शनिवार, १८ फेब्रुवारी, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

महाशिवरात्री संदेश

शिवरात्रीचे महत्व

प्रेमस्वरूपलारा !

         आज महाशिवरात्र साजरी होत आहे. शिवरात्री हा शब्द चार अक्षरांनी तयार होतो. अंकशास्त्रानुसार, श व आणि र  एकत्र केल्यावर ११आकडा येतो. ११ ही संख्या पाच जननेन्द्रियं पाच कर्मेंद्रियं आणि मन यांचे प्रतिनिधित्व करते. अकरा रुद्र या अकरा अवयवांचे नियमन करतात.
          हे अकरा अवयव मनुष्याला भौतिक इच्छांमध्ये गुंतवून त्याला भौतिक अस्तित्वाच्या स्तरावर  खाली खेचतात. या अकरा अवयवांच्या पलीकडे असतो तो परमात्मा, सर्वव्यापी! जो पूर्णतः परमेश्वरावर विसंबून असतो तो या अकरांवरही प्रभुत्व मिळवू शकतो. शिवा पांडुरंग राम आणि कृष्ण यांच्यामध्ये कोणीही कोणताही भेद मानू नये कारण कोणत्याही नामाची भक्ती केली तरी दिव्यत्व एकच आहे.
         या रात्री मनुष्याच्या १६ कलांपैकी १५ कला मनुष्याच्या दिव्यत्वामध्ये लय पावतात आणि केवळ एकच कला उरते त्यामुळे या वेळेमध्ये दिव्यत्वाची अनुभूती घेणे सहज सुलभ होते. किमान या एका रात्री जर मनुष्याने त्याच्या इंद्रियांना नियंत्रित केले तर त्याला निश्चितच दिव्यात्वाची अनुभूती होते आणि त्याचबरोबर जर त्याने सर्व कुविचार बाजूला सारून मन परमेश्वराच्या नामावरती केंद्रित केले तर त्याला चैतन्याची अनुभूती होते. या प्रक्रियेस जागरण म्हणतात.आज रात्री अशा प्रकारे पवित्र,दिव्य जागरण करून दिव्यानंदाची अनुभूती घ्या.
- बाबा
१२-२-१९९१ 
 रोजी भगवान बाबांनी दिलेल्या महाशिवरात्री दिव्य संदेश मधून

जय साईराम 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा