रविवार, ६ नोव्हेंबर, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
       " जर एखाद्यास तुम्ही तुमचा शत्रू मानलेत तर तो विचार त्याच्या मनात प्रतिबिंबित होईल आणि तो ही तुम्हाला त्याचा शत्रू मानेल. "
१३
सामूहिक कर्म 

           संकटकाळी माणसाला परमेश्वराची आठवण होते. एक म्हण आहे, ' सर्व संपुष्टात आल्यावर देवाचा धावा करण्यात काहीच अर्थ नाही. ' जेव्हा सर्व आलबेल असत तेव्हा माणूस भौतिक वस्तूंच्यामागे धाव घेतो. तो सत्य-असत्याची, शाश्वत- अशाश्वतेची चिकित्सा करीत नाही. परमेश्वर फक्त शाश्वत आहे, बाकी सर्व अशाश्वत आहे. हे सत्य न जाणल्याने माणूस जन्माला येतो आणि मरण पावतो. एका जीवात्म्याची ही स्थिती आहे. तरीसुद्धा जेव्हा संपूर्ण जगाला उत्पात आणि अशांती ग्रासते, तेव्हा विचार आपोआपच परमेश्वराकडे वळतात. बॉम्बस्फोट, वादळ, पूर, युद्ध, भूकंप या सर्वांमुळे माणूस भयग्रस्त होतो. हे भय जीवनाच्या असुरक्षिततेचे असते. लोक सामूहिक प्रार्थना करतात. जेव्हा संकटे माणसाला सर्व बाजूंनी ग्रासतात आणि तो स्वतःच्या प्रयत्नांनी त्यातून मार्ग काढू शकत नाही, तेव्हा तो परमेश्वराकडे वळतो. जेव्हा माणसाच्या लक्षात येते की त्याचे सर्व प्रयत्न निष्फळ गेले, तेव्हा तो परमेश्वराचा धाव करतो. उदाहरणार्थ, एका रुग्णाला खूप मोठा आजार झालेला आहे. तो बारा होण्यासाठी एका डॉक्टरकडून दुसऱ्या डॉक्टरकडे फिरत राहतो. अखेरीस त्याला कळून चुकते की इतर कोणीही नाही, फक्त परमेश्वरच  त्याची मदत करू शकतो. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा