ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
वसंतामृतमाला
पुष्प पहिले
हंस आणि कावळा
काही दिवसांपूर्वी स्वामींनी त्यांच्या हाताचा फोटो दिला ज्यातून विभूती पडत होती . याविषयी मी अगोदर लिहिले आहे . त्यानंतर काही दिवसांनी , त्यांनी दुसरा फोटो दिला . त्यामध्ये अनेक जणांनी त्या विभूतीसाठी आपले हात पुढे केल्याचे दिसत होते . या अनेक हातांमधील एका हातामध्ये विभूती पडत असल्याचे दिसत होते . तेथे लाल रंगाच्या पेनाने लिहिले होते :-
" मी जी विभूती सृजित करतो ते म्हणजे विशेष गर्भितार्थ असणारे दिव्यत्वाचे प्रकटीकरण आहे . भौतिक , अशाश्वत आणि परिवर्तनीय असणारे सगळे जळून गेल्यानंतर जे शिल्लक राहते ते ".
स्वामी जी विभूती सर्वांना देतात ती दिव्य असते , सृजित केलेली असते . ही अखिल निर्मिती अनित्य , अशाश्वत आणि सतत बदलणारी आहे . मनुष्य जन्मतो , वाढतो , जीवन जगतो आणि अखेर मृत्यू पावतो . मृत्युनंतर त्याची राख बनते . जीवनामध्ये तो किती दुःख , अडचणी , आनंद आणि वेगवेगळ्या मनोवस्थानमधून जातो ? सगळ्यामध्ये सतत बदल होत असतो . केवळ अखेरीस राख बनण्यासाठी तो या सर्वातून जातो . जर माणसाने सकाळपासून रात्रीपर्यंत येणारे त्याच्या मनातील विचार लिहून काढले तर ते किती असतील ? अनेक वेगवेगळ्या विचारांमधून त्याचा स्वभाव बनतो आणि खोलवर ठसे उमटतात त्यालाच संस्कार म्हणतात . जे पुन्हा पुन्हा जन्म आणि मृत्यूस कारणीभूत होतात . या जगात शाश्वत असे काहीच नाही . प्रत्येक गोष्ट सतत बदलत असते . माणूस जन्मतो आणि मृत्यू पावतो . माणसाप्रमाणेच रोपट्याचे झाडात रुपांतर होते आणि अखेर ते मरते . पशुपक्ष्यांच्या बाबतीतही तसेच आहे . जगामध्ये शाश्वत असे काही नाही असे असूनही मनुष्य अशाश्वत गोष्टींचा संग्रह करण्यात आपला वेळ खर्ची घालतो . ( उदा. नवरा , बायको , मुले , नातेवाईक इ.) तथापि एक दिवस सगळ्यांचीच राख होणार आहे . मग यासाठी एवढा त्रास का सोसावा ? परमेश्वरामधून आलेल्या सर्वांनी पुन्हा परमेश्वर प्राप्ती करायलाच हवी. परमेश्वर प्राप्ती होईपर्यंत त्याला पुन्हा पुन्हा जन्म मृत्युच्या फेऱ्यात अडकावे लागेल . ह्या जगात प्रत्येक जण वेगळा आहे . एकासारखा दुसरा नाही . जुळ्यांच्या बाबतीतही तेच लागू आहे . प्रत्येक जण वेगळा आहे . मनुष्याने त्याच्या स्वभावानुसार जीवन व्यतीत करायला हवे . तथापि तो कृत्रिम जीवन जगतो . इतरांचे पाहून तो त्यांचे अनुसरण करतो . दुसऱ्यांचे कॉपी करू नका हा अगदी प्राथमिक धडा आपल्याला शिशुवर्गातच शिकवला जातो. तरीही इतरांचे अनुकरण का केले जाते ? कारण सर्वजण आपली तुलना इतरांशी करतात . उदा.एक मनुष्य गाडी विकत घेतो . त्यानंतर त्याचा शेजारी विचार करतो की त्यालाही गाडी विकत घ्यायला हवी . एकाचा मुलगा कॉन्व्हेंट शाळेत शिकतो . दुसरा विचार करतो , " मी ही माझ्या मुलाला त्याच शाळेत पाठवेन ". एक स्त्री दागिना खरेदी करते , दुसरी म्हणते , " या महिन्यात मीही एक नवीन दागिना घेईन". अशा प्रकारे जेव्हा एखादा आपली तुलना दुसऱ्याशी करतो तेव्हा ती तुलनाच त्याला कॉपी करण्यास भाग पाडते . आध्यात्मिक बाबतीतही तसेच म्हणता येईल . एखादी व्यक्ति जर रोज आश्रमात जात असेल तर दुसरी व्यक्ति विचार करते , " मी सुद्धा जाईन ". तथापि या सर्व गोष्टी व्यक्तीमध्ये कोणताही बदल करू शकत नाहीत . आपण इतरांकडून चांगल्या सवयी आत्मसात करून आपल्यामध्ये परिवर्तन घडवले पाहिजे . आपल्यामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी केवळ आपला जन्म आहे . प्रत्येकाने त्याच्या व्यक्तिगत वाटचालीद्वारे परमेश्वर प्राप्ती करायला हवी . या प्रवासात आपण कोणाला बरोबर घेऊ शकत नाही . प्रत्येकाने आपल्या चुका दुरुस्त करायला हव्यात . हेच स्वामींनी हंस आणि कावळ्याच्या गोष्टीतून शिकवले आहे . हंसाची चाल अत्यंत डौलदार असते . कवी एखाद्या सुंदर स्त्रीच्या पद्न्यासाची तुलना हंसाच्या चालीशी करतात . एकदा कावळ्याने हंसाची डौलदार चाल पाहिली व त्यालाही तसे चालण्याची इच्छा झाली . त्याने ते शिकण्यासाठी खूप प्रयत्न केले परंतु त्या प्रयत्नांनी त्याची अत्यंत दमछाक झाली . अखेरीस प्रयत्न थांबवले व तो स्वतःच्याच चालीकडे वळला . तथापि त्याच्या त्या प्रयत्नांमध्ये तो स्वतःची चालही विसरला . त्याचप्रमाणे जर तुम्ही इतरांचे अनुकरण केले तर तुम्ही स्वतःचा स्वभाव गमावून बसाल . हेच स्वामींनी सर्वांना बजावून सांगितले आहे . इतरांचे अनुकरण करू नका . तुमच्या स्वतःच्या स्वभावानुसार सर्व काही प्राप्त करण्याचा प्रयत्न करा . अनुकरण केवळ दिखाव्यासाठी केले जाते . परमेश्वर सर्वांच्या मनातील भाव जाणतो म्हणून दांभिकतेला थारा देऊ नका . एक उदाहरण - दोन जैन स्त्रिया येथे आल्या व त्यांनी विचारले की त्या इथे आश्रमात एक रात्र राहू शकतील का ? आम्ही त्यांना सम्मती दिली . त्या एक रात्र राहिल्या व दुसऱ्या दिवशी सकाळी निघून गेल्या . आणि आज परतीचा प्रवास करताना पुन्हा आश्रमात आल्या . त्या कोठेही जाताना दोघीच जात होत्या . त्यानंतर आश्रमात एका गाडीमधून दोन पुरुष आपले सामान घेऊन आले . त्या स्त्रियांनी " हा आश्रम कोणाचा आहे ? येथे कोण राहते ? असे कोणतेही प्रश्न विचारले नाहीत किंवा येथील कोणत्याच गोष्टीकडे त्यांनी लक्ष दिले नाही .
त्या दोघींनी विश्रांती घेतली व त्यानंतर आपल्या पुढील प्रवासास निघाल्या . त्यांनी इथल्या कोणत्याच गोष्टींची दाखल घेतली नाही . त्या त्यांचा मार्ग क्रमत होत्या . आपणही असेच असायला हव . आपल्या मार्गात कोणतीही गोष्ट बाधा बनू नये . लोक काय करतात याकडे आपण लक्ष द्यायला नको .
१८ एप्रिल २०१३ संध्या -ध्यान
वसंता :- स्वामी , लोक इतरांचे पाहून त्यांचे अनुकरण का करतात ? या विषयी मी लिहु का ?
स्वामी:- " बोधामृत "या नावाने तू ते लिही .
वसंता:- मी जेव्हा आमच्या येथील माळ्याला पाहते तेव्हा मला अत्यंत वाईट वाटते . किती गरीब लोक स्वामी , कृपा करून त्यांची परिस्थिती बदला ना.
स्वामी:- तू त्याला येतांना पाहतेस तेव्हा तुझ्या डोळ्यात अश्रू येतात . तू जेव्हा त्याच्या विषयी विचार करतेस तेव्हा करुणा स्त्रवते.
ह्या दोन्ही गोष्टी नक्कीच त्या मध्ये बदल घडवतील . आई आजारी मुलाला किंवा तिच्या मांडीवरील अज्ञानी मुलाला आपल्या जवळ ठेवते व त्यांची काळजी घेते . तिला आपल्या शिकलेल्या मुलांची कधीही काळजी वाटत नाही .
वसंता :- स्वामी , शिकलेली मुल इतरांचे पाहून अनुकरण करतात . या गोष्टीचा मला राग येतो .
स्वामी :- हा आईचा स्वभाव आहे.
वसंता :- स्वामी , मी एक " अज्ञानी बालक " आहे . तुम्ही सदैव मला तुमच्या मांडीवर ठेवा .
स्वामी:- तू सदैव माझ्या मांडीवर किंवा हृदयात असतेस.
ध्यान समाप्ती .
आता आपण पाहू या . दररोज सकाळी सहा वाजता माळी विश्व ब्रम्ह गर्भ कोटममध्ये येतो आणि जेव्हा आम्ही येतो तेव्हा तो तेथे असतो . आरती झाल्या नंतर तो त्याच्या कामाला लागतो . पूर्वी तो दारू पीत असे व सिगरेट ओढत असे परंतु इथे आल्या नंतर त्याने त्या सवयी सोडल्याचे सांगितले . इथे येऊन अशिक्षित व अज्ञानी खेडुत लोकांमध्ये अशा प्रकारे परिवर्तन होत असल्याचे पाहून मला अत्यंत आनंद होतो . यासाठी मी स्वामींकडे त्यांच्यासाठी प्रार्थना करते . त्याला पाहताच माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू येतात . त्याच्या सारख्या लोकांचा उद्धार करण्यासाठी तो महामहिम परमेश्वर येथे आला. ज्यांना बहाणा करणे माहित नाही अशा भोळ्या भाबडया खेडुतांना स्वतः मधील दोष लक्षात येतात . या करीता मी त्यांच्या साठी प्रार्थना करते . जे मूल आजारी असते किंवा जे मूल अनभिज्ञ असते ते नेहमीच आईच्या मांडीवर असते व आईच त्याची काळजी घेते . तिला आपल्या मोठया मुलांची किंवा शिकलेल्या मुलांची कधीच काळजी वाटत नाही . स्वामी माझ्या अवस्थेची आईच्या मानसिकतेशी तुलना करतात . जेव्हा शिकलेले चुका करतात तेव्हा मी क्रोधित होते आणि जेव्हा साधेभोळे लोक स्वतः मध्ये परिवर्तन घडवतात ते पाहून मी त्यांच्यासाठी अधिकाधिक प्रार्थना करते . स्वामींनी या साठी एक उदाहरण दिले . जरी आपण लसणीच्या रोपाला रोज गुलाब पाणी घातले तरी त्याचा स्वभाव धर्म ( गुणधर्म ) कधीही बदलणार नाही लसणाचा वास कायम आहे तसाच राहणार असे स्वामी म्हणतात . याच प्रमाणे आपण काही केले तरी आपल्या पूर्व वासना आपल्याला सोडत नाहीत तुम्ही लसणाला गुलाब पाण्याचा अभिषेक करा बदामी हलव्यामध्ये घोळवा तथापि त्याचा वास कधीही जाणार नाही . याच प्रकारे तुम्ही इतरांचे पाहून त्यांचे अनुकरण केले तर तुमच्या अधोगतीस निमंत्रण द्याल . त्याला उद्धरणही नाही व त्या वासना कधीही जाणार नाहीत ही स्वतःचीच फसवणूक ठरेल ही गोष्ट अध्यात्मात केली जात नाही . एकाला जप हवा, दुस-यास ध्यान तर कोणाला सेवा . म्हणून दुस-याचे पाहून त्याचे अनुकरण करू नका आपल्या स्वभाव धर्मानुसारच आपण परमेश्वर प्राप्ती करायला हवी . मी पूर्वी एक गीत लिहिले
नाना त-हांचे लोक आहेत येथे
हे सकलजन आहेत पुरावा ईश कृपेचा
काहींच्या अंतरंगी दडले पशु तर ……
काहींच्या अंतरंगी पशुपतीनाथ
परी ही लीला असे परमेशाची
तुम्हाला भेटणा-या प्रत्येक माणसातील सदगुन हेरून ते आत्मसात करा. त्याच्या कर्मांचे अनुकरण करू नका . त्याच्या गुणांचे अनुकरण करा हा महा अवतार त्या आजण , गरीब लोकांसाठी आला होता . ते अजागतेपणाने चुकीच्या मार्गावरून जातात . स्वामी आणि मी आम्ही दोघांनी त्यांच्यात बदल घडवलाच पाहिजे . माझ्या प्रार्थना आणि अश्रू केवळ त्यांच्यासाठी आहेत आणि इतर सर्वांसाठी केवळ मी लिहित असलेले ज्ञान आहे . ते वाचा , जाणून घ्या आणि स्वतः मध्ये परिवर्तन घडवा ! स्वामी म्हणाले, जर अज्ञानी माणसाने चुका केल्या तर त्यांना सांगितल्या नंतर ते बदलतील . परंतु जे शिकलेले असूनही स्वतःच्या चुका लक्षात घेत नाहीत आणि त्या लपवण्याचा प्रयत्न करतात .
जय साई राम
श्री वसंता साई
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा