सोमवार, ३० सप्टेंबर, २०१३

        

         
        वसंतामृतमाला
                   ( पुष्प तिसरे )
          





बुधवार, १८ सप्टेंबर, २०१३

                                     ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


वसंतामृतमाला
पुष्प पहिले 
हंस आणि कावळा 


             काही दिवसांपूर्वी स्वामींनी त्यांच्या हाताचा फोटो दिला ज्यातून विभूती पडत होती . याविषयी मी अगोदर लिहिले आहे . त्यानंतर काही दिवसांनी , त्यांनी दुसरा फोटो दिला . त्यामध्ये अनेक जणांनी त्या विभूतीसाठी आपले हात पुढे केल्याचे दिसत होते . या अनेक हातांमधील एका हातामध्ये विभूती पडत असल्याचे दिसत होते . तेथे लाल रंगाच्या पेनाने लिहिले होते :-
              " मी जी विभूती सृजित करतो ते म्हणजे विशेष गर्भितार्थ असणारे दिव्यत्वाचे प्रकटीकरण आहे . भौतिक , अशाश्वत आणि परिवर्तनीय असणारे सगळे जळून गेल्यानंतर जे शिल्लक राहते ते ". 
               स्वामी जी विभूती सर्वांना देतात ती दिव्य असते , सृजित केलेली असते . ही अखिल निर्मिती अनित्य , अशाश्वत आणि सतत बदलणारी आहे . मनुष्य जन्मतो , वाढतो , जीवन जगतो आणि अखेर मृत्यू पावतो . मृत्युनंतर त्याची राख बनते . जीवनामध्ये तो किती दुःख , अडचणी , आनंद आणि वेगवेगळ्या मनोवस्थानमधून जातो ? सगळ्यामध्ये सतत बदल होत असतो . केवळ अखेरीस राख बनण्यासाठी तो या सर्वातून जातो . जर माणसाने सकाळपासून रात्रीपर्यंत येणारे त्याच्या मनातील विचार लिहून काढले तर ते किती असतील ? अनेक वेगवेगळ्या विचारांमधून त्याचा स्वभाव बनतो आणि खोलवर ठसे उमटतात त्यालाच संस्कार म्हणतात . जे पुन्हा पुन्हा जन्म आणि मृत्यूस कारणीभूत होतात . या जगात शाश्वत असे काहीच नाही . प्रत्येक गोष्ट सतत बदलत असते . माणूस जन्मतो आणि मृत्यू पावतो . माणसाप्रमाणेच रोपट्याचे झाडात रुपांतर होते आणि अखेर ते मरते . पशुपक्ष्यांच्या बाबतीतही तसेच आहे . जगामध्ये शाश्वत असे काही नाही असे असूनही मनुष्य अशाश्वत गोष्टींचा संग्रह करण्यात आपला वेळ खर्ची घालतो . ( उदा. नवरा , बायको , मुले , नातेवाईक इ.) तथापि एक दिवस सगळ्यांचीच राख होणार आहे . मग यासाठी एवढा त्रास का सोसावा ? परमेश्वरामधून आलेल्या सर्वांनी पुन्हा परमेश्वर प्राप्ती करायलाच हवी. परमेश्वर प्राप्ती होईपर्यंत त्याला पुन्हा पुन्हा जन्म मृत्युच्या फेऱ्यात अडकावे लागेल . ह्या जगात प्रत्येक जण वेगळा आहे . एकासारखा दुसरा नाही . जुळ्यांच्या बाबतीतही तेच लागू आहे . प्रत्येक जण वेगळा आहे . मनुष्याने त्याच्या स्वभावानुसार जीवन व्यतीत करायला हवे . तथापि तो कृत्रिम जीवन जगतो . इतरांचे पाहून तो त्यांचे अनुसरण करतो . दुसऱ्यांचे कॉपी करू नका हा अगदी प्राथमिक धडा आपल्याला शिशुवर्गातच शिकवला जातो. तरीही इतरांचे अनुकरण का केले जाते ? कारण सर्वजण आपली तुलना इतरांशी करतात . उदा.एक मनुष्य गाडी विकत घेतो . त्यानंतर त्याचा शेजारी विचार करतो की त्यालाही गाडी विकत घ्यायला हवी . एकाचा मुलगा कॉन्व्हेंट शाळेत शिकतो . दुसरा विचार करतो , " मी ही माझ्या मुलाला त्याच शाळेत पाठवेन ". एक स्त्री दागिना खरेदी करते , दुसरी म्हणते , " या महिन्यात मीही एक नवीन दागिना घेईन". अशा प्रकारे जेव्हा एखादा आपली तुलना दुसऱ्याशी करतो तेव्हा ती तुलनाच त्याला कॉपी करण्यास भाग पाडते . आध्यात्मिक बाबतीतही तसेच म्हणता येईल . एखादी व्यक्ति जर रोज आश्रमात जात असेल तर दुसरी व्यक्ति विचार करते , " मी सुद्धा जाईन ". तथापि या सर्व गोष्टी व्यक्तीमध्ये कोणताही बदल करू शकत नाहीत . आपण इतरांकडून चांगल्या सवयी आत्मसात करून आपल्यामध्ये परिवर्तन घडवले पाहिजे . आपल्यामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी केवळ आपला जन्म आहे . प्रत्येकाने त्याच्या व्यक्तिगत वाटचालीद्वारे परमेश्वर प्राप्ती करायला हवी . या प्रवासात आपण कोणाला बरोबर घेऊ शकत नाही . प्रत्येकाने आपल्या चुका दुरुस्त करायला हव्यात . हेच स्वामींनी हंस आणि कावळ्याच्या गोष्टीतून शिकवले आहे . हंसाची चाल अत्यंत डौलदार असते . कवी एखाद्या सुंदर स्त्रीच्या पद्न्यासाची तुलना हंसाच्या चालीशी करतात . एकदा कावळ्याने हंसाची डौलदार चाल पाहिली व त्यालाही तसे चालण्याची इच्छा झाली . त्याने ते शिकण्यासाठी खूप प्रयत्न केले परंतु त्या प्रयत्नांनी त्याची अत्यंत दमछाक झाली . अखेरीस प्रयत्न थांबवले व तो स्वतःच्याच चालीकडे वळला . तथापि त्याच्या त्या प्रयत्नांमध्ये तो स्वतःची चालही विसरला . त्याचप्रमाणे जर तुम्ही इतरांचे अनुकरण केले तर तुम्ही स्वतःचा स्वभाव गमावून बसाल . हेच स्वामींनी सर्वांना बजावून सांगितले आहे . इतरांचे अनुकरण करू नका . तुमच्या स्वतःच्या स्वभावानुसार सर्व काही प्राप्त करण्याचा प्रयत्न करा . अनुकरण केवळ दिखाव्यासाठी केले जाते . परमेश्वर सर्वांच्या मनातील भाव जाणतो म्हणून दांभिकतेला थारा देऊ नका . एक उदाहरण - दोन जैन स्त्रिया येथे आल्या व त्यांनी विचारले की त्या इथे आश्रमात एक रात्र राहू शकतील का ? आम्ही त्यांना सम्मती दिली . त्या एक रात्र राहिल्या व दुसऱ्या दिवशी सकाळी निघून गेल्या . आणि आज परतीचा प्रवास करताना पुन्हा आश्रमात आल्या . त्या कोठेही जाताना दोघीच जात होत्या . त्यानंतर आश्रमात एका गाडीमधून दोन पुरुष आपले सामान घेऊन आले . त्या स्त्रियांनी " हा आश्रम कोणाचा आहे ? येथे कोण राहते ? असे कोणतेही प्रश्न विचारले नाहीत किंवा येथील कोणत्याच गोष्टीकडे त्यांनी लक्ष दिले नाही . 
              त्या दोघींनी विश्रांती घेतली व त्यानंतर आपल्या पुढील प्रवासास निघाल्या . त्यांनी इथल्या कोणत्याच गोष्टींची दाखल घेतली नाही . त्या त्यांचा मार्ग क्रमत होत्या . आपणही असेच असायला हव . आपल्या मार्गात कोणतीही गोष्ट बाधा बनू नये . लोक काय करतात याकडे आपण लक्ष द्यायला नको .         
१८ एप्रिल २०१३ संध्या -ध्यान
वसंता :- स्वामी , लोक इतरांचे पाहून त्यांचे अनुकरण का करतात ? या विषयी मी लिहु का ?
स्वामी:- " बोधामृत "या नावाने तू ते लिही .
वसंता:- मी जेव्हा आमच्या येथील माळ्याला  पाहते  तेव्हा मला अत्यंत वाईट वाटते . किती गरीब लोक  स्वामी , कृपा करून त्यांची परिस्थिती बदला ना.
स्वामी:- तू त्याला येतांना  पाहतेस तेव्हा तुझ्या डोळ्यात अश्रू येतात . तू जेव्हा त्याच्या विषयी  विचार करतेस तेव्हा करुणा  स्त्रवते.
ह्या दोन्ही गोष्टी नक्कीच त्या मध्ये बदल घडवतील . आई आजारी मुलाला किंवा तिच्या मांडीवरील अज्ञानी मुलाला आपल्या जवळ ठेवते व त्यांची काळजी घेते . तिला आपल्या शिकलेल्या मुलांची कधीही काळजी वाटत नाही .
वसंता :- स्वामी , शिकलेली मुल इतरांचे पाहून अनुकरण करतात . या गोष्टीचा मला राग येतो .
स्वामी :- हा आईचा स्वभाव आहे.
वसंता :- स्वामी , मी एक " अज्ञानी बालक " आहे . तुम्ही सदैव मला तुमच्या मांडीवर ठेवा .
स्वामी:- तू सदैव माझ्या मांडीवर किंवा हृदयात असतेस.
ध्यान समाप्ती .
                    आता आपण पाहू या . दररोज सकाळी सहा वाजता माळी  विश्व ब्रम्ह गर्भ कोटममध्ये येतो आणि जेव्हा आम्ही येतो तेव्हा तो तेथे असतो . आरती झाल्या नंतर तो त्याच्या कामाला लागतो . पूर्वी तो दारू पीत असे व सिगरेट ओढत असे परंतु इथे आल्या नंतर त्याने त्या सवयी सोडल्याचे सांगितले . इथे येऊन अशिक्षित व अज्ञानी खेडुत लोकांमध्ये अशा प्रकारे परिवर्तन होत असल्याचे पाहून मला अत्यंत आनंद होतो . यासाठी मी स्वामींकडे त्यांच्यासाठी प्रार्थना करते . त्याला पाहताच माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू येतात . त्याच्या सारख्या लोकांचा उद्धार करण्यासाठी तो महामहिम परमेश्वर येथे आला. ज्यांना बहाणा करणे माहित नाही अशा भोळ्या भाबडया खेडुतांना स्वतः मधील दोष लक्षात येतात . या करीता मी त्यांच्या साठी प्रार्थना करते . जे मूल आजारी असते किंवा जे मूल अनभिज्ञ असते ते नेहमीच आईच्या मांडीवर असते व आईच त्याची काळजी घेते . तिला आपल्या मोठया मुलांची किंवा शिकलेल्या मुलांची कधीच काळजी वाटत  नाही . स्वामी माझ्या अवस्थेची आईच्या मानसिकतेशी तुलना करतात . जेव्हा शिकलेले चुका करतात तेव्हा मी क्रोधित होते आणि जेव्हा साधेभोळे लोक स्वतः मध्ये परिवर्तन घडवतात ते पाहून मी त्यांच्यासाठी अधिकाधिक प्रार्थना करते . स्वामींनी या साठी एक उदाहरण दिले . जरी आपण लसणीच्या रोपाला रोज गुलाब पाणी घातले तरी त्याचा स्वभाव धर्म ( गुणधर्म ) कधीही बदलणार नाही लसणाचा वास कायम आहे तसाच राहणार असे स्वामी म्हणतात . याच प्रमाणे आपण काही केले तरी आपल्या पूर्व वासना आपल्याला सोडत नाहीत तुम्ही लसणाला गुलाब पाण्याचा अभिषेक करा बदामी हलव्यामध्ये घोळवा तथापि त्याचा वास कधीही जाणार नाही . याच प्रकारे तुम्ही इतरांचे पाहून त्यांचे अनुकरण केले तर तुमच्या अधोगतीस निमंत्रण द्याल . त्याला उद्धरणही नाही व त्या वासना कधीही जाणार नाहीत ही स्वतःचीच फसवणूक ठरेल ही  गोष्ट अध्यात्मात केली जात नाही . एकाला जप हवा,  दुस-यास ध्यान तर कोणाला सेवा . म्हणून दुस-याचे  पाहून त्याचे अनुकरण करू नका आपल्या स्वभाव धर्मानुसारच आपण परमेश्वर प्राप्ती करायला हवी . मी पूर्वी एक गीत लिहिले 
                     नाना त-हांचे लोआहेत येथे
                     हे सकलजन आहेत पुरावा ईश कृपेचा 
                     काहींच्या अंतरंगी दडले पशु तर …… 
                     काहींच्या अंतरंगी पशुपतीनाथ 
                     परी ही  लीला असे परमेशाची 
              तुम्हाला भेटणा-या प्रत्येक माणसातील सदगुन  हेरून ते आत्मसात करा. त्याच्या कर्मांचे अनुकरण करू नका . त्याच्या गुणांचे अनुकरण करा हा महा अवतार त्या आजण , गरीब लोकांसाठी आला होता . ते अजागतेपणाने चुकीच्या मार्गावरून जातात . स्वामी आणि मी आम्ही दोघांनी त्यांच्यात बदल घडवलाच पाहिजे . माझ्या प्रार्थना आणि अश्रू केवळ त्यांच्यासाठी आहेत  आणि इतर सर्वांसाठी केवळ मी लिहित असलेले ज्ञान आहे . ते वाचा , जाणून घ्या आणि स्वतः  मध्ये परिवर्तन घडवा ! स्वामी म्हणाले,  जर अज्ञानी माणसाने चुका केल्या तर त्यांना सांगितल्या नंतर ते बदलतील . परंतु जे शिकलेले असूनही स्वतःच्या चुका लक्षात घेत नाहीत आणि त्या लपवण्याचा प्रयत्न करतात . 
                                        जय साई राम

                                                                   श्री वसंता साई  

गुरुवार, १२ सप्टेंबर, २०१३

                               गोरख नाडीग्रंथ


दिनांक : ५ ऑगस्ट , २०११
स्थळ : वैदीश्वरन कोविल, तामिळनाडु 
श्रीवसंतसाईचे  नाडीग्रंथवाचन  

                मी पार्वतीदेवीची आराधना करतो. मी गोरख , आता मातेचा नाडीग्रंथ वाचतो. नवग्रह आकाशात फिरत असताना तू, धनलक्ष्मी, कमलपुष्पावर स्थिर होतीस. नंतर तू धरतीवर येऊन जन्म घेतलास. तुझ्या 'तूळ ' या जन्मराशीमध्ये रवी, चंद्र,शुक्र व राहू सर्व एकत्र आहेत..., वगैरे. अशाप्रकारे, तुझ्या आईवडिलांच्या पोटी तू एक गुणवान बालक म्हणून जन्माला आलीस. हा नाडीग्रंथ वाचत असताना तुझे वय ७३ वर्षे आहे. तुझा विवाह होऊन तुला मुले झाली. आता सर्व मुले मोठी झालीत. तुझा विवाह मायवा कृष्णाशी झाला; तथापि विवाहानंतर  तू सदैव दुःखी होतीस . हा नाडीग्रंथ वाचत असताना तुझे शरीर अत्यंत यातना भोगत आहे . 
                 मातेने स्वामींना पाहीले तरच तिच्या शरीराला स्वास्थ्य लाभेल. त्यांचा हात हातात धरणे तिच्या प्रारब्धात आहे . त्याक्षणी जगातील सर्व लोक हा अत्यंत आनंदाचा दिवस साजरा करतील . स्वामी तिचा हात हातात घेऊन सर्वांना तिच्या स्थितीबद्दल सांगतील व तिची महती सांगतील. यावेळी मायवाचा दत्तकपुत्र सदैव त्यांच्यासोबत असेल. त्याच्याद्वारे माता आनंदानुभव घेईल. जेव्हा माता व मायवा एकमेकांपासून दूर असतील तेव्हा तो त्यांचा दूत असेल. तिला सर्व संदेश त्याच्याद्वारे मिळतील. त्याच्यामार्फत ते संदेशाची देवाणघेवाण करतील. अम्मा व स्वामी ध्यानात संवाद करतात. अखेरीस ती आपल्या पतीसमवेत भूलोकाचा त्याग करेल. त्यांनी प्रस्थान ठेवल्यानंतर हा दत्तकपुत्र, त्यांचा शिष्य, मार्ग दाखवेल. त्यानंतर ती दोघे अंतर्दृष्टीमध्ये, दर्शन देतील ; स्थूलदेहरहित आत्मदर्शन देतील. 
             पुढे ते पुन्हा जन्म घेतील व गृहस्थाश्रम स्वीकारतील. ते परमानंदात जीवन जगतील. यावेळी त्यांच्या जन्मास पूर्णत्व प्राप्त होईल, पूर्णम्. शक्तीयुग संपल्यानंतर पुन्हा कलियुग सुरु होईल.


संदर्भग्रंथ :- पवित्र नाडीग्रंथ वाचन : श्री सत्यसाईबाबा आणि श्री वसंतसाई 


रविवार, ८ सप्टेंबर, २०१३

                          अगस्ति  महाशिव नाडीग्रंथ


तारीख - २६ नोव्हेंबर १९९८
स्थळ  - अनंतपूर 
श्री वसंतसाई चे नाडीग्रंथवाचन 
         दि . २६-११-९८ रोजी श्री वसंतसाईच्या नावाने हे पान वाचण्यात आले . 
शिव - पार्वती संवाद 
         जन्मदिनांक २३ ऑक्टोबर १९३८ , बहुधान्य वर्ष , (तमीळ वर्ष ) २६-११-९८वयाची ६० वर्षे पूर्ण ६१ वे चालू आंडाळ  त्यांच्या आदर्श (Role Model ) आहेत . त्या ध्यान करतात . ६२/६३ वे वर्ष लागण्याआधी त्यांना त्याचा लाभ मिळेल . समाजामध्ये मोठा नावलौकिक प्राप्त होईल . 
            ते ६५ या वयात - त्यांचा नावलौकिक राज्यस्तरावर पोहोचेल . त्यांना धनसंपदा , मौल्यवान रत्ने या कशामध्येही रस नसेल . त्या गोष्टींचा त्यांच्यावर वर्षाव होईल . त्या गोष्टी त्यांना आकर्षित करू शकणार नाहीत . त्यांच्या  दृष्टीने त्याला काहीही महत्व नसेल . 
           कृष्णाचे नाव असलेला त्यांची अनन्य भक्ती करणारा एक शिष्य अखेरपर्यंत त्यांचाबरोबर असेल . भविष्यामध्ये त्याला त्यांचे फार मोठे सहाय्य लाभेल . 
            ७० ते ७२ या वयात - परमेश्वर कृपा , आशीर्वाद आणि सहाय्य यांचा भरभरून लाभ. त्या जे कार्य हाती घेतील ते सिद्धीस जाईल . जगाच्या उद्धाराकरता त्या दूरवर प्रवास करतील . त्यांना परमेश्वराचे आणि गुरुपीठाचे आशीर्वाद लाभतील . 
              ७२ ते ७४ या वयात काही किरकोळ समस्या उदभवतील व त्याचे निराकरणही होईल . 
          ७५,७६ या वर्षी , त्यांनी हाती घेतलेली सर्व कार्ये सिद्धीस जातील . त्यांच्या पतीचे त्यांना शेवटपर्यंत सहाय्य लाभेल . त्यांना कौटुंबिक जीवनात स्वारस्य राहणार नाही . 
           ध्यानामुळे त्यांना महादेवतेचे (महालक्ष्मीचे ) पद प्राप्त होईल . 
           ७५ ते ८० - त्या दीर्घायुषी असतील . 
       आंडाळप्रमाणेच ईश्वरामध्ये  विलीन होण्याची त्यांची इच्छा आहे . पार्वतीने शिवांना विचारले , "हे घडेल का ?" शिव उत्तरले , " हो,  ती साईबाबा नावाच्या अवतारामध्ये विलीन होईल . यानंतर तिला पुन्हा जन्म नाही ." 
          पूर्वजन्मातील नाव राधा होते . पांडवांच्या काळात जन्म . त्या भगवान श्रीकृष्णावर प्रेम करत होत्या . त्यांनी भगवान श्रीकृष्णांना प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला . त्या जन्मात काही इच्छा अतृप्त राहिल्यामुळे त्यांनी हा जन्म घेतला . पूर्वजन्मात त्यांनी प्रार्थना केली , " मला जर पुन्हा जन्म असेल तर माझे भगवान श्रीकृष्णामध्ये विलयन व्हावे ." असा वर त्यांनी मागितला . म्हणून त्यांनी आता पुन्हा जन्म घेतला . त्या श्रीकृष्णमध्ये सदेह विलीन होतील . 

संदर्भग्रंथ :- पवित्र  नाडीग्रंथ वाचन : श्री सत्यसाईबाबा आणि श्री वसंतसाई

  
            

गुरुवार, ५ सप्टेंबर, २०१३

                ज्यांचा ठायी प्रेम आणि करुणा असते , तेथे साहजिक त्यागवृत्ती असतेच . उदाहरणादाखल आपण भारतातील एक महान संत श्री रामानुज यांच्या जीवनातील एक प्रसंग पाहू या . त्यांनी विशिष्टद्वैतवाद  सिद्धांत विद्यालय स्थापन केले . मंत्रोपदेश घेण्यासाठी ते बऱ्याचदा गुरुंकडे जात असत . त्या काळी वाहने नसल्यामुळे गुरूंना भेटण्यासाठी पायीच जावे लागत असे . सरतेशेवटी गुरूंनी त्यांच्या कानात , "ओम नमो नारायणाय  "हा गुरुमंत्र दिला . तो मंत्र कोणालाही सांगू नये असे गुरूंनी  बजावले अन्यथा त्यांना नरकात जावे लागेल . त्यावर रामानुजनी काय  केले ? गावातील तिरूगोष्टीयूर मंदिराच्या गच्चीवर जाऊन त्यांनी आजूबाजूच्या सर्व लोकांना बोलावले , कोणताही भेदभाव न राखता तो मंत्र सर्वांसमोर उच्चारला आणि मोक्षप्राप्तीसाठी सर्वांना तो मंत्र म्हणण्यास प्रेरीत केले . 
                  गुरूंना जेव्हा हे समजले तेव्हा ते अतिशय क्रोधीत झाले . त्यांनी रामानुजना त्याचा जाब विचारला , "तू केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तुला माहित आहे का ?" रामानुज म्हणाले ,"होय !जर लाखो लोकांना मोक्षप्राप्ती होणार असेल तर मी एकटा नरकात गेलो आणि भोग भोगले तर कुठे बिघडले ?" सर्वांसाठी करुणा आणि आत्मत्यागाची भावना त्यांच्या रंध्रारंध्रातून वाहत होती . यालाच म्हणतात विश्वप्रेम !त्याग आणि करुणा हे प्रेमाचे दोन डोळे आहेत . अशा पद्धतीने जेव्हा प्रेमभावना ओसंडून वाहू लागते तेव्हा आनंद द्विगुणीत होतो . कलियुगातील दुष्ट प्रवृत्तींचे निर्मूलन करण्याचे सामर्थ्य केवळ अशा  प्रेमातच आहे आणि म्हणूनच आपले प्रेमस्वरूप स्वामी , सत्य साई बाबा यांनी अवतार धारण केला आहे . 
                           प्रेमस्वरूप  आहे 
                                                - त्यांचा श्वास 
                                    - त्यांची वाणी 
                           व्यापून टाकतील विश्व सारे
                                    - ते दिव्य प्रेमाने

संदर्भग्रंथ :-  इथेच ! या क्षणी !! मुक्ती !!! भाग -२


रविवार, १ सप्टेंबर, २०१३

                शिर्डीसाई अवतारात त्यांनी पारमार्थिक अन्न शिजवून तयार केले . आता ते  सत्य साई बाबांच्या रूपाने वाढत आहेत आणि पुढील जन्मात प्रेमसाई बनून आपल्या दिव्य प्रसादाने सर्वांना  तृप्त करणार आहेत . सध्या ते संपूर्ण विश्व प्रेममय  करण्याच्या कार्याची पायाभरणी करत आहेत . पाया भक्कम  असेल तरच इमारत मजबूत बनते . प्रेमसाई अवतारात प्रेमाचा भरभक्कम पाया घातलेला असेल  आणि त्यातूनच सत्ययुगाचे आगमन होईल . पुन्हा वेदिक कालास प्रारंभ होईल . सर्वत्र वेदपठण  केले जाईल . भजनांच्या सूरांमधून भक्तीचा सुगंध दरवळेल . कोपऱ्याकोपऱ्यावर प्रवचने , कीर्तने रंगतील . घराघरातून ईशनामाचे गुंजन ऐकू येईल . दैवी कृपेच्या लहरी आकाशात  भरून राहतील .मानवाच्या प्रत्येक श्वासात आणि उच्चारात शूचिता आढळेल . सत्याची स्पंदने सर्व विश्व व्यापून टाकतील . इतरांना अपरिमित आनंद देऊन प्रत्येकजण दिव्यानंदाची अनुभूती घेईल . माणूस माणसासारखा वागेल !हे पाहून आपण खरोखर आश्चर्य करू की ही  पृथ्वी आहे का स्वर्ग !सत्ययुग प्रकाशमान होईल . होमकुंडातील पवित्र धूर भूतल व आकाश यांना वेढून टाकेल . यज्ञातील आहुतीने तृप्त होऊन देवगण , यक्षकिन्नर भूतलावर आनंदाचा व कृपेचा वर्षाव करतील . 
               ऋतुचक्र नियमानुसार फिरू लागेल . पाऊस नियमितपणे पडेल . सर्वत्र सुबत्ता व संपन्नता नांदेल . सत्य, धर्म ( सदाचार ) आणि न्याय यांची पुनर्स्थापना होईल . मानवी मन शूचिर्भूत होईल . त्यामध्ये सत्याचा वास असेल . आपल्या बांधवांसाठी मनात कारुण्यभाव दाटून येईल . जात , वंश , धर्म , राष्ट्र यासारख्या भेदभावाच्या संकल्पना हद्दपार होतील . तेथे फक्त एकच ईश्वर असेल आणि एकच वंश असेल - मानवी वंश . प्रेमाने ओतप्रत  भरलेल्या सर्वांच्या हृदयाची कंपनेही समानच असतील . श्री कृष्णचैतन्य महाप्रभूनप्रमाणे भक्तगण परमानंदाने नाचतील , गातील , वाऱ्याच्या झुळूकीतूनही  नामस्मरणाचे स्वर निनादतील . जे जे काही दृष्टीस पडेल , ऐकू येईल त्या सर्वातून ईश्वराची जाणीव जागृत होईल . प्रत्येकाच्या अंतर्यामी भक्तीभाव जागा होऊन परमेश्वराचा शोध घेण्याची तळमळ लागेल . मोहाचा त्याग आणि योगाचा अंगीकार हेच सर्वांच्या जीवनाचे सूत्र बनेल . 
                                  एका हृदयातून दुसऱ्या हृदयाकडे प्रेमाचे संक्रमण कसे होईल ? या संक्रमणाचा सर्वांना काय  लाभ ?या सर्व कल्पना समजावून देणे हा या पुस्तकाचा उद्देश आहे . 
                जादूटोणा , चमत्कार किंवा मंत्र याद्वारे प्रेमाचे संक्रमण होऊ शकत नाही . केवळ श्री सत्य साई बाबांच्या परिपूर्ण कृपाशिर्वादानेच हे साध्य होत आहे .  या साठी आपल्या अंगी साधेपणा ,आज्ञाधारकता व विनम्रता  हवी . भगवान बाबांप्रती असणाऱ्या असीम , एकाग्र प्रेमामुळेच हे आमूलाग्र परिवर्तन  शक्य होत आहे . मूकक्रांतीच्या सहाय्याने या भूतलाचे स्वर्गात परिवर्तन होत आहे . या , लवकर या ! वाचा ! अनुभवा !आणि लाभ घ्या . जय  साई राम .

                                                                              वसंता साई

संदर्भग्रंथ :- इथेच ! या क्षणी !! मुक्ती !!!