच मी ते विष नष्ट करू शकेन. "
          त्यानंतर स्वामींच्या पादुकांवर छोटेसे अंगठ्यांचे ठसे आढळले. स्वामी म्हणाले, " मी रुद्र तांडवाने विष नष्ट करत आहे याचा हा पुरावा आहे."
          ...शेवटी क्षीर समुद्रातून महालक्ष्मी हातात पुष्पमाला घेऊन प्रकट होते. योगनिद्रेत असलेल्या  महाविष्णुंच्या गळ्यात ती पुष्पमाला घालते. 
          आता असेच घडते आहे. स्वामी साक्षी अवस्थेत आहेत. विष नष्ट केल्यावर, स्वामी आणि मी अमृतयुगात भेटणार. सत्यत्युगाचा उदय होईल. 
  
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
 
उर्वरित प्रकरण पुढील भागात ...... 
जय साईराम  

मंगळवार, २३ ऑगस्ट, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार - ९ जानेवारी 

        " प्रथम भाव तरंग निर्माण होतात आणि नंतर विचार. विचार कृतीत उतरण्यापूर्वी आपण सारासार विवेक करावयास हवा. हे चांगलं आहे का? यामुळे मला  भगवत्प्राप्ति होण्यास मदत होईल का? "

पहिल्या प्रथम मनात भाव तरंग निर्माण होऊन ,नंतर ते विचारात परिवर्तीत होतात. जेव्हा जेव्हा आपल्या मनात भाव निर्माण होतो तेव्हा तेव्हा आपण स्वतःस विचारावं की, " हे चांगलं आहे की नाही?"  आपण येथेच ते भाव छेदून टाकले नाही तर ते विचार खोल ठसे बनतात. हे खोल ठसे आपल्या जन्म मरणाचं कारण असतात. आपल्याला मानवी जन्म भगवत्प्राप्ति करता मिळाला आहे. भौतिक सुखांच्या उपभोगासाठी हा जन्म नाहीये. इंद्रिय सुखं क्षणिक असतात. नवविवाहित अगदी आनंदी असतात. असे असूनही कालांतरानं त्यांच्यात मतभेद निर्माण होतात. तुमचा तो आनंद कुठे नाहीसा  होतो? मग मुलगा होतो, तुम्ही सुखी होता. मुलगा मोठा होतो आणि आई -  वडिलांबरोबर वाद घालू लागतो. आता तो आनंद कुठे जातो? भौतिक जीवनाचं  नाशवंत स्वरूप यामधून दिसून येतं. यावर तुम्हाला कोणीही शाश्वत उपाय सांगू शकत नाही, तसेच तुम्हाला जन्म - मरणाच्या चक्रातून मुक्तही करू शकत नाही. जीवनाच्या या वास्तविकतेवर चिंतन करा. सर्वानी त्यांची कर्तव्ये आसक्तीविनाच केली पाहिजेत. ही आसक्तीच सर्वाना जन्म मरणाच्या फेऱ्यात ढकलते. 'मी, आणि माझं ' ही प्रवृत्ती आसक्तीला जन्म देते. खरं तर ही आसक्ती म्हणजे मायाजाल होय. माया मेनकेच्या रूपातच यायला हवी असं काही नाहीये. आपले अनेकानेक विचारच विविध मेनका आहेत. चांगले विचार भगवत्प्राप्तिकरता मदत करतात; तर वाईट विचार तुम्हाला त्यापासून दूर ठेवतात. म्हणून प्रत्येकाने विचाराच्या पातळीवरच संयम ठेवून विवेक करायला हवा.  
"चांगलं पहा, चांगलं व्हा आणि चांगलं करा " ही भगवान श्रीसत्यसाई बाबांची शिकवण आहे. सगळ्यात चांगलंच पहायला  पाहिजे. मी ही  शिकवण खूप लहान वयातच आचरणात आणली. मी "तोडा आणि जोडा" ही पद्धत वापरली. मी जे काही पाहत असे त्या प्रत्येकाचा भौतिक अर्थ तोडून भगवंताशी जोडत असे. ही साधी पायवाट भगवत्प्राप्तिचा राजमार्ग झाली. अशा रीतीने मी अक्षरश: जे काही पहिले ते ते सर्व भगवंताशी जोडले. या विषयावर मी अनेक अध्यायात विस्तारानं लिहिलं आहे.
आता आपण एक गोष्ट पाहू  यात. एकदा दरबारातील ज्येष्ठांनी दुर्योधनास सांगितले,"जगभर फिरून एक चांगला माणूस शोधून आण. " दुर्योधन जगभर फिरून हात हलवत परत आला व म्हणाला, " मला चांगला माणूस भेटलाच नाही. ह्या जगात सगळे वाईट आहेत. मी एकटाच चांगला आहे." नंतर त्यांनी धर्मराजास एक वाईट माणूस शोधून आणण्यास सांगितले. तो शोधात निघाला, तथापि काही दिवसांनी एकटाच परतला. धर्मराज ज्येष्ठांना म्हणाला,"ह्या जगातील एकूणएक सर्व चांगले आहेत. मी एकटाच वाईट आहे." त्या दोघांचे उत्तर त्यांचा स्वभाव दर्शविते. त्यांचा स्वभाव त्यांच्या उत्तरातून प्रतिबिंबित झाला होता. 
धर्मराजा स्वतः इतका चांगला होता की त्याला जगात कोणीही वाईट दिसू शकले नाही. त्यानं चांगलं पाहिलं, त्याचे विचार चांगले होते आणि पर्यायानं आचरणही चांगलं होतं. स्वामींची शिकवणसुद्धा हीच आहे,"चांगलं पहा, चांगलं रहा आणि चांगलं वागा." तुम्ही जर या शिकवणुकीनुसार वर्तन केलंत तर भगवत्प्राप्ति  करू शकाल. 
मी जे जे काही पहाते ते सर्व भगवंताशी जोडते. हा माझा स्वभाव आहे. या स्वभावामुळे मी "यद् भावं तद् भवति" ह्या सत्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. माझा प्रत्येक विचार सत्यात उतरतो. माझ्या तपश्चर्येमुळे अखिल सृष्टी,'सत्य साई' होते. सर्वत्र, प्रत्येक गोष्टीत आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये 'साई चेतना ' जागृत होते. हेच साई युग आहे, सत्य युग आहे. माझ्या भावविश्वाद्वारे केवळ मलाच भगवत्प्राप्ति होते असं नाही तर, माझ्यामुळे स्वामी सर्वाना भगवत्प्राप्ति बहाल करतात. हे सर्व माझ्या भाव तरंगांमुळे शक्य होते.

जय साईराम 

रविवार, २१ ऑगस्ट, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
     " सत्याला केवळ वेद आणि उपनिषदे यांच्यामध्ये परिसीमित करू नका. सत्य सर्वव्यापी आहे व प्रत्येकाचे आहे. "
१०
कली म्हणजे कर्म 

            देव आणि दानवांनी अमृत प्रकट होईपर्यंत समुद्रमंथन चालूच ठेवले. अमृतासाठी सर्वजण भांडू लागले त्यावेळी महाविष्णुंनी मोहिनीचे रूप घेतले. सर्वांना तिच्या सौंदर्याची भुरळ पडली आणि तिने अमृत वाटावे यास सर्वांनी संमती दिली. फक्त देवांना त्याचा वाटा मिळाला, असुरांना मिळाला नाही. प्रभूंनी असुरांना फसवले. 
            मी ' प्रेमसाई अवतार भाग ५ ' या पुस्तकात ' अमृत पॉट ब्रोकन ' म्हणजेच अमृतकलश फोडला असे प्रकरण लिहिले आहे. मी म्हटले आहे, " देव आणि  दानव दोघेही माझी मुले आहेत. मी अमृतकलश फोडून सर्वांना अमृत देईन. "
            माझा कारुण्यभाव व्यक्त करण्यासाठी मी हे लिहिले. मला सर्वांना अमृत द्यायचे आहे आणि सर्वांना अमृतयुगाकडे न्यायचे आहे. "   

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम  

गुरुवार, १८ ऑगस्ट, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

कृष्ण जन्माष्टमी संदेश 

तिमिराकडून तेजाकडे 


           परमेश्वर, त्याच्या नटखटतेनी लिलांनी गीतांनी व मधुरतेने मानवतेला मोहित करण्यासाठी तसेच मानवाला प्रेममार्ग दर्शवण्यासाठी, प्रेममय जीवन कसे जगावे हे दर्शवण्यासाठी कृष्णरुपात अवतरला कृष्णाचा जन्म श्रावण महिन्याच्या कृष्णपक्षातील अष्टमीला झाला जेव्हा अंधःकार असतो तेव्हा परमेश्वराचे तेज अधिक प्रभावशाली दिसते. जगामध्ये सर्वत्र पसरलेल्या अराजकतेस दूर करून तेथे सुव्यवस्था स्थापन करण्यासाठी कृष्णाने जन्म घेतला. अष्टमी ही तिथी त्रास आणि अडचणींशी संबंधित आहे. त्रास कधी उद्भवतो? जेव्हा धर्माचे विस्मरण होते. कृष्णाचे आगमन, अंधःकाराचा नाश, त्रास व अडचणींचे निराकरण आणि अज्ञान दूर करून, मानवजातीस परमोच्च ज्ञानाचा बोध ह्या गोष्टी सूचित करते. 

सत्यसाई स्पीकस् व्हॉल्यूम ३
१२ ऑगस्ट १९६३

 


  
जय साईराम  
 
ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
       " 'मी' हे अहंकाराचे प्रतिक आहे. स्वप्रयत्नांद्वारे साधक अंतरातील ' मी ' ला प्राप्त करून घेतो हाच आत्मसाक्षात्कार होय."
१०
कली म्हणजे कर्म 

            तेल हे कर्मसंहारासाठी आहे. सर्व जगाची कर्म घुतली गेली. कडवट पाणी म्हणजेच विष, जे स्वामींच्या कार्याच्या विरुद्ध वागतात त्याचे प्रतिक. ह्या दुष्ट शक्तींचा संपूर्ण जगातून नाश झाला.
           कर्मसंहार सहजतेने करता येतो, अगदी दुष्ट दारुड्यालाही मुक्ती मिळू शकते. परंतु, विष काढून टाकणे कठीण असते. फक्त परमेश्वरच ते करू शकतो. कोणाचीही त्यातून सुटका नसते. 
           जेव्हा क्षीरसमुद्र मंथन सुरु झाले, त्यातून प्रथम प्रकट झाले ते हलाहल. सर्वांनी भगवान शंकराकडे धाव घेतली. भोळ्या भोलानाथाने जराही विचार न करता ते विष पिऊन टाकले. पार्वतीने लगेच प्रभूंच्या गळ्याशी आपले हात धरले आणि ते विष शरीरभर पसरण्यापासून रोखले. साधा भोळा भोलानाथ !  

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा

उर्वरित प्रकरण  पुढील भागात ..... 
जय साईराम  

रविवार, १४ ऑगस्ट, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
" त्यागामध्ये सत्याचे प्रकटीकरण करण्याचे सामर्थ्य असते. "
१०
कली म्हणजे कर्म 

तारीख २२ डिसेंबर २००८ 
        आज जेव्हा आम्ही विनायकाच्या अभिषेकासाठी गेलो, तेव्हा तिथल्या स्वामींच्या फोटोवर तेलाचा ठसा पाहिला. त्यांच्या डाव्या हातावर एक गोलाकार तीन रेषांसह असा तो ठसा होता. माझ्या खोलीतील टेबलावर विभूतीची एक रेष होती. 
दुपारचे ध्यान 
वसंता - स्वामी, तुमच्या फोटोवर एक गोल आणि तीन रेषा असा तेलाचा ठसा आला. हे काय सुचवते. 
स्वामी - कर्मसंहार 
वसंता - स्वामी, तुमच्या पादुकांच्या खाली थोडस कडवट पाणी आणि टेबलावर विभूती आली. त्याचा अर्थ काय ?
स्वामी - कडवट पाणी म्हणजेच विष, जे परमेश्वराच्याविरुद्ध कार्य करते आहे. विभूती कामदहनासाठी आहे. हे तीन अडथळे जगातून दूर केले आहेत. 
वसंता - स्वामी, मी खूप खुश आहे. कृपाकरुन मला लवकर बोलवा. मला तुम्हाला भेटायचे आहे. 
स्वामी - आपण लवकरच भेटू 
ध्यानाची समाप्ती  

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात..... 
जय साईराम  

गुरुवार, ११ ऑगस्ट, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
       " शुद्ध सत्वाचे तेज प्रकट झाल्यानंतर देह दिव्य तेजाने झळकतो."
१०
कली म्हणजे कर्म 

          माझ जीवन हे गुण दाखवतात. कलियुगात या गुणांचा विसर पडला आहे. युगवतार स्वामींनी  मला याच कारणासाठी आणले आहे. ते माझ्या स्वभावाद्वारे प्रेम सर्वव्याप्त करत आहेत. आजपर्यंत कोणत्याही अवतारांनी माणसाची कर्म घेऊन त्याला मुक्ती बहाल केली नव्हती. 
          या संधीचा उपयोग करून घ्या. या कलियुग अवताराच्या चरणांशी पूर्णपणे समर्पण व्हा. स्वामींनी अनेक भक्तांना जीवघेण्या प्रसंगातून वाचवले आहे. त्यांच्या लीला जगात सर्वश्रुती आहेत.

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 
  
उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम  

रविवार, ७ ऑगस्ट, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
       " साधनेद्वारे सर्वजण परमेश्वराला जाणू शकतात व परमेश्वरस्वरूप होऊ शकतात. "
१०
कली म्हणजे कर्म 

          प्रथम स्वतःवर करुणा दाखवा. स्वतःशीच विचार करा, ' मी किती धडपडत आहे ? मी काय करू ? माझ्या समस्यांवर उपाय काय ?' परमेश्वराप्रती हाच एकमेव उपाय आहे. तुम्ही तुमच्या पीडा, शंका, व्यथा आणि चिंतांची यादी बनवा. केवढी मोठी यादी ! तुम्ही अजून किती जन्म घेणार ? पुरे, पुरे ! स्वतःवर करुणा करा, दया दाखवा. नाहीतर तुमची कर्मकायद्यापासून सुटकाच नाही. 
           जेव्हा तुम्ही स्वतःवर दया करता आणि स्वतःला मुक्त करता, तेव्हाच सर्वांप्रती दयाळू होऊ शकता. हाच माझा स्वभाव आहे. आणि त्याचमुळे नवीन युग येणार आहे. जर तुम्ही स्वतःवर दया दाखवली नाही, तर तुम्ही तुमच्या शत्रूवर कशी काय दया दाखवणार ?

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम  

गुरुवार, ४ ऑगस्ट, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः  
सुविचार 
         " वैराग्याची तलवार आणि बुद्धीचे सामर्थ्य यांच्या सहाय्याने कामनामक शत्रूंचा नायनाट करा. "
१०
कली म्हणजे कर्म
 
           तुम्ही स्वतःवर जस प्रेम करता तसच शेजाऱ्यांवरही करा. मी माझ्यावर प्रेम करते. म्हणूनच मी सर्वांवर माझ्याप्रमाणेच प्रेम करते. तुम्ही कदाचित विचाराल, ' मी इतरांवर माझ्याप्रमाणेच कसे काय प्रेम करू शकते ? माझ जीवन याच प्रात्यक्षिक आहे. संपूर्ण जग वसंता व्हावे. मगच मी सर्वांवर खरखुर प्रेम करू शकेन. 
          वेदांमध्ये म्हटले आहे. ' एकोहं बहुस्याम् ' एका वसंतामधून वसंतमयम् सृष्टीची निर्मिती होते. माझ्या जीवनामधून मी वेदिक तत्वांचे प्रात्यक्षिक केल आहे. मी सर्वांवर करुणा दाखवते आहे. लहानपणापासूनच मी सतत इतरांच्या दुःखाचा विचार करित असे. दुःखी पीडितांना मला मदत कराविशी वाटे. वैश्विक मुक्तिच्या रूपात माझी ही इच्छा फलद्रुप झाली.     

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम