रविवार, २७ नोव्हेंबर, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
         " सर्व गोष्टींची अनुभूती घेण्याची इच्छा ठेवू नका तर सर्वांतर्यामी परमेश्वराची भक्ती करा. "
१३
सामूहिक विवाह
 
          परमेश्वर स्वतः तो कशा परिस्थितीत आहे याविषयी उघडपणे बोलत आहे, ही घटना म्हणजेच सत्याकडे दुर्लक्ष करणे होय. हे दुर्लक्षच जगभरातील संकटांचे कारण होय. काही थोड्या लोकांमुळे अनेक निरपराध्यांना क्लेश सहन करावे लागतात. तरीसुद्धा या सर्व घटना ' सत्ययुगात आगमन '- या दिव्य योजनेचा एक भाग आहेत. 
रामावतार - राक्षसांशी युद्ध - राक्षस कुळाचा संहार 
कृष्णावतार - महाभारत युद्ध - दृष्टांचा संहार 
सत्यसाई अवतार - पंचमहाभूतांमध्ये सूसूत्रतेचा अभाव - पूर, बॉम्बस्फोट , त्सुनामी, भूकंप - लोकांचे परिवर्तन. 
          ऋषींनी नाडीशास्त्रात भविष्य वर्तवल्याप्रमाणे इथे मुक्ती निलयममध्ये भव्य स्तंभ - मुक्तिस्तूप बांधला गेला. हा काही नाव, संपत्ती किंवा प्रसिद्धीसाठी बांधला गेला नाही. सर्व ऋषींनी माझ्या आणि स्वामींच्या नात्याविषयी आधीच जाहीर केले आहे. हे वाचल्यावर काही लोकांनी मला स्वामींपासून दूर करण्याचा प्रयत्न केला आणि प्रशांतीत प्रवेश नाकारला. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
 
उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
        " परमेश्वर केवळ एकच आहे, आपण सर्वजण त्याची लेकरे आहोत. हे सत्य आहे. " 
१३
सामूहिक विवाह 

           ज्यांनी मला प्रशांतीमध्ये येण्यास बंदी घातली, त्यांना हे सर्व माहीत आहे. तरीसुद्धा सत्य जाणून घेण्यासाठी योग्य चौकशी न करता किंवा तपास न करता त्यांनी मला विरोध केला. हेच सत्य दुर्लक्षिणे होय. त्यांनी केवळ माझाच नाही तर स्वामींचासुद्धा अपमान केला. याच कारणासाठी स्वामी त्यांचे भाव त्यांच्या प्रवचनात व्यक्त करतात. अलीकडेच त्यांच्या विजयादशमीच्या प्रवचनात स्वामी म्हणाले, 
           " अनेक लोक माझ्या शब्दांना महत्व देत नाहीत आणि विचारातही घेत नाही. परंतु हे योग्य नव्हे. मी कुठल्याही बाबतीत जे काही बोलतो ते सत्य आणि फक्त सत्यच असते. जे माझ्याबरोबर वावरत आहेत त्यांनाही हे समजत नाही. याचा परिणाम असा होतो की, मी ज्यांना जे सांगतो त्याकडे त्यांचे कधीकधी दुर्लक्ष होते... त्यामुळे माझी अतिक्षय कुचंबणा होते. "

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

बुधवार, २३ नोव्हेंबर, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

वाढदिवस संदेश

अवतार वाणी


तुम्ही स्वतःच तुमचे गुरु बना. तुमच्यामध्ये रोपण  केलेल्या ज्ञानाच्या स्फुल्लिंगाचा वापर करून स्वतःला प्रशिक्षित करा. एकदा तुम्ही तुमची सर्व शक्ती पणाला लावून प्रयत्न केलेत की परमेश्वरी कृपा तुम्हाला उन्नत करण्यासाठी तेथे विद्यमान असेल. आध्यात्मिक साधनेतील पहिली पायरी आहे वाणी शुद्ध करणे. वाणीमध्ये मधुरता असावी,क्रोध नसावा. तुम्ही प्राप्त केलेल्या गोष्टींविषयी व ज्ञानाविषयी दुराभिमान बाळगू नका. इतरांच्या आनंदात आनंद मानण्याची तसेच तुमच्या भोवताली असणाऱ्या लोकांच्या दुःखात सहभागी होण्याची वृत्ती विकसित करा. त्यांच्या भावना जाणून घेऊन सहानुभूतीने तुमचे अंतःकरण हेलावून जाऊ दे परंतु आनंद आणि दुःख केवळ भावनिक स्तरावर राहू न देता ते सेवेमध्ये परिवर्तित करा. सूर्योदय झाल्यावर तळ्यामधील सर्व कमळे उमलत नाहीत,केवळ परिपक्व झालेल्या कळ्याच उमलतात. इतर त्यांची वेळ येण्याची प्रतीक्षा करतात. अर्धपक्वतेमुळे हा फरक पडतो परंतु एक लक्षात घ्या सर्व फळे कधी  ना कधीतरी पिकतील आणि गळून पडतील. प्रत्येक जिवत्याच्या द्येयाप्रत पोहोचणारच मग त्याची वाटचाल कितीही लांब पल्ल्याची असो!
दिव्य संदेश,एप्रिल २३,१९६१

मित बोला,मधुर बोला, केवळ आवश्यकता असेल तेव्हाच बोला,ज्यांच्याशी बोलणे गरजेचे असेल त्यांच्याशीच बोला,रागाने वा उद्दीपित होऊन मोठयाने ओरडून बोलू नका. 
-बाबा




साईराम, येत्या ९ तारखेपासून आपण Blog वर एक नवीन सदर ' ज्ञान मौक्तिके ' ह्या नावाने सादर करीत आहोत. प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेला हे सदर Blog वर  प्रकाशित केले जाईल. 

जय साईराम

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार - १२ जानेवारी 
 
"सर्वांवर प्रेम करा पण कुणा एकाच व्यक्तीला माया लावू नका." 

आपण ह्या सुविचाराबाबत पाहू यात . स्वामी म्हणतात 
" सर्वांवर प्रेम करा, सर्वांची सेवा करा." आपण आपला प्रेम भाव केवळ आपल्या कुटुंबीयांकरिता आणि नातेवाईकांकरिता राखून न ठेवता सर्वांवर सारखेच प्रेम करावे. कुणा एकावर अति प्रेम करू नये. कारण असं प्रेम आसक्तीत बदलतं. ह्या आसक्तीचे खोल ठसे बनतात. हे ठसे आपल्याला जन्ममृत्यूच्या चक्रात फसवतात. केवळ अनासक्ती तुम्हाला  जन्ममृत्यूच्या चक्रामधून वाचवू शकते. 
प्रत्येकानं सर्वांवर प्रेम केलंच पाहिजे. ही भगवान सत्य साई बाबांची शिकवण आहे. सर्वांवर प्रेम करा आणि सर्वांची सेवा करा. तुम्ही सर्वांवर प्रेम केलंत तर कारुण्य भाव भगवंताकडून तुमच्याकडे प्रवाहित होतो. माझं जीवन ह्याचं उदाहरण आहे. मी सर्वांवर प्रेम करते. स्वामींनी मला मुक्ती बहाल केली तथापि मी सर्वांसाठी मुक्ती मागितली कारण की, मी सर्वांवर सारखंच प्रेम करते. मी माझं उभं आयुष्य केवळ ह्याकरिता तपश्चर्या करीत आहे. ह्या कारणामुळं स्वामींनी आणि मी अखिल मानवतेची कर्मे आमच्यावर घेतली. भगवंत त्यानं स्वतः नेमून दिलेल्या कर्म कायद्यात दखल देत नाही. असे असूनही माझ्या अखंड तपश्चर्येसाठी त्याला काहीतरी करावंच लागेल. ही माझ्या तपश्चर्येची शक्ती आहे. मला माझ्याकरिता माझ्या तपश्चर्येचं फळ नकोय. अशा परिस्थितीत माझी तप:शक्ती अजून वाढते. माझ्या तप:शक्तीमुळे भगवंताकडून मला वैश्विक मुक्ती मिळते. ह्या कारणास्तवच भगवंत स्वतः सर्वांची कर्में घेतात. अशा रीतीनं वैश्विक मुक्ती साध्य होण्यासाठी आम्ही दोघे जागतिक कर्में स्वीकारतो. असं पूर्वी कधी घडलेलं नाही. हे प्रथमच घडत असल्यामुळे मर्त्य माणसाला हे समजणं अवघड आहे. केवळ साधू,संत हे समजू शकतात. 
स्वामी आणि  माझे भावतरंग स्तुपात प्रवेश करतात,तेथून सर्वत्र, व सर्वांमध्ये प्रवेश करत जग परिवर्तन घडवून आणतात. माझी प्रेम भावना मी सर्वांप्रती सारखीच व्यक्त करते,त्यामुळे दुष्ट दारुडा सुद्धा मोक्षास प्राप्त होतो. हे काकभुशंडी महर्षींनी माझ्या स्तुपाच्या नाडीग्रंथात लिहिलं आहे. माझं प्रेम साधू,संत आणि दारुडे ह्यांमध्ये भेदभाव करत नाही. माझा स्वभाव हा असा आहे. मला ह्या जगात कोणाही बद्दल ममत्व नाहीये. मला केवळ भगवान सत्य साई हवे आहेत. मला फक्त आणि फक्त त्यांच्या बद्दल ममत्व आहे. त्यांच्या प्राप्तीकरिता मी कठोर तपश्चर्या केलीय. मला भगवत प्राप्ती माझ्या एकटीसाठी नकोय, तर सर्वांना भगवत प्राप्ती व्हायला हवी. जेणेकरून सर्वजण जीवनमुक्त अवस्था अनुभवतील. ह्यामुळे पृथ्वीवर स्वर्ग अवतरेल. कलियुगाचं सत्ययुग होईल.

जय साईराम 

रविवार, २० नोव्हेंबर, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
       " जसे लोखंड वितळवून साच्यात ओतले जाते तसेच आपण पुन्हा पुन्हा आपले जीवन भक्तीमध्ये वितळवून आध्यात्मिक शिस्त अंगी बनवली पाहिजे. "
१३
सामूहिक विवाह 

           जेव्हा माणूस साक्षात् परमेश्वराशी संघर्ष करतो, तेव्हा धरतीवर मोठ्या प्रमाणावर विध्वंस होतो. अवतार फक्त माणसाला वाचवण्यासाठी येतो. परंतु काही लोक त्याला विरोध करतात. परिणामतः सर्वांना त्रास भोगावा लागतो. यालाच म्हणतात सामूहिक कर्म. सध्या आपण अशीच परिस्थिती अनुभवत आहोत. स्वामी परमेश्वर आहेत हे लोकांना माहीत आहे. स्वामींचा महिमा, त्यांच्या लीला, त्यांचे चमत्कार लोक पहात आहेत. तरीसुद्धा ते त्यांच्याविरुद्ध वागतात. त्याचा परिणाम म्हणून खूप मोठा संहार होईल. 
            स्वामींनी माझ्या पहिल्या पुस्तकावर सही केली आणि म्हणाले की हे प्रशांती पुस्तकालयात ठेवले जावे. त्यांची आज्ञा पाळण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष तर केलेच, आणि इतकेच नव्हे तर मला प्रशांतीमध्ये येण्यास बंदी घातली. आता या घटनेला दहा वर्षे झाली, माझी अनेक पुस्तके प्रकाशित झाली. त्यानंतर स्वामींनी मला ' भगवंताचे अखेरचे सात दिवस ' लिहायला सांगितले. भगवंताच्या अखेरच्या ७ दिवसांबद्दल कोण बरे इतके धैर्याने लिहू शकेल ? स्वामींनी माझ्या वाढदिवशी हे पुस्तक स्विकारले. आम्ही हे त्या पुस्तकात नमूद केले आहे.    

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
       " परमेश्वराला आपण काय समर्पित करतो हे महत्वाचे नसून कसे समर्पित करतो हे महत्वाचे आहे. " 
१३
सामूहिक विवाह 

          धर्माचे अधःपतन झाले की अवतार पृथ्वीवर अवतरून दुष्टांचा नाश करतो व धर्मस्थापना करतो. पूर्वीच्या युगातील अवतारांचे हेच अवतारकार्य होते. आता स्वामी म्हणतात की सत्य दुर्लक्षिले जात आहे. सत्य आणि धर्म एकच आहेत. तीच परिस्थिती स्वामी नवीन शब्दात वर्णन करीत आहेत. सत्य दुर्लक्षिले जाते तेव्हाच धर्माचे अधःपतन होते. 
           त्रेतायुगात, परमेश्वराच्या पत्नीला पळवून नेले. राम परमेश्वर आहे हे सर्वांना ठाऊक होते, तरीसुद्धा हे घडले. कृष्ण परमेश्वर आहे हे माहित असूनही त्याचा अपमान  केला गेला.    

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
 
उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

रविवार, १३ नोव्हेंबर, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
       " आपल्या मनात येणारा प्रत्येक विचार आपण कसे जगणार हे ठरवतो. "
१३
सामूहिक कर्म 

          धर्माचे अधःपतन झाले की अवतार पृथ्वीवर अवतरून दुष्टांचा नाश करतो व धर्मस्थापना करतो. पूर्वीच्या युगातील अवतारांचे हेच अवतारकार्य होते. आता स्वामी म्हणतात की सत्य दुर्लक्षिले जात आहे. सत्य आणि धर्म एकाच आहेत. तीच परिस्थिती स्वामी नवीन शब्दात वर्णन करीत आहेत. सत्य दुर्लक्षिले जाते तेव्हाच धर्माचे अधःपतन होते. 
           त्रेतायुगात, परमेश्वराच्या पत्नीला पळवून नेले. रॅम परमेश्वर आहे हे सर्वांना ठाऊक होते, तरीसुद्धा हे घडले. कृष्ण परमेश्वर आहे हे माहीत असूनही त्याचा अपमान केला गेला. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

गुरुवार, १० नोव्हेंबर, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
        " तोंडातून येणार प्रत्येक शब्द, आपण आपले जीवन कसे जगू हे निर्धारित करतो. "
१३
सामूहिक कर्म 

         सामूहिक कर्म म्हणजे सामूहिक विध्वंस. स्वामी म्हणाले की जेव्हा सत्य दुर्लक्षिले जाते तेव्हा हे घडते. पूर्वी धर्माच्या अधःपतनाने संहार झाला. आता कलियुगात सत्य दुर्लक्षित केल्यामुळे संहार होत आहे. 
         स्वामी म्हणतात की माझ्या अश्रुंमुळे जगात सर्वत्र अशांती आहे. स्वामी रामावतार आणि कृष्णावतारातील अनेक उदाहरणे देतात. रामावतारात रावणाने सीतामातेला पळवून नेल्यामुळे सामूहिक संहार झाला. प्रत्यक्ष परमेश्वराच्या पत्नीला दुःख दिल्यामुळे संपूर्ण कुळाचा नाश झाला. 
           द्वापारयुगात, परमेश्वराच्या जन्मापूर्वीच कंस त्याचा विरोधी झाला. कृष्णाचा जन्म झाल्यावर अनरकांनी त्याचा तिरस्कार केला. कृष्णाने अनेक बाललीला केल्या. पण लोकांनी त्याच्या दिव्यत्वावर विश्वास ठेवला नाही. तो परमेश्वर आहे हे काळूनसुद्धा त्यांनी त्याचा रागराग केला. त्यामुळे खूप मोठा संहार झाला, महाभारताचे युद्ध होऊन प्रचंड मनुष्यहानी झाली.   

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

रविवार, ६ नोव्हेंबर, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
       " जर एखाद्यास तुम्ही तुमचा शत्रू मानलेत तर तो विचार त्याच्या मनात प्रतिबिंबित होईल आणि तो ही तुम्हाला त्याचा शत्रू मानेल. "
१३
सामूहिक कर्म 

           संकटकाळी माणसाला परमेश्वराची आठवण होते. एक म्हण आहे, ' सर्व संपुष्टात आल्यावर देवाचा धावा करण्यात काहीच अर्थ नाही. ' जेव्हा सर्व आलबेल असत तेव्हा माणूस भौतिक वस्तूंच्यामागे धाव घेतो. तो सत्य-असत्याची, शाश्वत- अशाश्वतेची चिकित्सा करीत नाही. परमेश्वर फक्त शाश्वत आहे, बाकी सर्व अशाश्वत आहे. हे सत्य न जाणल्याने माणूस जन्माला येतो आणि मरण पावतो. एका जीवात्म्याची ही स्थिती आहे. तरीसुद्धा जेव्हा संपूर्ण जगाला उत्पात आणि अशांती ग्रासते, तेव्हा विचार आपोआपच परमेश्वराकडे वळतात. बॉम्बस्फोट, वादळ, पूर, युद्ध, भूकंप या सर्वांमुळे माणूस भयग्रस्त होतो. हे भय जीवनाच्या असुरक्षिततेचे असते. लोक सामूहिक प्रार्थना करतात. जेव्हा संकटे माणसाला सर्व बाजूंनी ग्रासतात आणि तो स्वतःच्या प्रयत्नांनी त्यातून मार्ग काढू शकत नाही, तेव्हा तो परमेश्वराकडे वळतो. जेव्हा माणसाच्या लक्षात येते की त्याचे सर्व प्रयत्न निष्फळ गेले, तेव्हा तो परमेश्वराचा धाव करतो. उदाहरणार्थ, एका रुग्णाला खूप मोठा आजार झालेला आहे. तो बारा होण्यासाठी एका डॉक्टरकडून दुसऱ्या डॉक्टरकडे फिरत राहतो. अखेरीस त्याला कळून चुकते की इतर कोणीही नाही, फक्त परमेश्वरच  त्याची मदत करू शकतो. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम  

गुरुवार, ३ नोव्हेंबर, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार 
" भयभीत व्यक्ती मुक्त होऊ शकत नाही. "
१३
सामूहिक कर्म 

तारीख २६ डिसेंबर २००८ सकाळचे ध्यान 
वसंता - कालच्या तुमच्या ख्रिसमसच्या प्रवचनात तुम्ही म्हणालात, ' सध्याच्या अंशात परिस्थितीत, चिंता करू नका. परमेश्वराचे नामस्मरण करा. ' तुम्ही म्हणालात सर्वांनी जप करावा. त्याविषयी थोड विस्तृत सांगा नं !
स्वामी - माणसावर जेव्हा संकट कोसळत आणि जीवन धोक्यात येत, फक्त तेव्हाच त्याला परमेश्वराची आठवण होते. सर्वत्र अशांती आहे. अशा चिंताजनक वेळी माणसाचे मन परमेश्वराकडे वळते. 
वसंता - स्वामी, पण चांगली माणसंही दुःख भोगताहेत. 
स्वामी - हे सर्वांचे सामूहिक कर्म आहे. जेव्हा सत्य दुर्लक्षित होत, तेव्हा संपूर्ण जगाला त्याचा त्रास होतो. तुझे अश्रु धरणीवर पडतात, पंचमहाभूते क्रोधीत होतात; ते द्रुष्ट लोकांमध्ये शिरून त्यांच्या विध्वंसक वृत्ती जागृत करतात. कृष्णावतारात कित्येकांनी कृष्णाला दुर्लक्षिले. कित्येक लोकांना त्याचा राग येत असे, मत्सर आणि तिरस्कार वाटत असे. अनेकजण कौरवांना जाऊन मिळाले आणि युद्धात मेले. काही चांगली माणससुद्धा मेली. 
वसंता - स्वामी, पांडवांच्या बाजूलासुद्धा विध्वंस झाला, अभिमन्यु आणि पाच भावंडांनी त्यांचे जीव गमावले. 
स्वामी - प्रचंड वादळ येते, तेव्हा अनेक  झाडे,वृक्ष उन्मळून पडतात. वर चांगल, वाईट असा भेदाभेद करीत नाही. 
वसंता - स्वामी, कृष्णाने अनेक लीला करून आपण परमेश्वर असल्याचे जाहीरपणे सांगितले. माझ्याजवळ अशा काही शक्ती नाहीत. 
स्वामी - तुला 'मी' नाही, त्यामुळे तू आहेस तशीच रहा. तू तुझ्या शक्ती प्रकट केल्या आहेस. तू अनेक रोग बरे केलेस. ऋषी, नाडीशास्त्राद्वारे तू कोण आहेस ते सांगताहेत. जर लोक तुला दुर्लक्ष करीत राहिले, तर विध्वंस होत राहील. माझे सत्य मी जाहीर केले. मी माझा महिमा प्रकट केला. तरीसुद्धा लोक बरोबर वागत नाहीत. 
ध्यानाची समाप्ती    

संदर्भ- सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम