ॐ श्री साई वसंतसाई साय नमः
सुविचार
" निर्मल हृदय स्वच्छ आरशासारखे प्रतिबिंबित होते " .
वसंतामृतमाला
पुष्प २४
पुष्प २४
मातेची ममता व विशुद्ध प्रेम
१० मे २०१३
आज स्वामींनी दिव्य टपालामध्ये एक कार्ड दिले . त्याच्या एका बाजूला उंच उंच हिरवेगार वृक्ष होते आणि पाठीमागच्या बाजूस खड्यांनी व राखाडी रंगाच्या चमकत्या मण्यांनी बनविलेले कृष्णाचे चित्र होते . कृष्णाच्या दोन्ही बाजूस निळ्या रंगात दोन चमकदार आकृत्या होत्या . त्यातील एक आकृती कृष्णाला हाताने खून करून बोलावत होती . कृष्ण मागे वळून पहात होता . त्याच्या चेहऱ्यासमोर दुसरी आकृती होती .
१० मे २०१३ : सायं ध्यान
वसंता - स्वामी , हे कोणाचे चित्र आहे ? कृष्ण व यशोदेचे तर नव्हे ?
स्वामी - यशोदेकडे मातेची ममता होती तर राधेमध्ये विशुद्ध प्रेम .
वसंता - स्वामी , राखाडी मणी आणि पांढरे खडे म्हणजे काय ?
स्वामी - मातृभाव म्हणजे आसक्ती , म्हणून राखाडी मणी . पांढरे खडे विशुद्ध प्रेम दर्शवितात .
वसंता - स्वामी , काल सनातन सारथीमध्ये मी हेच वाचले .... मनरहित अवस्था म्हणजे काय ?
स्वामी - मनरहित अवस्था म्हणजे शांती ; म्हणजेच स्थितप्रज्ञता . तुझी अवस्था अशी नाही . तू तुझे वेगवेगळे भाव माझ्यापाशी व्यक्त करतेस . हे तुझे १९ गुण आहेत . ही तुझी अवस्था आहे .
वसंता - मला आता समजले स्वामी . मी लिहीन .
ध्यान समाप्ती .
उर्वरित वसंतामृत पुढील भागात ......
जय साई राम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा