ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य
अध्याय २
कर्मकायदा - अवतार कायदा
प्रत्येक व्यक्ती मला त्यांच्या मानवी दृष्टीकोनातून पाहते, त्यामुळे चुका घडतात. मी सर्वांचे रुदय परिवर्तन करण्यात आले आहे, तरीही त्यांचा मानवी स्वभाव त्यांना माझ्यापासून दूर करतो. हे केवळ इथे आश्रमातच नाही तर जगभर असेच आहे. मी भावाद्वारे सर्व बदलते. माझे भाव स्तुती मधून बाह्यगामी होतात व परिवर्तन करतात. काहीजण शिल्लक समाधानासाठी इथे येतात. जरी माझे प्रेम त्यांना खेचून आणते तरी त्यांचा स्वभाव त्यांना माझ्या प्रेम बंधाशी प्रतिकार करायला लावतो. अशा रीतीने त्यांचा एक पाय आश्रमात असतो तर दुसरा त्यांच्या स्वभावात. म्हणून ते माझी उंची गाठू शकत नाहीत. ते नावापुरतेच आश्रमवासी आहेत. स्वामींनी किती सांगितले, मी किती सांगितले. जर ते बदलले नाहीत तर कठीण आहे.
सत्याचा मार्ग, भगवंताचा मार्ग खडतर आहे. हृदय बुद्धी व इंद्रियांनी त्यांची दिशा बदललीच पाहिजे. माझ्या भावा विश्वामधून सर्वांना सारखीच मुक्ती मिळेल. हे नक्की होईल. अगदी नक्की. तथापि ही सर्वसामान्यांना मिळणारी मुक्ती असेल. माझ्या समीप असल्याची मुद्रा कोणालाही नाही, कठोर कष्ट व जागरूकता यांची शेवटच्या घटकापर्यंत गरज आहे.

संदर्भ - सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम