ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" परमेश्वराचे अखंड चिंतन म्हणजे परमेश्वराचे अखंड सानिध्य ".
वसंतामृतमाला
पुष्प २३
' सदहंकार
'
* * *
जडभरत हे एक महान ऋषी होते . तथापि हरिणीच्या नवजात पडसाविषयी
वाटणाऱ्या आसक्तीमुळे त्यांना पुढील जन्म हरिणाचा घ्यावा लागला . पूर्व
जन्मीच्या संस्कारांमुळे ते हरीण ऋषींच्या आश्रमा भोवती फिरत असे .
कालांतराने त्यांचा मृत्यू होऊन ते पुन्हा जन्मले . यावेळी त्याने एखाद्या
पाषाणासारख्या जड अचेतन अवस्थेत वावरणाऱ्या मानवाचा जन्म घेतला . गावातील
सर्वजण त्याच्याकडून विविध प्रकारची कामं करून घेत . कोणी पाणी आणायला
सांगे तर कोणी लाकडे तोडायला . कोणीही त्याचा आदर करत नसे . ते सदैव त्याला
ओरडत रागवत . परंतु त्याने कधीही आपले तोंड उघडले नाही . वास्तविक तो एक महान संत होता हे अखेरीस राजाच्या लक्षात आले . राजा त्याच्यापुढे नतमस्तक झाला . त्याला महाज्ञानी संबोधून राजाने त्याची प्रशंसा केली . तद्नंतर तो कोण आहे हे सर्वांना समजले . त्यांनी त्याचा सन्मान केला . जडभरत अहंकार रहित अवस्थेत प्रत पोहोचला होता . परंतु सामान्य माणसाचे काय ? त्याला प्रत्येकाकडून मानसन्मान हवा असतो .
उर्वरित वसंतामृत पुढील भागात .....
जय साईराम
ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" जादूटोणा , चमत्कार वा मंत्र याद्वारे प्रेम एका हृदयातून दुसऱ्या हृद्यामध्ये स्थलांतरित करता येत नाही ".
पुष्प २३ पुढे सुरु
स्वामी पुढे लिहितात -
अहंकाराचे विविध प्रकार - दास्याहंकार , ज्ञानाहंकार
१० मे २०१३ प्रातः ध्यान
वसंता - स्वामी , हा ' सदहंकार म्हणजे काय ? दास्याहंकार व ज्ञानाहंकार यांची उदाहरणे कोणती ?
स्वामी - जय व विजय दास आहेत . सनत् कुमार वैकुंठी आले असता त्यांनी सनत् कुमाराना प्रवेश नाकारला . नारद ज्ञानाहंकाराचे उदाहरण आहे . तो सर्वज्ञानी आहे तरीही त्याला शांती नाही . त्याने सनत् कुमाराना विचारले की शांती कशी मिळवावी ?
वसंता - मला समजले स्वामी . आता मी लिहीन .
ध्यान समाप्ती
उर्वरित वसंतामृत पुढील भागात ......
जय साईराम
ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" मनामध्ये कधीही न क्षमणारी आध्यात्मिक तृष्णा जागृत झाल्यास नरजन्माचे सार्थक होते ".
पुष्प २३ पुढे सुरु
नारदाचे काय ? त्याला शांती नव्हती . म्हणून त्याने सनत् कुमारांना विचारले , " शांती मिळण्याचा मार्ग कोणता ?" सनत् कुमारांनी त्यांना विचारले , " तुम्हाला कोणत्या विषयाचे ज्ञान आहे ? " नारद उत्तरले , " मला ६४ कला आणि सर्व वेद , शास्त्रे , पुराणे अवगत आहेत ". त्यावर सनत् कुमार म्हणाले , " याचा काही उपयोग नाही . भगवंत नाम पुरेसे आहे ". नारदही सदैव परमेश्वराच्या निकट होते परंतु त्याला ' सर्वज्ञानी ' असण्याचा अहंकार होता . हे स्वामी इथे दाखवून देतात .
परमेश्वराच्या निकट असलेल्यानाही अहंकार येतो . याला स्वामी ' सदहंकार ' म्हणून संबोधतात . नारद व जय विजयना सदैव परमेश्वराचे सान्निध्य प्राप्त आहे . जर त्यांना सुद्धा अहंकार होतो तर भूलोकावरील सामान्य माणसाचे काय ? म्हणून उठा ! जागे व्हा ! अहंकार कोणत्या दिशेने येईल हे आपण सांगू शकत नाही . अहंभावाला कोठून पालवी फुटेल हे सांगता येत नाही . जागृत राहा . सदसत् विवेक बाळगा. अहंकार कसा येतो याचा शोध घेऊन त्याचे समूळ उच्चाटन करा . जन्म मृत्युच्या चक्रातून मुक्त व्हा . या महामहीम अवताराच्या कालखंडात प्रयत्नांची शिकस्त करा . यासाठीच तो करुणासागर इथे येऊन आपल्याला मार्गदर्शन करत आहे . हे भोग आता पुरे !
जय साई राम
व्ही. एस.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा