ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" तुमच्या मुखाने केवळ सत्य वदावे , अन्य काही नाही " .
पुष्प २२ पुढे सुरु
' मी सर्व प्राणीमात्रांचे बीज आहे . सर्वजण माझाच सनातन अंश आहेत . '
सर्वजण परमेश्वराचा अंश आहेत . आपण सर्व त्यांच्यापासून जन्मलो आहोत . सर्वांनी त्याला प्राप्त करायलाच हवे . तो पर्यंत हे जन्म मृत्यचे चक्र थांबणार नाही . जेव्हा आपला मृत्यू होतो तेव्हा आपल्याबरोबर धन, विद्या , शास्त्रीय ज्ञान , पद , पदवी यापैकी काहीही येत नाही . मात्र प्रभू परमेश्वर आपल्यासोबत असतो . खेडूत , अशिक्षित गोपगोपीना याचे ज्ञान होते . ते सदैव कृष्ण चिंतनात मग्न असत . त्या घरकाम , पती , मुलेबाळे , सर्वांप्रती असणारी त्यांची कौटुंबिक कर्तव्ये पार पाडत परंतु त्यांचे मन कृष्ण चिंतनात निमग्न असे . ते कृष्णाच्या नामरूपात विलीन झाले होते .
भौतिक बाबींमध्ये मनुष्य कोणतीही गोष्ट करत असता त्याचे मन दुसरीकडे असते . जेथे आपला देह वावरतो ते आपले खरे जीवन नसून आपले मन जेथे असते तेच खरे जीवन . गोपगोपीनी जे काही केले ते ईश्वरचिंतनात करून हे सिद्ध केले . संतमहात्म्यांनी ही हेच केले . त्यांनी प्रत्यक्ष आचरनाद्वारे हे दर्शविले . गीता व उपनिषदे यांनीही हेच सांगितले आहे .
माझ्या संपूर्ण जीवनामध्ये मी एकाग्र विचाराने सर्वकाही केले . मी कृष्णाबरोबर काल्पनिक जगात जगले . भौतिक जीवनातील व्यवहार चालूच होते . तथापि माझे मन कृष्णामध्ये लीन झाले होते . माझी काया जगात वावरत होती . हे आहे ' यत् भावम् तत् भवती ' भगवंत केवळ आपला भाव पाहतो . माझे संपूर्ण जीवन असेच आहे . यामुळे जेथे स्वामी व मी केवळ दोघेच असू अशा नूतन युगाची मी निर्मिती करू शकते . प्रत्येक मानवामध्ये एवढी प्रचंड शक्ती असते परंतु ' मी व माझे ' यामुळे ही शक्ती तो वाया घालवितो . तो इंद्रियांचा गुलाम बनतो .
उर्वरित वसंतामृत पुढील भागात
जय साईराम
एका कागदावर रामकृष्ण परमहंसाचे वचन होते , त्यावर स्वामींनी लिहिले -
" तुम्ही हजारो युक्तिवाद करा , परंतु ' मी ' पुन्हा पुन्हा येत राहणार . एखादे झाड अगदी जमिनीपासून छाटले तरी काही महिन्यातच एक कोवळा कोंब दृष्टीस पडतो . तसेच मी वा अहंकार राहतोच . म्हणून तो बदमाश ' मी ' तुमचा गुलाम बनून राहायला हवा . जो पर्यंत तुमच्या देहात प्राण आहे तुम्ही म्हटले पाहिजे , हे प्रभू ! तू माझा स्वामी आहेस , मी तुझा दास . तुझी इच्छा प्रमाण ! "
त्यापुढे स्वामींनी लिहिले , कृष्णा ! आपण आपला अहंकार दूर करण्यासाठी नाना प्रकारे शोध घेतो . प्रयत्न करतो तरीही तो पुन्हा पुन्हा येत राहतो. त्याचप्रमाणे जर आपण एखादे झाड जमिनीपर्यंत छाटले तर थोड्याच कालावधीत त्याला पुन्हा कोंब फुटतो तथापि ते झाड मुळासकट तोडले तर पुन्हा अंकुरित होणार नाही . अहंकाराचे मुळ कोणते ? ते आपल्याला दिसत नाही . हजारो जन्म तो ' मी ' मनुष्याचा पाठपुरावा करतो . याचा समूळ नाश करायचा उपाय कोणता ? त्यासाठी एकच उपाय आहे . परमेश्वराला शरण जाऊन त्याची साश्रू नयनांनी प्रार्थना करणे .
प्रत्येक मानवी देहात अमाप शक्ती आहे परंतु ' मी व माझे ' यांच्या मागे लागून आपण ती वाया घालवतो . ' मी व माझे ' यांनी त्या सर्व शक्ती हिरावून घेऊन मानवाला गुलाम बनवले आहे . अहंकार दूर करण्यासाठी विनयशीलता हा एकच एक मार्ग आहे . त्यायोगे आपण अहंकाराला आपला दास बनवू . मी काहीही करत नाही . जे घडते ते सर्व परमेश्वराच्या इच्छेनुसार घडते . यावर पूर्ण श्रद्धा ठेवा . धन , पद , प्रतिष्ठा , ज्ञान , पदवी हे सर्व अहंकार वाढवतात . यावर विजय कसा मिळवावा ?
ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" परमेश्वराप्रती असणारी अढळ श्रद्धा , परमेश्वराहून अधिक महान आणि सामर्थ्यशील आहे " .

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ......
जय साईराम
तीन दिवसांपूर्वी मी सत्य साई स्पीकस् व्हॉल्यूम २९ भाग मधील १६० पान
वाचले . त्यातील एक प्रसंग मला आवडतो . स्वामी बद्रीनाथला गेले होते .
त्यांच्या बरोबर उत्तर प्रदेशचे राज्यपाल रामकृष्ण राव आणि २०० भक्त
मंडळीही गेली होती . रामकृष्ण राव स्वतः सर्वांना पाणी देऊन सेवा करत होते .
ते नेहमी म्हणत , " मी स्वामींचा दास आहे ". रामकृष्ण राव आंध्र प्रदेशाचे
मुख्यमंत्री असतानाच्या कालावधीत स्वामी जेव्हा मालक पेट येथे गेले होते
तेव्हा स्वामींच्या दर्शनासाठी हजारो लोक रांगेमध्ये उभे होते स्वयंसेवक
वेळ वाचविण्यासाठी भक्तांना घाई करत होते . रामकृष्ण रावही त्या रांगेत उभे
राहिले . वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने त्यांना रांगेत उभे न राहता थेट
दर्शनास जाण्याची विनंती केली . रामकृष्ण राव त्यांना म्हणाले , " राजकीय
दृष्ट्या मी मुख्यमंत्री असेनही परंतु आध्यात्मिक दृष्ट्या मी कोणी महान
नसून एक सर्वसामान्य भक्त आहे . ही आहे अहंकार रहित अवस्था . ' मी ' ला दास
कसा बनवायचा याचे हे एक उत्तम उदाहरण आहे . ते मुख्यमंत्री होते . तरीही
वरिष्ठ पोलीस आधिकाऱ्याने बोलावल्यावर ते गेले नाहीत . ते सामान्य
व्यक्तीसारखे रांगेत उभे राहीले . अहंकाराला दास बनविण्याचा हा एक मार्ग
आहे . ते म्हणाले की ते परमेश्वराचा दास आहेत . परमेश्वर ( स्वामी ) स्वतः
त्यांचे उदाहरण देऊन विद्यार्थांना त्यांची गोष्ट सांगत आहे .
अहंकारावर नियंत्रण ठेवण्याचा हा एक मार्ग आहे . स्वामींच्या दर्शनासाठी त्यांनी त्यांचे उच्च पद , हुद्दा व प्रसिद्धी या कशाचाही वापर केला नाही . केवळ असे लोक परमेश्वराला प्रिय असतात . ' प्रशांती निलयम् ' मध्ये अनेक लोक स्वामींच्या जवळ असतीलही परंतु त्यातील ' मी विना मी ' किती आहेत ? मात्र अहंकार रहित लोक प्रभूला प्रिय असतात . मला ' मी ' नाही . त्यामुळे ' मी विना मी ' अवस्थेत मी स्वामींचे अवतार कार्य करू शकते . मानवाला सुमार्गावर नेण्यासाठी स्वामींनी कितीतरी गोष्टी व उदाहरणे सांगितली आहेत . स्वामी येथे आले , त्यांनी माता पित्याप्रमाणे आपल्याला मार्गदर्शन केले . जागे व्हा ! मायेला दूर सारा ! तुमच्या ; मी ' ला हुसकून लावा .
ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" सत्याचा शोध घेण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे तप . या तपाद्वारे ज्ञान प्राप्त होते व ज्ञानातून परमानंदाची अनुभूती होते ".
पुष्प २२ पुढे सुरु
अहंकारावर नियंत्रण ठेवण्याचा हा एक मार्ग आहे . स्वामींच्या दर्शनासाठी त्यांनी त्यांचे उच्च पद , हुद्दा व प्रसिद्धी या कशाचाही वापर केला नाही . केवळ असे लोक परमेश्वराला प्रिय असतात . ' प्रशांती निलयम् ' मध्ये अनेक लोक स्वामींच्या जवळ असतीलही परंतु त्यातील ' मी विना मी ' किती आहेत ? मात्र अहंकार रहित लोक प्रभूला प्रिय असतात . मला ' मी ' नाही . त्यामुळे ' मी विना मी ' अवस्थेत मी स्वामींचे अवतार कार्य करू शकते . मानवाला सुमार्गावर नेण्यासाठी स्वामींनी कितीतरी गोष्टी व उदाहरणे सांगितली आहेत . स्वामी येथे आले , त्यांनी माता पित्याप्रमाणे आपल्याला मार्गदर्शन केले . जागे व्हा ! मायेला दूर सारा ! तुमच्या ; मी ' ला हुसकून लावा .
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा