रविवार, १ सप्टेंबर, २०१३

                शिर्डीसाई अवतारात त्यांनी पारमार्थिक अन्न शिजवून तयार केले . आता ते  सत्य साई बाबांच्या रूपाने वाढत आहेत आणि पुढील जन्मात प्रेमसाई बनून आपल्या दिव्य प्रसादाने सर्वांना  तृप्त करणार आहेत . सध्या ते संपूर्ण विश्व प्रेममय  करण्याच्या कार्याची पायाभरणी करत आहेत . पाया भक्कम  असेल तरच इमारत मजबूत बनते . प्रेमसाई अवतारात प्रेमाचा भरभक्कम पाया घातलेला असेल  आणि त्यातूनच सत्ययुगाचे आगमन होईल . पुन्हा वेदिक कालास प्रारंभ होईल . सर्वत्र वेदपठण  केले जाईल . भजनांच्या सूरांमधून भक्तीचा सुगंध दरवळेल . कोपऱ्याकोपऱ्यावर प्रवचने , कीर्तने रंगतील . घराघरातून ईशनामाचे गुंजन ऐकू येईल . दैवी कृपेच्या लहरी आकाशात  भरून राहतील .मानवाच्या प्रत्येक श्वासात आणि उच्चारात शूचिता आढळेल . सत्याची स्पंदने सर्व विश्व व्यापून टाकतील . इतरांना अपरिमित आनंद देऊन प्रत्येकजण दिव्यानंदाची अनुभूती घेईल . माणूस माणसासारखा वागेल !हे पाहून आपण खरोखर आश्चर्य करू की ही  पृथ्वी आहे का स्वर्ग !सत्ययुग प्रकाशमान होईल . होमकुंडातील पवित्र धूर भूतल व आकाश यांना वेढून टाकेल . यज्ञातील आहुतीने तृप्त होऊन देवगण , यक्षकिन्नर भूतलावर आनंदाचा व कृपेचा वर्षाव करतील . 
               ऋतुचक्र नियमानुसार फिरू लागेल . पाऊस नियमितपणे पडेल . सर्वत्र सुबत्ता व संपन्नता नांदेल . सत्य, धर्म ( सदाचार ) आणि न्याय यांची पुनर्स्थापना होईल . मानवी मन शूचिर्भूत होईल . त्यामध्ये सत्याचा वास असेल . आपल्या बांधवांसाठी मनात कारुण्यभाव दाटून येईल . जात , वंश , धर्म , राष्ट्र यासारख्या भेदभावाच्या संकल्पना हद्दपार होतील . तेथे फक्त एकच ईश्वर असेल आणि एकच वंश असेल - मानवी वंश . प्रेमाने ओतप्रत  भरलेल्या सर्वांच्या हृदयाची कंपनेही समानच असतील . श्री कृष्णचैतन्य महाप्रभूनप्रमाणे भक्तगण परमानंदाने नाचतील , गातील , वाऱ्याच्या झुळूकीतूनही  नामस्मरणाचे स्वर निनादतील . जे जे काही दृष्टीस पडेल , ऐकू येईल त्या सर्वातून ईश्वराची जाणीव जागृत होईल . प्रत्येकाच्या अंतर्यामी भक्तीभाव जागा होऊन परमेश्वराचा शोध घेण्याची तळमळ लागेल . मोहाचा त्याग आणि योगाचा अंगीकार हेच सर्वांच्या जीवनाचे सूत्र बनेल . 
                                  एका हृदयातून दुसऱ्या हृदयाकडे प्रेमाचे संक्रमण कसे होईल ? या संक्रमणाचा सर्वांना काय  लाभ ?या सर्व कल्पना समजावून देणे हा या पुस्तकाचा उद्देश आहे . 
                जादूटोणा , चमत्कार किंवा मंत्र याद्वारे प्रेमाचे संक्रमण होऊ शकत नाही . केवळ श्री सत्य साई बाबांच्या परिपूर्ण कृपाशिर्वादानेच हे साध्य होत आहे .  या साठी आपल्या अंगी साधेपणा ,आज्ञाधारकता व विनम्रता  हवी . भगवान बाबांप्रती असणाऱ्या असीम , एकाग्र प्रेमामुळेच हे आमूलाग्र परिवर्तन  शक्य होत आहे . मूकक्रांतीच्या सहाय्याने या भूतलाचे स्वर्गात परिवर्तन होत आहे . या , लवकर या ! वाचा ! अनुभवा !आणि लाभ घ्या . जय  साई राम .

                                                                              वसंता साई

संदर्भग्रंथ :- इथेच ! या क्षणी !! मुक्ती !!! 

 
                                                                                         

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा