रविवार, १ डिसेंबर, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

      " मन नेहमीच नाकारात्मकतेवर केंद्रित असते. त्याला सकारात्मक बनवा आणि म्हणा, " मी सर्वांवर प्रेम करतो. "

जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
     स्वामी माझ्या वडिलांविषयी काय म्हणाले ते आता पाहू या.
२२/२/२०१० ध्यान
वसंता - माझ्या वडिलांच्या डायरीमध्ये मी जीवन तरंग सिद्धांत पाहिला. स्वामी, ते शाळाही शिकले नाहीत आणि असे असूनही त्यांना या सगळ्या गोष्टी करणे कसे शक्य झाले ?
स्वामी - प्रथम मी तुला सांगितलं की ते पेरियाळ्वारचा अंश आहेत, त्यांनंतर म्हटलं की ते जनकाचा अंश आहेत. आता मी सांगतो की ते नित्यसुरी आहेत.
वसंता - ठीक आहे स्वामी, मग माझी आई आणि माझे नातेवाईक कोण आहेत ?
स्वामी - ते सर्व देवदेवता आहेत.
वसंता - स्वामी, सर्व नातेवाईकांनी त्यांच्या जीवनात छोट्या छोट्या चुका केल्या होत्या.
स्वामी - देव असूनही त्यांनी अशा चुका केल्या नसत्या तर ते पृथ्वीवर राहू शकले नसते. त्या चुकांनीच त्यांना पृथ्वीवर धरून ठेवलं.
वसंता - हे काय स्वामी ?
स्वामी - तू याविषयी लिही. तुझ्या जीवनात त्यांच्या किती महत्वाचा वाटा होता हे तू तुझ्या सच्चरितात लिही. सामान्य लोकांबरोबर तू राहूच शकत नाहीस. इतरांमध्ये तू वावरू शकत नाहीस. तुझ्या कुटुंबातील सर्वांनी अगदी तळमळीनी परमेश्वराचा ध्यास घेतला, म्हणून आपण इथे आलो. पुढील अवतारात ते पुन्हा येतील, आपल्या बरोबर राहतील आणि आपल्याशी संयुक्त होतील.
वसंता - हे किती अद्भूत आहे स्वामी !
स्वामी - आदिशक्ती सर्वसामान्य माणसाच्या पोटी जन्मास येऊच शकत नाही. म्हणूनच त्यांचं जीवन हे असं होतं.
ध्यानाची समाप्ती    

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा