गुरुवार, ५ सप्टेंबर, २०१३

                ज्यांचा ठायी प्रेम आणि करुणा असते , तेथे साहजिक त्यागवृत्ती असतेच . उदाहरणादाखल आपण भारतातील एक महान संत श्री रामानुज यांच्या जीवनातील एक प्रसंग पाहू या . त्यांनी विशिष्टद्वैतवाद  सिद्धांत विद्यालय स्थापन केले . मंत्रोपदेश घेण्यासाठी ते बऱ्याचदा गुरुंकडे जात असत . त्या काळी वाहने नसल्यामुळे गुरूंना भेटण्यासाठी पायीच जावे लागत असे . सरतेशेवटी गुरूंनी त्यांच्या कानात , "ओम नमो नारायणाय  "हा गुरुमंत्र दिला . तो मंत्र कोणालाही सांगू नये असे गुरूंनी  बजावले अन्यथा त्यांना नरकात जावे लागेल . त्यावर रामानुजनी काय  केले ? गावातील तिरूगोष्टीयूर मंदिराच्या गच्चीवर जाऊन त्यांनी आजूबाजूच्या सर्व लोकांना बोलावले , कोणताही भेदभाव न राखता तो मंत्र सर्वांसमोर उच्चारला आणि मोक्षप्राप्तीसाठी सर्वांना तो मंत्र म्हणण्यास प्रेरीत केले . 
                  गुरूंना जेव्हा हे समजले तेव्हा ते अतिशय क्रोधीत झाले . त्यांनी रामानुजना त्याचा जाब विचारला , "तू केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तुला माहित आहे का ?" रामानुज म्हणाले ,"होय !जर लाखो लोकांना मोक्षप्राप्ती होणार असेल तर मी एकटा नरकात गेलो आणि भोग भोगले तर कुठे बिघडले ?" सर्वांसाठी करुणा आणि आत्मत्यागाची भावना त्यांच्या रंध्रारंध्रातून वाहत होती . यालाच म्हणतात विश्वप्रेम !त्याग आणि करुणा हे प्रेमाचे दोन डोळे आहेत . अशा पद्धतीने जेव्हा प्रेमभावना ओसंडून वाहू लागते तेव्हा आनंद द्विगुणीत होतो . कलियुगातील दुष्ट प्रवृत्तींचे निर्मूलन करण्याचे सामर्थ्य केवळ अशा  प्रेमातच आहे आणि म्हणूनच आपले प्रेमस्वरूप स्वामी , सत्य साई बाबा यांनी अवतार धारण केला आहे . 
                           प्रेमस्वरूप  आहे 
                                                - त्यांचा श्वास 
                                    - त्यांची वाणी 
                           व्यापून टाकतील विश्व सारे
                                    - ते दिव्य प्रेमाने

संदर्भग्रंथ :-  इथेच ! या क्षणी !! मुक्ती !!! भाग -२


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा