ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" भयभीत व्यक्ती मुक्त होऊ शकत नाही. "
१३
सामूहिक कर्म
तारीख २६ डिसेंबर २००८ सकाळचे ध्यान
वसंता - कालच्या तुमच्या ख्रिसमसच्या प्रवचनात तुम्ही म्हणालात, ' सध्याच्या अंशात परिस्थितीत, चिंता करू नका. परमेश्वराचे नामस्मरण करा. ' तुम्ही म्हणालात सर्वांनी जप करावा. त्याविषयी थोड विस्तृत सांगा नं !
स्वामी - माणसावर जेव्हा संकट कोसळत आणि जीवन धोक्यात येत, फक्त तेव्हाच त्याला परमेश्वराची आठवण होते. सर्वत्र अशांती आहे. अशा चिंताजनक वेळी माणसाचे मन परमेश्वराकडे वळते.
वसंता - स्वामी, पण चांगली माणसंही दुःख भोगताहेत.
स्वामी - हे सर्वांचे सामूहिक कर्म आहे. जेव्हा सत्य दुर्लक्षित होत, तेव्हा संपूर्ण जगाला त्याचा त्रास होतो. तुझे अश्रु धरणीवर पडतात, पंचमहाभूते क्रोधीत होतात; ते द्रुष्ट लोकांमध्ये शिरून त्यांच्या विध्वंसक वृत्ती जागृत करतात. कृष्णावतारात कित्येकांनी कृष्णाला दुर्लक्षिले. कित्येक लोकांना त्याचा राग येत असे, मत्सर आणि तिरस्कार वाटत असे. अनेकजण कौरवांना जाऊन मिळाले आणि युद्धात मेले. काही चांगली माणससुद्धा मेली.
वसंता - स्वामी, पांडवांच्या बाजूलासुद्धा विध्वंस झाला, अभिमन्यु आणि पाच भावंडांनी त्यांचे जीव गमावले.
स्वामी - प्रचंड वादळ येते, तेव्हा अनेक झाडे,वृक्ष उन्मळून पडतात. वर चांगल, वाईट असा भेदाभेद करीत नाही.
वसंता - स्वामी, कृष्णाने अनेक लीला करून आपण परमेश्वर असल्याचे जाहीरपणे सांगितले. माझ्याजवळ अशा काही शक्ती नाहीत.
स्वामी - तुला 'मी' नाही, त्यामुळे तू आहेस तशीच रहा. तू तुझ्या शक्ती प्रकट केल्या आहेस. तू अनेक रोग बरे केलेस. ऋषी, नाडीशास्त्राद्वारे तू कोण आहेस ते सांगताहेत. जर लोक तुला दुर्लक्ष करीत राहिले, तर विध्वंस होत राहील. माझे सत्य मी जाहीर केले. मी माझा महिमा प्रकट केला. तरीसुद्धा लोक बरोबर वागत नाहीत.
ध्यानाची समाप्ती
संदर्भ- सत्ययुग आणि कर्मकायदा
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा