ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" तपोबल व परमेश्वराप्रती एकाग्र प्रेम , वैश्विक कर्मांचा संहार सर्वांना मोक्ष पदास घेऊन जात आहे ."
उत्कट गुरुभक्ती
जेव्हा मठाधिपती मठ सोडून दुसरीकडे जातात तेव्हा ते त्यांच्या नित्य पूजेच्या मूर्ती बरोबर घेऊन जातात . मठ सोडून दुसरीकडे जातांना त्या पूजेमध्ये खंड पडू नये म्हणून त्या मूर्ती बरोबर घेऊन जातात . एकदा नम्बी रामानुजांची आराधना पेटी डोक्यावर घेऊन त्यांच्या मागोमाग जात होता . वाटेत त्यांना कावेरी नदी ओलांडून पलीकडे जायचे होते . त्यावेळी रामानुजांनी त्यांची पादत्राणे काढून नम्बीकडे दिली . त्याने ती हातात घेतली व तो पुढे चालू लागला . ते नदी ओलांडून दुसऱ्या तीरावर आले . रामानुजांनी नम्बीला त्यांची पादत्राणे मागितली . नम्बीनी त्यांची पादत्राणे आराधना पेटीवर ठेवली होती . त्यानी ती काढून रामानुजांना दिली . ते पाहून रामानुजांना धक्का बसला . त्यांनी त्याला खडसावून विचारले , " तू असं का केलस ? देव पूजेच्या पेटीवर पादत्राणे ठेवणे योग्य आहे का ? हे महापाप आहे ".
नम्बीने त्यांना शांतपणे उत्तर दिले , " माझा देव तुमच्या देवाहून कमी नाही ". हे ऐकून सगळे अवाक झाले . त्याच्या प्रत्येक कृतीमधून त्याची गुरुभक्ती प्रतीत होत होती . प्रत्येकाला आपापल्या भावभावनांनुसार लाभ होतो . यत् भावम् तत् भवती . जसा तुमचा भाव तसे तुम्ही बनता . त्याने त्याच्या गुरूंमध्ये परमेश्वर पाहिला .
वेदामध्ये सांगितले आहे -
मातृ देवो भव
पितृ देवो भव
आचार्य देवो भव
अतिथी देवो भव
माता देव आहे
पिता देव आहे
गुरु देव आहे
अतिथी देव आहे
या वचनानुसार त्याने परमेश्वर मानून त्याच्या गुरूंची भक्ती केली .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा