ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
श्री वसंत साईंच्या अखंड साई चिंतनातून गवसलेली अनमोल रत्ने
रत्न - २
राधेचा कृष्णाशी योग *
आम्ही दिल्लीमध्ये असताना, स्वामींनी मला ऋषिकेश मधील वशिष्ठ गुहेस भेट देण्यास सांगितले.
१७ एप्रिल २००२ रोजी, पहाटे चार वाजता, भगवान बाबांनी, त्यांच्याशी माझे ऐक्य होण्यासाठी, मला शुद्ध सत्त्व बनवले. हे शुद्ध सत्त्वाचे परमेश्वराशी झालेले ऐक्य आहे.
स्वामींनी विविध प्रकारे ह्या प्रसंगाला आशीर्वाद दिले अचानकपणे,कम्प्युटरच्या पडद्यावर त्यांचा आशीर्वाद देणारा संदेश दृश्यमान झाला तसेच माझ्याबरोबर आलेल्या जवळच्या भक्तांना ह्या प्रसंगास पुष्टी देणारे आध्यात्मिक अनुभव आणि अलौकिक दृश्यांची अनुभूती आली. ह्या प्रसंगाचे महत्त्व काय? आणि तो प्रसंग का घडला?
स्वामींनी ह्या अलौकिक ऐक्याला * सत्य युगाच्या पायाभरणीचा दगड * असे घोषित केले. ह्याचा भक्कम पुरावा ते वृंदावन व्हाईटफील्ड येथे देतील असे त्यांनी सांगितले. त्यानुसार, १७ मे रोजी, मी ज्या घरामध्ये राहत होते तेथे स्वामींच्या फोटोवर गुलाबी रंगाचे डाग आढळले. स्वामी म्हणाले," राधेचे माझ्या मध्ये विलयन झाल्याचा हा पुरावा मी तुझ्यासाठी दिला आहे.राधेच्या कायेचा रंग गुलाबी आहे."
२४ एप्रिलला स्वामींनी आम्हाला दिल्लीहून मथुरा, वृंदावनला जाण्यास सांगितले. वास्तविक, एक आठवडा आगोदर स्वामींनी मला पहाटे ४च्या ध्यानामध्ये, नारद मुनींच्या उपस्थितीत,साई कृष्णाचा वसंत राधेशी विवाह संपन्न झाल्याचे दाखवले. स्वामींनी ह्या दिव्य ऐक्याचे अनेक पुरावे दाखवले. वृंदावन येथील मंदिरात गेल्यावर, आम्हाला अनेक अलौकिक अनुभव आले आणि अनेक चमत्कारही घडले.
स्वामींनी सांगितले की हा प्रसंग, कृष्णासाठी,राधा आर्ततेने घालत असलेल्या सादेची समाप्ती करणारा आहे.
-- श्री वसंत साई अम्मा 🕉🆚
🌸ॐ श्री साई वसंत साईसाय नम:🌸
🌸ओम श्री साई वसंतामृत दायकाय नमः🌸
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा