रविवार, २९ डिसेंबर, २०२४

 

 

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

      " भयभीत व्यक्ती मुक्त होऊ शकत नाही. "

जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
  अध्याय -१ श्लोक ४-६
            ज्या सैन्यामध्ये भीम आणि अर्जुन यांच्यासारखे- महापराक्रमी धनुर्धर आहेत, युयुधान विराट आणि द्रुपद यांच्यासारखे श्रेष्ठ योध्दे आहेत. दृष्टकेतू, चेकितान, काशिराज, पुरुजित, कुंतिभोज आणि शैब्य यांच्यासारखे शूरवीर बलशाली योध्दे आहेत तसेच पराक्रमी युधामन्यू, महाशक्तिशाली उत्तमौजा, सुभद्रापुत्र आणि द्रौपदीचे पाच पुत्र आहेत. हे सर्व योध्दे महारथी लढवय्ये आहेत.  

माझ्या वडिलांच्या मनातील भाव -----

            हे कान्हा, शत्रूचे सैन्य पाहून माझा थरकाप होतो आहे. नारायणा, या क्षुद्र जिवाची भीती नष्ट कर. ही भीतीच मनुष्याला पाप करण्यास प्रवृत्त करते. माझ्या अंगावर आभाळ कोसळले तरी मला भीती वाटू देऊ नकोस. हे प्रभुवरा, आपद्बंधवा, या क्षुद्रावर तू सत्ता करून आशीर्वाद दे. तूच माझा आश्रयदाता आहेस. तुझ्या ज्ञानाने सर्व इच्छांचा त्याग करून हा आत्मा आहे हे सत्य कळू दे. मनस्ताप दूर कर. युद्धासाठी सज्ज कर. मला सर्वसंगपरित्याग करून तुझ्या चरणी समर्पित होण्याची बुद्धी दे. 

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

शुक्रवार, २७ डिसेंबर, २०२४

 

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

      " भयभीत व्यक्ती मुक्त होऊ शकत नाही. "

जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
  अध्याय - १, श्लोक २,३
           दुर्योधन पांडवांचे व्यूहरचना केलेले सैन्य पाहून द्रोणाचार्यांना म्हणाला, " अहो आचार्य! तुमचा शिष्य द्रुपदपुत्र दृष्टद्युन्म याने कौशल्याने रचलेली ही विशाल पांडवसेना पहा !"
माझ्या वडिलांच्या मनातील भाव -----

            हे कान्हा, प्रभु, माझे कुविचार माझ्या सदवृत्तींना संघर्ष करण्यासाठी ललकारत आहेत. हे गरुड वाहना, परमेश्वरा, तू माझा सारथी होऊन हे युद्धसुद्धा तूच कर. नारायणा, तूच माझे आश्रयस्थान आहेस. शरणम् शरणम्. तू जर या दीनदुबळ्या मनामध्ये निवासास आलास तर ' मी आणि माझे ' पळ काढतील व कुठेतरी लपून बसतील. ये ये वासुदेवा, तूच माझे आश्रयस्थान आहेस. शरणो शरणम्.
कान्हा, तुझ्या कृपेने मला पांडवांचे बलाढ्य सैन्य दाखव. भय दूर कर. आदिनारायणा ! शुभाशुभ प्रसंगी मन समतोल राहण्यासाठी शक्ती दे. एका शब्दासाठी मनाचा एवढा गोंधळ का होऊ दिलास माधवा ! दृढ मन दे . दिनरक्षणा, दयाळा. तूच सर्वांचा कर्ता. तुझ्याविना अणुसुध्दा हलणार नाही. या गरिबाला निमित्तमात्र बनव. दृष्ट विचार नष्ट कर. प्रभू, तूच माझा आधार ! शरणो शरणम्.

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

शनिवार, २१ डिसेंबर, २०२४

 

                  ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
                                 सुविचार 
 

      " भयभीत व्यक्ती मुक्त होऊ शकत नाही. "

जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
  अध्याय -१, श्लोक -१
             धृतराष्ट्र म्हणाले, " हे संजया ! कुरुक्षेत्राच्या पवित्र भूमीवर युद्धाच्या ईर्ष्येने जमलेल्या माझ्या आणि पांडुच्या मुलांनी काय केले ?"
माझ्या वडिलांच्या मनातील भाव-----
             कृष्णा! गोपाळा ! गोविंदा ! हे शरीर क्षेत्र आहे आणि याद्वारेच मोक्षप्राप्ती करता येते, याचे ज्ञान या दिनाला दे. या शरीरातील सद्गुण आणि दुर्गुण यामध्ये सतत संघर्ष पेटता ठेवून तू माझ्या मनात वास कर. सद्गुणांना सन्मार्ग दाखवून, जागृती निर्माण करून, हा जीवनरथ तू हाक. नारायण, हा श्वान तुमच्या आश्रयाला आला आहे. रक्षण करून उद्धार कर. कान्हा! आधार केवळ तू! शरणो शरणम्.
*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

शुक्रवार, २० डिसेंबर, २०२४


 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

      " भयभीत व्यक्ती मुक्त होऊ शकत नाही. "

जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
             त्यांनी कुटुंबीयांसाठी प्रार्थनेत सहभागी होण्यास प्रोत्साहन दिले आणि त्यांना स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगणाऱ्या गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील श्लोक शिकवले. त्यांनी आम्हाला भक्तलक्षणे वर्णन करणारा १२ वा अध्याय तसेच पुरुषोत्तम योगावरील १५ व अध्यायही शिकवला. आश्रमातील आम्ही २रा व १२ वा अध्याय आलटून पालटून म्हणतो.
             माझ्या वडिलांचे जीवन म्हणजे भगवद्गीतेतील वर्णिलेल्या सर्व १८ योगांचे आदर्श उदाहरण होते.
             आता स्वामींनी माझ्या वडिलांच्या १९५३ च्या डायरीतून काय सूचित केले आहे ते पाहू या.
             माझे वडील रोज गीतेचा एक श्लोक लिहित व त्यातून उमलणाऱ्या भावांची नोंद करीत. माझ्या वडिलांनी १ जाने १९५३ ला ११ व्या अध्यायातील पहिल्या श्लोकाने ही रोजनिशी लिहिण्यास सुरुवात केली. १६ ऑक्टो. १९५३, सरस्वती पूजनाच्या दिवशी त्यांनी गीतेच्या १८ व्या अध्यायातील ७८ व्या श्लोकाने हे लिखाण पूर्ण केले. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांनी १ ल्या अध्यायातील पहिल्या श्लोकाने सुरुवात केली. अशा प्रकारे ते डायरी लिहीत. या छोट्या पुस्तकातही आम्ही गीतेतील श्लोक जसे आहेत तसे मांडले आहेत.

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, १५ डिसेंबर, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

      " भयभीत व्यक्ती मुक्त होऊ शकत नाही. "

जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
वेळापत्रक
 
४. २०                 -  उठणे, उच्चारण आणि नमस्कार
४. ४५ ते ५. ३०    - प्रार्थना, फुले वेचणे, उदबत्ती लावणे, अर्चना
५. ३० ते ६. ०५    - ध्यान आणि पूजा
७. ३० - नाश्ता
७. ३० ते ९. १५    - बाहेरची कामे
१०. ०० ते १२. ०० - नालयीरा दिव्य प्रबंधम आणि तिरुवैभो यासारख्या पवित्र ग्रंथांचे वाचन.
१२. ०० ते १२. १५ - भोजन
१. ०० ते २. ००     - वामकुशी
२. ०० ते ३. ००    - मुलांबरोबर भगवद्गीतेचे पठण
३. १५ ते ३. ४५   - लिखित जप व तुळशीला पाणी  घालणे
५. ०० ते ७. ००   - शेतांमधून एक मैलाचा फेरफटका
६. ०० ते ६. ३०   - शेतामध्ये ध्यान
७. ०० ते ८. ००   - श्रीरंग विलासमध्ये प्रार्थना आणि वैद्यकीय सेवा
८. ०० ते ९. ००   - स्नान, प्रार्थना, भोजन
९. ०० ते १०. ०० -
आळ्वारच्या गीतांचे वाचन, सूतकताई
१०. ००              - झोप.


संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम



गुरुवार, १२ डिसेंबर, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

      " भयभीत व्यक्ती मुक्त होऊ शकत नाही. "

जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
           माझ्या वडीलांच्या जीवनाविषयी थोडसं अधिक जाणून घेऊया.
           भारतमाता स्वतंत्र झाल्यानंतर खेडेगावातील व आजूबाजूच्या गावातील लोकांच्या सोयीसाठी माझ्या वडिलांनी 'गांधी खादी विद्यालय ' सुरू केले. तिथे ते रोज गावातील लोकांना मोफत औषधे देत असत आणि ग्रंथालय चालवीत. रोज संध्याकाळी सहा वाजता प्रार्थना म्हटल्या जात. शुक्रवारी भजने होत. ते मुलांना गीता, नारायणसूक्त, 
आळ्वारची गीते आणि आंडाळचे  शिकवत असत.
           सणाच्या दिवशी ते सूतकताई यज्ञाचे आयोजन करीत. माझे वडील रोज चरख्यावर सूत कातक.
           त्यांचे दिवसभराचे शिस्तबद्ध वेळापत्रक होते जे काटकोरपणे पाळले जात असे. त्यात ध्यान, चालणे, जप, लिखित जप, सुतकताई आणि रोजनिशी लिहिणे यांचा समावेश होता.

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


रविवार, ८ डिसेंबर, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

      " भयभीत व्यक्ती मुक्त होऊ शकत नाही. "

जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
            माझ्या घरात माझी आजी, वडील, आई, काका, मामा हे सर्व फक्त पाचवीपर्यंतच शिकले होते कारण खेडेगावात पाचवी पुढे शाळाच नव्हती. तरीपण त्यांचा रामायण- महाभारताचा अभ्यास झाला होता. एक ब्राह्मण स्त्री आमच्या घरी येईल आणि काही महिने राहून ती भगवद्गीता व आळ्वारची गीते शिकवत असे. अशाप्रकारे घरातील सर्वजण शिकले. माझ्या कुटुंबातील सर्वांना परमेश्वराची ओढ होती. म्हणूनच त्यांच्या पुढील जन्मात ते परमेश्वरासोबत राहतील.
            स्वामींनी माझ्या वडिलांच्या १९५३ सालच्या डायरीत बऱ्याच ठिकाणी खुणा करून त्यांच्याविषयी मला लिहिण्यास सुचवले.

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, ५ डिसेंबर, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

      तुमच्या सर्व कर्तव्यांचा त्याग करा. परमेश्वर प्राप्ती हेच तुमचे कर्तव्य आहे. "

जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
            स्वामींनी मला पूर्वी सांगितले होते की माझे वडील पेरियाळ्वारचा अंश होते. नंतर त्यांनी सांगितले की ते राजा जनकाचा अंश होते. आता ते म्हणाले की माझे वडील नित्यसुरी म्हणजेच वैकुंठवासी आहेत. माझ्या कुटुंबातील इतर सदस्य देव देवतांचा अंश आहेत. मी स्वामींना विचारले की माझ्या सर्व नातेवाईकांनी त्यांच्या जीवनात छोट्या छोट्या चुका केल्या हे कसं काय झालं? तेव्हा ते म्हणाले की देवांनी काही चुका केल्या तरच ते पृथ्वीवर जन्म घेऊ शकतात.
             आयुष्यात चुका केल्याने मनुष्य पुन्हा पुन्हा पृथ्वीवर जन्म घेत राहतो. तसेच जर देवांना पृथ्वीवर राहायचे असेल तर त्यांना काहीतरी चूक करावीच लागते. या उदाहरणाद्वारे स्वामींनी एक नवीन सूत्र सांगितले आहे. फक्त या चुकांमुळेच देवांना पृथ्वीवर जन्म घेता येतो. सच्चरिताचा एक भाग म्हणून स्वामींनी मला माझ्या कुटुंबाविषयी लिहिण्यास सांगितले. आदिशक्ती सर्वसामान्य घरात जन्म घेऊच शकत नाही. ती वैकुंठातून आल्यामुळे वैकुंठवासीच्या घरात तिचा जन्म व्हायला हवा. अशाप्रकारे स्वामींनी सांगितली की माझे वडील हे वैकुंठवासी आहेत.


संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, १ डिसेंबर, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

      " मन नेहमीच नाकारात्मकतेवर केंद्रित असते. त्याला सकारात्मक बनवा आणि म्हणा, " मी सर्वांवर प्रेम करतो. "

जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
     स्वामी माझ्या वडिलांविषयी काय म्हणाले ते आता पाहू या.
२२/२/२०१० ध्यान
वसंता - माझ्या वडिलांच्या डायरीमध्ये मी जीवन तरंग सिद्धांत पाहिला. स्वामी, ते शाळाही शिकले नाहीत आणि असे असूनही त्यांना या सगळ्या गोष्टी करणे कसे शक्य झाले ?
स्वामी - प्रथम मी तुला सांगितलं की ते पेरियाळ्वारचा अंश आहेत, त्यांनंतर म्हटलं की ते जनकाचा अंश आहेत. आता मी सांगतो की ते नित्यसुरी आहेत.
वसंता - ठीक आहे स्वामी, मग माझी आई आणि माझे नातेवाईक कोण आहेत ?
स्वामी - ते सर्व देवदेवता आहेत.
वसंता - स्वामी, सर्व नातेवाईकांनी त्यांच्या जीवनात छोट्या छोट्या चुका केल्या होत्या.
स्वामी - देव असूनही त्यांनी अशा चुका केल्या नसत्या तर ते पृथ्वीवर राहू शकले नसते. त्या चुकांनीच त्यांना पृथ्वीवर धरून ठेवलं.
वसंता - हे काय स्वामी ?
स्वामी - तू याविषयी लिही. तुझ्या जीवनात त्यांच्या किती महत्वाचा वाटा होता हे तू तुझ्या सच्चरितात लिही. सामान्य लोकांबरोबर तू राहूच शकत नाहीस. इतरांमध्ये तू वावरू शकत नाहीस. तुझ्या कुटुंबातील सर्वांनी अगदी तळमळीनी परमेश्वराचा ध्यास घेतला, म्हणून आपण इथे आलो. पुढील अवतारात ते पुन्हा येतील, आपल्या बरोबर राहतील आणि आपल्याशी संयुक्त होतील.
वसंता - हे किती अद्भूत आहे स्वामी !
स्वामी - आदिशक्ती सर्वसामान्य माणसाच्या पोटी जन्मास येऊच शकत नाही. म्हणूनच त्यांचं जीवन हे असं होतं.
ध्यानाची समाप्ती    

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम