बुधवार, २३ नोव्हेंबर, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार - १२ जानेवारी 
 
"सर्वांवर प्रेम करा पण कुणा एकाच व्यक्तीला माया लावू नका." 

आपण ह्या सुविचाराबाबत पाहू यात . स्वामी म्हणतात 
" सर्वांवर प्रेम करा, सर्वांची सेवा करा." आपण आपला प्रेम भाव केवळ आपल्या कुटुंबीयांकरिता आणि नातेवाईकांकरिता राखून न ठेवता सर्वांवर सारखेच प्रेम करावे. कुणा एकावर अति प्रेम करू नये. कारण असं प्रेम आसक्तीत बदलतं. ह्या आसक्तीचे खोल ठसे बनतात. हे ठसे आपल्याला जन्ममृत्यूच्या चक्रात फसवतात. केवळ अनासक्ती तुम्हाला  जन्ममृत्यूच्या चक्रामधून वाचवू शकते. 
प्रत्येकानं सर्वांवर प्रेम केलंच पाहिजे. ही भगवान सत्य साई बाबांची शिकवण आहे. सर्वांवर प्रेम करा आणि सर्वांची सेवा करा. तुम्ही सर्वांवर प्रेम केलंत तर कारुण्य भाव भगवंताकडून तुमच्याकडे प्रवाहित होतो. माझं जीवन ह्याचं उदाहरण आहे. मी सर्वांवर प्रेम करते. स्वामींनी मला मुक्ती बहाल केली तथापि मी सर्वांसाठी मुक्ती मागितली कारण की, मी सर्वांवर सारखंच प्रेम करते. मी माझं उभं आयुष्य केवळ ह्याकरिता तपश्चर्या करीत आहे. ह्या कारणामुळं स्वामींनी आणि मी अखिल मानवतेची कर्मे आमच्यावर घेतली. भगवंत त्यानं स्वतः नेमून दिलेल्या कर्म कायद्यात दखल देत नाही. असे असूनही माझ्या अखंड तपश्चर्येसाठी त्याला काहीतरी करावंच लागेल. ही माझ्या तपश्चर्येची शक्ती आहे. मला माझ्याकरिता माझ्या तपश्चर्येचं फळ नकोय. अशा परिस्थितीत माझी तप:शक्ती अजून वाढते. माझ्या तप:शक्तीमुळे भगवंताकडून मला वैश्विक मुक्ती मिळते. ह्या कारणास्तवच भगवंत स्वतः सर्वांची कर्में घेतात. अशा रीतीनं वैश्विक मुक्ती साध्य होण्यासाठी आम्ही दोघे जागतिक कर्में स्वीकारतो. असं पूर्वी कधी घडलेलं नाही. हे प्रथमच घडत असल्यामुळे मर्त्य माणसाला हे समजणं अवघड आहे. केवळ साधू,संत हे समजू शकतात. 
स्वामी आणि  माझे भावतरंग स्तुपात प्रवेश करतात,तेथून सर्वत्र, व सर्वांमध्ये प्रवेश करत जग परिवर्तन घडवून आणतात. माझी प्रेम भावना मी सर्वांप्रती सारखीच व्यक्त करते,त्यामुळे दुष्ट दारुडा सुद्धा मोक्षास प्राप्त होतो. हे काकभुशंडी महर्षींनी माझ्या स्तुपाच्या नाडीग्रंथात लिहिलं आहे. माझं प्रेम साधू,संत आणि दारुडे ह्यांमध्ये भेदभाव करत नाही. माझा स्वभाव हा असा आहे. मला ह्या जगात कोणाही बद्दल ममत्व नाहीये. मला केवळ भगवान सत्य साई हवे आहेत. मला फक्त आणि फक्त त्यांच्या बद्दल ममत्व आहे. त्यांच्या प्राप्तीकरिता मी कठोर तपश्चर्या केलीय. मला भगवत प्राप्ती माझ्या एकटीसाठी नकोय, तर सर्वांना भगवत प्राप्ती व्हायला हवी. जेणेकरून सर्वजण जीवनमुक्त अवस्था अनुभवतील. ह्यामुळे पृथ्वीवर स्वर्ग अवतरेल. कलियुगाचं सत्ययुग होईल.

जय साईराम 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा