ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" परमेश्वरावर केंद्रित असणारे भक्ताचे प्रेम विस्तार पावते आणि जीवात्मा परमात्मा बनतो. प्रेम ईश्वर आहे. ईश्वर प्रेम आहे. "
१५
कोळी
हे लिहिल्यावर मला थकवा आला आणि मी छोटीशी विश्रांती घेतली. मी सहजच फळीवरून ' तपोवनम् ' हे पुस्तक उचलले आणि २६२ वे पान उघडले. तिथे लिहिले होते की एकदा स्वामी मुंबईमध्ये धर्मक्षेत्रला गेले. कारुण्यानंद नावाचे भक्त त्यांच्याबरोबर होते. एकदा कारुण्यानंदांनी त्यांच्या खिडकीतून कचराकुंडीत पडलेल्या अन्नासाठी काही मुलांना भटक्या कुत्र्याशी झटापट करताना पाहिले. त्यांना वाईट वाटले आणि त्या मुलांची दया आली. अचानक, स्वामी खोलीत आले आणि त्यांनी स्वामींना ते दृश्य दाखवले. कारुण्यानंदांनी स्वामींना विचारले, ' स्वामी, हे अस का बरं ?"
स्वामी म्हणाले, " पूर्वजन्मी ही मुले खूप ऐषारामात रहात होती. त्यांनी खूप किंमती आणि चविष्ट अन्न खाल्ले. ते थोडेसे खाऊन बाकीचे कचऱ्याच्या टोपलीत फेकून देत असत. ते काय करताहेत हे त्यांना कळत नव्हते आणि म्हणूनच ह्या जन्मी त्यांच्यावर कचराकुंडीतून जेवण वेचायची पाळी आली. त्यांच भाग्य त्यांनीच बनवले, त्यातून कोणाची सुटका नाही."
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
उर्वरित प्रकरण पुढील भागात ....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा