ॐ श्री साई वसंतसाई साय नमः
सुविचार
" मनुष्य सिद्धींद्वारे जडवस्तूंचे सृजनीकरण करू शकतो परंतु जर तो त्याच्याही पलीकडे गेला तर तो परमेश्वर म्हणून स्वतःचे प्रकटीकरण करू शकतो . "
वसंतामृतमाला
पुष्प २६
अस्तित्व शास्त्र
नुकतेच स्वामींनी दोन पानी लिखाण दिले .
योग म्हणजे काय ? जाणीव - ( जाणीवेचा अभाव दुःखास कारणीभूत होतो .)आपल्यामधील दिव्यत्वाची जाणीव . मस्तक ( Head), हृदय ( Heart ) आणि हात ( Hands ) - [ 3H ] यांमधील सुसूत्रता आपल्याला पूर्णत्वास नेते .
चित्त वृत्ती निरोध -
मनुष्य मेंदूच्या केवळ १/१० शक्तीचा वापर करतो . योगाच्या सहाय्याने सर्जनशीलता विकसित करता येते .
अस्तित्व शास्त्र . हळू हळू दैवी गुण संपादन करा .
आध्यात्मिकता - देणे आणि घेणे
आता आपण याविषयी पाहू . जाणीवेचा अभाव हे जगातील सर्व दुःखांचे मूळ कारण आहे . आपल्याला जाणीव असेल तर आपण स्वतःला ' माझा जन्म का झाला ? माझ्या जन्माचे कारण काय ? ' हे प्रश्न विचारून त्याचे उत्तर जाणून व समजून घेऊ . याला सत् चित आनंद म्हणतात . सत् म्हणजे भगवंत , चित् म्हणजे अखंड एकाग्र जाणीव . ज्याला ही जाणीव असते तो परमेश्वर जाणतो , त्याला आनंद प्राप्ती होते . प्रत्येक गोष्टीमध्ये दिव्यत्व विद्यमान असते. आपण आपल्यातील दैवत्व पूर्णत्वास नेले पाहिजे . स्वामींनी ' मी भगवंत आहे आणि तुम्हीही भगवंत आहात ' हे पुन्हा पुन्हा सांगितले आहे . याचा बोध आपल्याला झाल्यास आपणही परमेश्वर होऊ . कुंडलीनीमध्ये सात चक्रे असतात ; पण ती सर्व मिटलेली असतात. कुंडलिनी शक्ती मूलाधार चक्रामध्ये वेटोळे घातलेल्या सर्पाप्रमाणे सुप्तावस्थेत असते . साधनेद्वारे आपण ही शक्ती जागृत करू शकतो . मुलाधारातील सुप्तशक्ती जागृत होऊन एकेक चक्र ओलांडत सहाव्या म्हणजे आज्ञा चक्रात ( तिसऱ्या नेत्र स्थानी ) शिवाबरोबर एक होते . हा आहे आनंद . ही अवस्था प्राप्त झाल्यावर दिव्यत्व पूर्णत्वास जाते . यासाठी स्वामी म्हणतात , " Hand ( हात ), Head ( मस्तक ), Heart ( हृदय ) [ 3 H ] ह्या तिन्हीच्या सुसूत्रीकरणाने ऐक्यावस्था प्राप्त होते .
उर्वरित वसंतामृत पुढील भागात .....
जय साई राम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा