वसंतामृतमाला
( पुष्प तिसरे )
आज स्वामींनी एक पानभर लिखाण दिले. त्यामध्ये वेगवेगळे विभाग होते. त्यातील आपण पहिला विभाग पाहू.
आत्मशरणागती म्हणजे भक्ताच्या व्यक्तिमत्वातील प्रगतीशील परिवर्तन, जे भक्ताला हळूहळू त्याच्या इष्ट देवतेमध्ये विलीन होण्यास मदत करते.
स्वामींनी वर काढलेला स्टार क्रममुक्तीचे निदर्शन करतो. ज्या मध्ये व्यक्तीला क्रमाक्रमाने प्रगती करत मुक्ती प्राप्त होते. त्याच्या इष्ट देवतेची प्राप्ती होते. स्वामी म्हणाले ही आत्म शरणागती आहे आणि याला क्रम मुक्ती म्हणतात. इथे जन्मलेल्या प्रत्येकाने मुक्ती मिळवायलाच हवी. ही क्रम मुक्ती आहे. प्रगतीशील मुक्ती मार्ग तथापि एखाद्याने किती का जन्म घेईना. मुक्ती सगळ्यांचा पूर्णविराम आहे. एखादा मनुष्य हजारो जन्म घेऊन कर्म मुक्ती द्वारे संथ गतीने प्रगती करून परमेश्वरास प्राप्त करून घेतो तर दुसरा अथक प्रयत्नाने साधना करून इथेच, या क्षणी मुक्ती प्राप्त करून घेतो. येथे येऊन हे स्वामींनी शिकवले.
आपण प्रयत्नांची पराकाष्टा करून साधना करत परमेश्वरास प्राप्त करून घेतले पाहिजे. या जगातील सर्वकाही क्षणभंगुर आहे, अशाश्वत आहे. मनुष्य जीवनात जे काही कमावतो ते शाश्वत नाही. जग सोडतांना धन, पद, प्रतिष्ठा, नातेवाईक यातील कोणतीही गोष्ट तुम्ही बरोबर घेऊन जाऊ शकत नाही. जर याचे यथार्थ ज्ञान झाले तर तुमच्या साठी ते अत्यंत लाभदायी होईल. हा नियम परमेश्वराच्या कोणत्याही रूपासाठी लागू असून त्याच्या त्या रुपाची तुम्हाला प्राप्ती होईल. हेच स्वामींनी सर्व धर्म चिन्हानद्वारे दर्शवले आहे. आणि घोषितही केले आहे. परमेश्वर एकच आहे. सर्व धर्म समान आहेत. परमेश्वर अंतर्यामी बनून सर्वांच्या हृदयामध्ये साक्षी भावाने स्थित आहे.
साधनेद्वारे आपण त्याला जागृत केले पाहिजे. तसे केल्याने नीलज्योतीरूपातील आपल्या अंतर्यामीचा आकार अधिकाधिक वाढत जाऊन तो आपल्याला मागदर्शन करतो. भगवदगीतेतील १३ व्या अध्यायात, उपद्रष्टा, अनुमंता, भर्ता, भोक्ता आणि महेश्वरा या पाच अवस्थांद्वारे हे सांगण्यात आले आहे. परमेश्वर सर्वांच्या हृदयात नील वर्णी ज्योती स्वरुपात स्थित असतो. त्याचा आकार तांदुळाच्या आग्रा एवढा असतो साधनेद्वारे तो आकार ( निळे तेज ) विस्तारत संपूर्ण देह व्यापतो. या अवस्थेमध्ये जीव शिव बनतो. ही महेश्वर अवस्था आहे. 'उपनिषदांच्या पलीकडे ' या पुस्तकातील ' अन्न विद्या ' या प्रकरणात ते निळे तेज विस्तार पावून कसे संपूर्ण देह व्याप्त होते हे मी एका आकृती द्वारे दाखवले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा