रविवार, २८ ऑगस्ट, २०२२

ॐ साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
" आपले अनुभव हे आपल्या भावविश्वाचे प्रतिबिंब होय."
११
विंचवाची गोष्ट 

           दोन दिवसांपूर्वी मी स्वामींच्या ' माय डियर स्टुडंट्स ' या पुस्तकात वाचले, 
           ... एकदा काय झाल, एक माणूस एका छोट्याशा गणेशमंदिरात प्रदक्षिणा घालत होता. इतक्यात पाऊस लागला. म्हणून तो आता गाभाऱ्यात शिरला आणि गणपतीच्या मूर्तीला चिकटून उभा राहिला. मग त्याने गणपतीच्या मूर्तीच्या सोंडेला, पायांना वगैरे भक्तिभावाने स्पर्श करण्याची संधी सांधली. जेव्हा त्याचा हात मूर्तीच्या पोटाकडे गेला, तेव्हा त्याने त्याचे बोट नाभीत घातले. आत लपलेला विंचू लगेच त्याला चावला. अरेरे !! पण तो काय करू शकणार ?तो ते इतरांना सांगूही शकला नाही. दरम्यानच्या काळात पाऊस थांबला आणि तो बाहेर आला. पण स्वतःला वाईट अनुभव आला तसा इतरांनाही यावा असा खुन्शी विचार त्याच्या मनात आला. त्याने सर्वांसमोर जाहीर केले, " अहाहा !! मी गणेशाच्या नाभीत बोट घातले आणि अचानक आनंदाने भरून पावलो !" हे ऐकल्यावर प्रत्येकाने बोट घातले आणि त्यांना विंचवाच्या चाव्याचा प्रसाद मिळाला. परंतु त्यांनी शांतपणे वेदना सहन करून चेहऱ्यावर आनंद दाखवला. कोणीही सत्य प्रकट केले नाही. 
           आजच्या वडीलधाऱ्या लोकांची हीच अवस्था आहे. ते स्वतःभौतिक जीवनाच्या दुःखात खोलवर डुबलेत, तरीही इतरांना सल्ला देतात, " वा ! भौतिक जीवन किती सुखकर आहे, ते आनंदाचा स्रोतच आहे. या ! त्यात उड्या घ्या !"    

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा