गोरख नाडीग्रंथ
दिनांक : ५ ऑगस्ट , २०११
स्थळ : वैदीश्वरन कोविल, तामिळनाडु
श्रीवसंतसाईचे नाडीग्रंथवाचन
मी पार्वतीदेवीची आराधना करतो. मी गोरख , आता मातेचा नाडीग्रंथ वाचतो. नवग्रह आकाशात फिरत असताना तू, धनलक्ष्मी, कमलपुष्पावर स्थिर होतीस. नंतर तू धरतीवर येऊन जन्म घेतलास. तुझ्या 'तूळ ' या जन्मराशीमध्ये रवी, चंद्र,शुक्र व राहू सर्व एकत्र आहेत..., वगैरे. अशाप्रकारे, तुझ्या आईवडिलांच्या पोटी तू एक गुणवान बालक म्हणून जन्माला आलीस. हा नाडीग्रंथ वाचत असताना तुझे वय ७३ वर्षे आहे. तुझा विवाह होऊन तुला मुले झाली. आता सर्व मुले मोठी झालीत. तुझा विवाह मायवा कृष्णाशी झाला; तथापि विवाहानंतर तू सदैव दुःखी होतीस . हा नाडीग्रंथ वाचत असताना तुझे शरीर अत्यंत यातना भोगत आहे .
मातेने स्वामींना पाहीले तरच तिच्या शरीराला स्वास्थ्य लाभेल. त्यांचा हात हातात धरणे तिच्या प्रारब्धात आहे . त्याक्षणी जगातील सर्व लोक हा अत्यंत आनंदाचा दिवस साजरा करतील . स्वामी तिचा हात हातात घेऊन सर्वांना तिच्या स्थितीबद्दल सांगतील व तिची महती सांगतील. यावेळी मायवाचा दत्तकपुत्र सदैव त्यांच्यासोबत असेल. त्याच्याद्वारे माता आनंदानुभव घेईल. जेव्हा माता व मायवा एकमेकांपासून दूर असतील तेव्हा तो त्यांचा दूत असेल. तिला सर्व संदेश त्याच्याद्वारे मिळतील. त्याच्यामार्फत ते संदेशाची देवाणघेवाण करतील. अम्मा व स्वामी ध्यानात संवाद करतात. अखेरीस ती आपल्या पतीसमवेत भूलोकाचा त्याग करेल. त्यांनी प्रस्थान ठेवल्यानंतर हा दत्तकपुत्र, त्यांचा शिष्य, मार्ग दाखवेल. त्यानंतर ती दोघे अंतर्दृष्टीमध्ये, दर्शन देतील ; स्थूलदेहरहित आत्मदर्शन देतील.
पुढे ते पुन्हा जन्म घेतील व गृहस्थाश्रम स्वीकारतील. ते परमानंदात जीवन जगतील. यावेळी त्यांच्या जन्मास पूर्णत्व प्राप्त होईल, पूर्णम्. शक्तीयुग संपल्यानंतर पुन्हा कलियुग सुरु होईल.
संदर्भग्रंथ :- पवित्र नाडीग्रंथ वाचन : श्री सत्यसाईबाबा आणि श्री वसंतसाई
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा