ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
कृष्ण जन्माष्टमी
संदेश
तिमिराकडून तेजाकडे
परमेश्वर, त्याच्या नटखटतेनी लिलांनी गीतांनी व मधुरतेने मानवतेला मोहित करण्यासाठी तसेच मानवाला प्रेममार्ग दर्शवण्यासाठी, प्रेममय जीवन कसे जगावे हे दर्शवण्यासाठी कृष्णरुपात अवतरला कृष्णाचा जन्म श्रावण महिन्याच्या कृष्णपक्षातील अष्टमीला झाला जेव्हा अंधःकार असतो तेव्हा परमेश्वराचे तेज अधिक प्रभावशाली दिसते. जगामध्ये सर्वत्र पसरलेल्या अराजकतेस दूर करून तेथे सुव्यवस्था स्थापन करण्यासाठी कृष्णाने जन्म घेतला. अष्टमी ही तिथी त्रास आणि अडचणींशी संबंधित आहे. त्रास कधी उद्भवतो? जेव्हा धर्माचे विस्मरण होते. कृष्णाचे आगमन, अंधःकाराचा नाश, त्रास व अडचणींचे निराकरण आणि अज्ञान दूर करून, मानवजातीस परमोच्च ज्ञानाचा बोध ह्या गोष्टी सूचित करते.
सत्यसाई स्पीकस् व्हॉल्यूम ३
१२ ऑगस्ट १९६३
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा