बुधवार, २३ नोव्हेंबर, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

वाढदिवस संदेश

अवतार वाणी


तुम्ही स्वतःच तुमचे गुरु बना. तुमच्यामध्ये रोपण  केलेल्या ज्ञानाच्या स्फुल्लिंगाचा वापर करून स्वतःला प्रशिक्षित करा. एकदा तुम्ही तुमची सर्व शक्ती पणाला लावून प्रयत्न केलेत की परमेश्वरी कृपा तुम्हाला उन्नत करण्यासाठी तेथे विद्यमान असेल. आध्यात्मिक साधनेतील पहिली पायरी आहे वाणी शुद्ध करणे. वाणीमध्ये मधुरता असावी,क्रोध नसावा. तुम्ही प्राप्त केलेल्या गोष्टींविषयी व ज्ञानाविषयी दुराभिमान बाळगू नका. इतरांच्या आनंदात आनंद मानण्याची तसेच तुमच्या भोवताली असणाऱ्या लोकांच्या दुःखात सहभागी होण्याची वृत्ती विकसित करा. त्यांच्या भावना जाणून घेऊन सहानुभूतीने तुमचे अंतःकरण हेलावून जाऊ दे परंतु आनंद आणि दुःख केवळ भावनिक स्तरावर राहू न देता ते सेवेमध्ये परिवर्तित करा. सूर्योदय झाल्यावर तळ्यामधील सर्व कमळे उमलत नाहीत,केवळ परिपक्व झालेल्या कळ्याच उमलतात. इतर त्यांची वेळ येण्याची प्रतीक्षा करतात. अर्धपक्वतेमुळे हा फरक पडतो परंतु एक लक्षात घ्या सर्व फळे कधी  ना कधीतरी पिकतील आणि गळून पडतील. प्रत्येक जिवत्याच्या द्येयाप्रत पोहोचणारच मग त्याची वाटचाल कितीही लांब पल्ल्याची असो!
दिव्य संदेश,एप्रिल २३,१९६१

मित बोला,मधुर बोला, केवळ आवश्यकता असेल तेव्हाच बोला,ज्यांच्याशी बोलणे गरजेचे असेल त्यांच्याशीच बोला,रागाने वा उद्दीपित होऊन मोठयाने ओरडून बोलू नका. 
-बाबा




साईराम, येत्या ९ तारखेपासून आपण Blog वर एक नवीन सदर ' ज्ञान मौक्तिके ' ह्या नावाने सादर करीत आहोत. प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेला हे सदर Blog वर  प्रकाशित केले जाईल. 

जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा