ॐ श्री साई वसंतसाई साय नमः
सुविचार
" देह, मन, बुद्धी, इंद्रिये आणि अहंकार रहित प्रेम शुद्ध आणि सत् चितआनंद स्वरुप आहे . त्याचे सार मनुष्याच्या आकलना पलीकडचे आहे . "
पुष्प २५ पुढे सुरु
१९९१ मध्ये मला स्वामींच्या पादुका मिळाल्यानंतर मी एक गीत लिहिले होते .
आपले विश्व वेगळे,
फलासम साई या विश्वाचा स्वामी,
रेड्डीयार, चेट्टीयार बनती आप्तआपुले येथील
करिती सहभागी सर्वांसी ते त्याच्या कृपाप्रसादात
दृढ धरुनी ठेविती ते चरण त्याचे
सव्याज परतावा देईल तो त्यासी हमखास
या प्रकरणासाठी हे गीत समर्पक आहे . स्वामींचे चरण ठेवलेल्या चांदीच्या कुंड्यातील या पादुका विश्वाविषयी सांगतात . याचा अर्थ केवळ रेड्डीयार आणि चेट्टीयारच नव्हेत तर सर्व विश्व एकमेकांचे आप्त बनेल . सत्ययुगामध्ये स्वामी कृपावर्षाव करतील व सर्वांना तो कृपाप्रसाद लाभेल परंतु त्यासाठी तुम्ही त्यांचे चरण घट्ट धरून ठेवणे ही एकच अट आहे .
जय साई राम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा